03/10/2018
*माजी विद्यार्थी निमंत्रण पत्र*
दिनांक : - ०१/१०/२०१८
प्रति,
श्री /श्रीमती
सस्नेह नमस्कार, आपण शारदा बालक विहार,शारदा विद्या मंदिर किंवा लक्ष्मणराव आपटे प्रशालेचे माजी विद्यार्थी आहात. समाजामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपण आपले नाव उंचावलेले आहे. शाळेला त्याचा अभिमान आहे. आपल्या वेळची शाळा आणि आजची शाळा यामध्ये बराच फरक झालेला आहे. माजी विद्यार्थी म्हणून आपल्याही मनामध्ये शाळेविषयीची सद्भावना आजाही जागरुक अवस्थेमध्ये असेल. पुन्हा एकदा शाळेची नाळ जोडण्यासाठी आपल्याला हे पत्र पाठवित आहोत.
बुधवार दि. १०/१०/२०१८ रोजी सायंकाळी ६:३०वाजता आपटे प्रशालेमध्ये माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित केलेली आहे. आपण या सभेस उपस्थित राहून शाळेविषयीचा लोभ वृद्धिंगत करावा.
आपण येत आहात हे खालील क्रमांकावर संपर्क साधून कळवावे.
संपर्क क्रमांक
१) विद्या महामंडळ संस्था, पुणे
(०२०) २५५३१९९६
२) श्री.हरभरे सर - ८०८७३९४३४०
३) श्री. पांडेकर सर - ९८२२३७३२९८
*तळटीप:-
१) बॅच शैक्षणिक वर्ष:- १९९५-९६ , २००३-०४ आणि २००४-०५ करिता
२) आपल्या बॅचमधील मित्रांना हा संदेश पुढे पाठवावा.