01/04/2026
गोदावरी आय एम आर, लॉ कॉलेज, होम सायन्स, बीसीए महाविद्यालय मध्ये गोदावरी आजींना जयंतीदिनी आदरांजली !
जळगाव - गोदावरी आय एम आर च्या सभागृहात गोदावरी फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालय व शाळेतर्फे गोदावरी आजींना जयंतीदिनी आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगावच्या प्रिन्सिपल नीलिमा चौधरी, डॉ उल्हास पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ नयना झोपे, डॉ वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके तसेच होम सायन्स महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल कविता देशमुख व सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना प्रास्ताविकात प्रा स्मिता चौधरी यांनी गोदावरी आजींचा जीवन प्रवासाची माहिती दिली त्यांनी आजींवर लिहिलेले हितगुज नावाचे आत्मचरित्र पर पुस्तक यातील छोट्या छोट्या प्रसंगांना त्यांनी विशद केले.
बीसीए महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके यांनी आदरांजली अर्पण करताना सांगितले की, एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे गोदावरी आजी, लोकांची श्रीमंती ही पैशांमध्ये असते पण आजींची लोकांमध्ये होते व लोकांशी संबंधांमध्ये होते, आजी कोणालाही भेटल्या की तब्येतीची विचारपूस करायचे, आजींवरती लिहिलेलं पुस्तक वाचलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आजींचे कार्य कळेल अशा शब्दात त्यांनी आजींना आदरांजली वाहिली .
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल नीलिमा चौधरी यांनी याप्रसंगी आजी एकदम प्रेमळ आणि उच्च विचार होते आजींची आजच आठवण येत नाही आजींची आठवण रोज येत असते. शाळेमध्ये अजून काय गोष्टी केल्या पाहिजे हे देखील आजी सांगत असत, आजींचे आशीर्वाद आपल्या सोबत असेच राहतील. असे सांगून आदरांजली अर्पण केली.
होम सायन्स च्या प्रिन्सिपल कविता देशमुख यांनी याप्रसंगी आजीन सोबतच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या मार्गदर्शन रुपी स्नेहाच्या शिदोरीवर महाविद्यालय मार्गक्रमण करेल असेही सांगितले.
संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आपल्या भाषणाची सुरुवात प्रसिद्ध शायर मुनवर राणा यांची आई वरील कविता बुलंदी की बुलंदी का बडे से बडा आसमान छुवा, जब माँ ने गोद मे उठाया तो आसमान छुवा. या शब्दात मातृ सामर्थ्य वर्णन करून आजींना आदरांजली वाहिली गोदावरी परिवार हा खूप मोठा आहे सत्तावीसशे लोक आज कार्यरत आहेत, 27 संस्था उभ्या आहेत आजींची साधी राहणीमान होती त्यांचा अफाट असा जनसंपर्क होता. भाव स्पर्शी उदाहरण म्हणजे आजी नेहमी संस्थेसाठी आणि लोकांसाठी कार्यतत्पर असायच्या आजींचे सगळ्यांवरती प्रेम होतं त्यांची शिकवण आपण आचरणात आणावी. असे सांगितले
शिक्षकांकडून प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना डॉ प्राजक्ता पाटील यांनी आजींचे सर्वांना कायम मिळणारे प्रेम व संस्थेतील कौटुंबिक वातावरण व संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी या शब्दात आजींना आदरांजली अर्पण केली
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता चौधरी यांनी केले