Arts & Commerce Junior College, Yeola

Arts & Commerce Junior College, Yeola Arts & Commerce Junior College, Yeola

15/04/2026

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, भारतरत्न...
15/04/2026

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून वैद्यकरत्न पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश कांबळे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
आपल्या प्रभावी भाषणात डॉ. कांबळे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा सखोल आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. ते म्हणाले की, आपण आपल्या महामानवांना जातीमध्ये विभागून घेतले आहे; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानवजातीसाठी काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा सहिष्णु, संयमी आणि विवेकी विचारांचा माणूस जगात दुसरा क्वचितच आढळेल. बाबासाहेबांनी जुन्या अन्यायकारक सामाजिक रचना मोडीत काढून एका नव्या, समताधिष्ठित भारताची निर्मिती केली. त्यांनी संघर्षातूनच ज्ञान संपादन केले आणि त्या ज्ञानाच्या बळावर समाजपरिवर्तन घडवून आणले. ते प्रचंड अभ्यासू, विद्वान आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते,असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, देशाचा खरा विकास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ज्ञानी आणि विचारवंत लोक सत्तेच्या केंद्रस्थानी येतात. बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रचंड संघर्ष सहन केला, परंतु त्यांनी कधीही विध्वंसक किंवा द्वेषपूर्ण विचार मांडले नाहीत. उलट त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने प्रज्ञासूर्य होते, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार केवळ वाचण्यात न ठेवता ते आचरणात आणणे ही आजची गरज आहे. त्यांनी नमूद केले की, शिक्षण, समता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा स्वीकार केल्यासच समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबतच संविधानिक मूल्यांचे भान ठेवून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. रवींद्र ठाकरे कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. वैभव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी महाविद्यालयाच्या वतीने विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार प्रा. वैभव सोनवणे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक,




महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त, तथा माजी पंतप्रधान ...
04/10/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त, तथा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते प्रतिमापूजन तथा अभिवादन करण्यात आले होते. तत्पूर्वी महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक या संस्थेच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी प्राचार्यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला. ते म्हणाले की, 'बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हे ब्रीद घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे निष्ठावान गांधीवादी नेते असल्याने त्यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीजींच्याच नावाने शिक्षण संस्था स्थापन केली. गोरगरीब, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, शेतकरी, आदिवासींच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी, या मुलांच्या हातून समाजाचे पर्यायाने देशाचे भविष्य उज्वल व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी शिक्षणाचा हा प्रवाह निर्माण केला. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेत शिक्षण घेत स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे नाव मोठे केले आहे. येवल्यासारख्या ग्रामीण भागात तत्कालीन काळात महाविद्यालय सुरू करून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेने इथली ज्ञानात्मक गरज भागविली. परिणामी येवल्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीत येवला महाविद्यालयाची, इथल्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. संस्थेने आमच्यात पेरलेला गांधीजींचा विचार आम्हाला नेहमीच सत्याच्या आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याचे भान देत राहील असेही ते म्हणाले. यावेळी उपप्राचार्य प्रा. पंढरीनाथ दिसागज, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. आर. पी. ठाकरे, जिमखाना विभागप्रमुख प्रा. प्रदीप वाघमारे, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक श्री. भालचंद्र पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार डॉ. आर. पी. ठाकरे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणूस जन्मतः नाटकाच्या जवळ असतो. जीवनाचे विविध पैलू नाटकाद्वारे उलगडले जातात. नाटक हा माणसाचे आयुष्य वाढविणारा व समृद्ध ...
04/10/2024

