21/04/2026
विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग
नमस्कार 🙏
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित गणित प्रवेश परीक्षा २०२५-२६ मध्ये आपल्या शाळेतील
कु. हनुमंत युवराज चौधरी
याने मुंबई जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
या परीक्षेस ४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी –
विशेष श्रेणी – १७
प्रथम श्रेणी – २९
सामान्य श्रेणी – १
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हनुमंत चौधरी, सर्व यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक, मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
20/04/2026
विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग
नमस्कार🙏
अभिमानास्पद यश!!
💐अभिनंदन!!अभिनंदन!!💐
रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी झालेल्या महापौर चित्रकला स्पर्धेच्या द्वितीय फेरीत कुमार आतिष हरिष अडसूळ इयत्ता तिसरी
याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याला प्रशस्तीपत्र, सुवर्णपदक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले . त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन!💐💐
13/04/2026
नमस्कार 🙏
विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग
रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी गंधार फाऊंडेशन, नालासोपारा (पूर्व) यांच्या वतीने आयोजित तबला वादन स्पर्धेत कु. आरव शशिकांत पोतदार (इयत्ता चौथी) याने ८ ते १० वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल त्याला प्रमाणपत्र, ट्रॉफी व रुपये २०००/- रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत दहिसर ते पालघर परिसरातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
आरवच्या या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 👍💐
04/04/2026
विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर मराठी प्राथमिक
नमस्कार🙏
शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड यांनी सप्तदशक वर्ष पूर्ती निमित्त निबंध स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत आपल्या विभागातील
श्रीमती माधवी मनोज परुळकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल त्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐
28/03/2026
विद्या प्रसारक मंडळाचे विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभागाचे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश!!!
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐
30/01/2026
विद्या मंदिर मराठी प्राथमिक शाळा
दिनांक-३०/०१/२०२६
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन !
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग खाजगी प्राथमिक शाळा आयोजित आंतरशालेय 'श्री मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षक यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व स्पर्धक शिक्षिका श्रीमती उज्वला संतोष शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!💐💐💐