Aagam Applied Arts College Ratnagiri

Aagam Applied Arts College Ratnagiri

Share

Applied Arts- Communications design, Drawing & Painting, Photography, UI UX, Video editing, Digital Marketing, Personality Development, Film Making

08/04/2026

पिंगुळी चित्रकथी म्हणजे एक जिवंत वारसा

सिंधुदुर्गची माती ही कलाकारांची भूमी आहे…
इथल्या प्रत्येक गावात एक कलाकार सापडतोच!
याच मातीत जपली गेली आहे एक अद्वितीय लोककला म्हणजे चित्रकथी.

कागदावर रंगवलेल्या पौराणिक चित्रांच्या माध्यमातून कथा सांगण्याची ही परंपरा…
जिथे प्रत्येक चित्र कथा सांगते , आणि प्रत्येक कथा जिवंत होते!

कुडाळजवळच्या पिंगुळी गावात आजही ही कला श्वास घेते आणि ती जपण्याचं महान कार्य करतं आहे गंगावणे कुटुंब.
असंख्य अडचणींवर मात करून या कलेला जिवंत ठेवणारे
पद्मश्री परशुराम गंगावणे
हे खरे अर्थाने “Living Tradition Bearer” आहेत.
चित्रकथी,
कळसूत्री बाहुल्या यांचे
पारंपारिक सादरीकरण करणारे पिंगुळीचं ठाकर आदिवासी कलाअंगण.

आजच्या आधुनिक युगात हरवत चाललेला हा वारसा
आपण अनुभवला पाहिजे… जपला पाहिजे..... म्हणूनच आगम अप्लाईड आर्ट कॉलेजतर्फे खास एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे.
यामध्ये इ.10 पासून पुढील सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

रविवार,
दि.12 एप्रिल 2026
सकाळी 10 ते 5
पद्मिनी रेसिडेन्सी, ऑफिस नं 4. पॉवर हाऊस रोड, नाचणे, रत्नागिरी
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
9527008676,
9421825208

चला, तर मग आपल्या संस्कृतीला जवळून अनुभवूया आणि चित्रकथी शिकूया!

Photos from Aagam Applied Arts College Ratnagiri's post 01/04/2026

दि. 1 एप्रिल 2026
सुहास भोळे यांच्या शुभहस्ते आगम अप्लाईड आर्ट कॉलेजचा उद्घाटन समारंभ संपन्न.

रत्नागिरी शहरातील उज्वल शिक्षण मंडळ रत्नागिरी संचलित,(रजि.) आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वा. हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते तथा ज्येष्ठ रंगकर्मी सन्मा.श्री.सुहास भोळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कोकण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मक दृष्टिकोन आणि कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करणे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कला शिक्षण केवळ छंद म्हणून न पाहता, त्यामध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत ही जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा मूलभूत विचार आहे. कोकण विभागात गुणवत्ता, सर्जनशीलता आणि कौशल्य यांचा संगम असलेले कला शिक्षण विकसित करणे.

ग्राफिक डिझाइन आणि कम्युनिकेशन या विषयांच्या शिक्षण क्षेत्रात सुयोग्य बदल घडवून आणणे. त्यासाठी, काळाशी सुसंगत, अद्ययावत्, सुबद्ध आणि समतोल अभ्यासक्रम तयार करणे. विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास घडवून आणून, प्रत्यक्ष कामाच्या क्षेत्रात ते जेव्हा उतरतील त्या वेळी, जाणीव आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या विविध कौशल्यांचा वापर या दोन्ही गुणांचा संगम असेल असे शिक्षण देणे.

आपले विद्यार्थी स्वावलंबी, स्वतंत्र बुद्धीचे आणि कुशल कम्प्युटर ग्राफिक डिझाइनर्स व्हावेत हे असून कलात्मक दृष्टिकोन आणि तांत्रिक कुशलता यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात संगम असेल, अशा पद्धतीचे शिक्षण देणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.
संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रा.संदेश पालये यांच्या माध्यमातून ही संस्था आर्ट आणि क्रिएटीव्ह क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.

या सोहळ्यास विनायक हातखंबकर, अँड. महेंद्र मांडवकर, अँड.राकेश सत्वे, नंदकुमार यादव,प्रा.पद्मजा पाटणकर, उदय शिंदे, महेंद्र सागवेकर, निलिमा शिंदे, संतोष गोरीवले, नम्रता शिंदे आदी मान्यवर आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Want your school to be the top-listed School/college?

Website