माणूस जन्मतः नाटकाच्या जवळ असतो. जीवनाचे विविध पैलू नाटकाद्वारे उलगडले जातात. नाटक हा माणसाचे आयुष्य वाढविणारा व समृद्ध करणारा कलाप्रकार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक तथा नाट्यदिग्दर्शक विक्रम गायकवाड यांनी केले. ते महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे बोलत होते. येथील प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत 'नाट्य संहिता व नाट्य सादरीकरण' या विषयावर बोलताना पुढे ते म्हणाले की, हल्ली तत्व आणि व्यवहार यात भिन्नता दिसून येते. नाटक पाहण्यासाठी आणि नाटक वाचण्यासाठी विशिष्ट दृष्टिकोन असावा लागतो. नाट्य सादरीकरण करताना प्राप्त परिस्थितीचे भान ठेवावे लागते. कलावंताने स्वतःला विसरून पात्राच्या अंतरंगात प्रवेश केल्याशिवाय तो अभिनय प्रभावी ठरत नाही. तमाशा ही महाराष्ट्राची उत्कृष्ट लोककला असून तिने बराच काळ महाराष्ट्राच्या मनोरंजनाची व प्रबोधनाची गरज भागविली आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी नाट्य संहितेचे महत्व, नाटकाची रचना, संवाद लेखन तसेच नाटकातील तांत्रिक आणि कलात्मक पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गमे म्हणाले की, नाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे.अनेक नाटकातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही होत असते. विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास होण्यासाठी नाटक मदतगार ठरत असते. सध्याच्या काळात समाजमाध्यमाद्वारे अभिनय, गायन लेखन, पाककला आदी कला सादर करून पैसा व प्रसिद्धी मिळविता येते. विद्यार्थ्यांमध्ये नाटकाच्या संदर्भाने अभिरुची निर्माण व्हावी, ते नाट्यलेखन, दिग्दर्शन तथा अभिनय क्षेत्राकडे वळण्यासाठी असे व्याख्यान महत्वपूर्ण ठरणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा. पंढरीनाथ दिसागज, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. आर. पी. ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. पी. ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. गणेश जावळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार प्रा. संदीप ढमाले यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षा खालील गटाच्या संघाने नाशिक येथे झालेल्या...
24/09/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षा खालील गटाच्या संघाने नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलेश नाईक व क्रिडा विभाग प्रमुख प्रा. प्रदीप वाघमारे ,यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव पुढील प्रमाणे :-
यशपाल हानवते, राहुल भड, अरबाज शेख, यश आहेर, विशाल आहेर, शाहिद सय्यद, प्रथमेश आहेर, तेजस पवार, मुसद्दीक अन्सारी,आदित्य गोसावी(मार्गदर्शक). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे उपप्राचार्य प्रा. पंढरीनाथ दिसागज, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. वैभव सोनवणे ,परीक्षा विभाग प्रमुख प्रा. धनंजय पेहेरकर, क्रीडा विभाग प्रमुक डॉ. निलेश नाईक, प्रा. शंकर शिंदे, प्रा. रामदास चव्हाण, श्रीमती राजवाळ मॅडम, प्रा. धनराज चव्हाण, प्रा, शत्रुघ्न बोरसे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आ...
02/09/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. कैलास चौधरी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊसाहेब हिरे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी सांगितले की, खेळामुळे विद्यार्थ्यांचे मन आणि मनगट मजबूत होते. या महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे व संस्थेचे नावलौकिक वाढवला आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी निर्माण होतात. परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडवायचा असल्यास जीवनात खेळाचे महत्व आहे. तंदुरुस्त शरीर तणाव नैराश्य कमी करते. तसेच मानसिक विकास खेळामुळे साधला जातो. असे बहुमोल मार्गदर्शन प्राचार्य गमे यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रमुख पाहुणे असलेले प्रा. कैलास चौधरी यांनी याप्रसंगी असे सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना विकसित होण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे. आज मैदानी खेळ कमी होत चालले आहेत कारण मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक व्याधी निर्माण झाल्या आहेत. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर आपले उच्च क्रीडा कौशल्य वेळोवेळी दाखवले असल्याचे प्रा. कैलास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी चि. यशपाल हनवते याची नाशिक विभाग योगासन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याकरिता क्रीडा प्रमुख प्रा. प्रदीप वाघमारे व मार्गदर्शक प्रा. निलेश नाईक यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामप्रसाद वाव्हळ यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलेश नाईक यांनी केले. तर आभार उपप्राचार्य प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले. या कार्यक्रमास कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. वैभव सोनवणे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. धनंजय पेहेरकर, प्रा. रामदास चव्हाण, प्रा. शंकर शिंदे, प्रा. श्रीमती सुरेखा राजवाळ, प्रा.धनराज चव्हाण, प्रा. कैलास चौधरी, प्रा. मोहन सोनवणे, पाटील, प्रा. संजय करंजकर, श्री. प्रल्हाद जाधव, श्री. सोमनाथ कुवर यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथे "जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन" साजरा...
21/08/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथे "जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन" साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. कार्यक्रमाची सुरवात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे व महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार व वंदन करून झाली. व प्रा. आर.एस. चव्हाण यांनी आदिवासी बांधवांविषयी माहिती दिली.

महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचालित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथे अपूर्व दत्तक योजनेंतर्गत प्रतिकूल पर...
05/08/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचालित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथे अपूर्व दत्तक योजनेंतर्गत प्रतिकूल परीस्थितीतशिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, येवला येथील विद्यार्थ्यांनी एस एन डी इंग्लिश मीडियम प...
04/08/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, येवला येथील विद्यार्थ्यांनी एस एन डी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल बाभुळगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय योगासन शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

01/08/2024
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला  येथील ग्रंथालयामार्फत इयत्ता ११ वी आणि १२ वी ...
27/07/2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथील ग्रंथालयामार्फत इयत्ता ११ वी आणि १२ वी कला व वाणिज्य वर्गातील विद्यार्थांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

Address

Arts & Commerce Junior College
Yeola
423401

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts & Commerce Junior College, Yeola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category