R A College

R A College The best college in whole district The Institute holds pride in being one of the selected few colleges in India to have accreditation from NAAC at the A Grade.

National Assessment and Accreditation Council (NAAC) is an autonomous institute of the University Grant Commission ( UGC). It access educational institutes on several criteria such as curricular aspects, teaching- learning evaluation, research, infrastructure and management.

05/02/2016
20/01/2015

आज झालेल्या मिटिंग मध्ये आर . ए कॉलेज च्या सांस्कृतिक महोत्सवाची तारीख जाहीर . येत्या २८,२९ क्रीडा तसेच ३०,३१
ला संस्कुतिक कार्यक्रम पार पडणार आहेत . सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटक मा .श्री ज्ञानेश वाकुडकर (सखे साजणी )नागपूर .

अकोला येथे वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा स्पोर्ट बॉक्स असोसिएशनची खेळाडू ब...
06/01/2015

अकोला येथे वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा स्पोर्ट बॉक्स असोसिएशनची खेळाडू बेबी दिग्रसकर हीने मुलीच्या ४८ ते ५१ वजन गटामध्ये रौप्यपदक मिळविले. आई-वडील व प्रशिक्षक रणजित कथडे यांच्यासह प्रशिक्षक सुजता इंगळे व राजस्थान महाविद्यालयाचे इंगोले यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

जागतिक रक्तदान दिनानिमित्त राजस्थान महाविद्यालयात रक्तदान शिबीररासेयो सप्ताहात पन्नास विद्यार्थ्यांनी केले रक्तदानयेथील ...
05/10/2014

जागतिक रक्तदान दिनानिमित्त राजस्थान महाविद्यालयात रक्तदान शिबीर

रासेयो सप्ताहात पन्नास विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

येथील राजस्थान महाविद्यालयात दि. १ ऑक्टोंबर रोजी जागतिक रक्तदान दिनाचे औचीत्य साधून राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या सातव्या दिवशी ५0 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या सातव्या दिवशी जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील ३९ विद्यार्थी व ११ विद्यार्थीनिंनी अशा एकूण ५0 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सरंबेकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जगाच्या पाठीवर रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाला जिवन जगण्याची संधी मिळू शकते.तर प्रमुख अतिथी प्रा.ललीत काबरा म्हणाले की, रक्तदानातून सर्वधर्म समभाव वाढीस लागत असून कोणत्या जाती धर्माच्या व्यक्तीचे रक्त जात धर्म न पाळता कोणाचाही जीव वाचवू शकत असल्याने या रक्तदानाचा गोरगरीब जनतेला जास्त लाभ मिळत असल्याने रक्तदानाचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे सांगीतले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ. के. एस. काळे, डॉ. चव्हाण, डॉ. नियल लाड, डॉ. मवाळआदी डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिलीप दाभाडे, डॉ. मिलन संचेती, डॉ. एस. ए. पवार, डॉ. अनिल बनसोड, प्रा. ज्योत्सना पाटील, प्रा. अर्चना वाटाणे, प्रा. प्रमोद घनविजय, प्रा. स्वप्नील काळबांडे, हरीभाऊ राठोड आदी प्राध्यापकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रासेयो अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ. विपनी राठोड यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देव अवचार, अमोल धनगर, कृष्णा हेंद्रे, मनिष साठे, राधेश्याम घुगे, दिपक तिडके, अभय आदमने, नागेश मसवडकर, ईश्‍वर गव्हाणे, वसंता नवघरे, विलास कोल्हे, अविनाश राऊत, कु. पुजा जाधव, कु. योगिनी खांदिल, अस्मिता इंगळे, कु. गुडदे, कु. चेतना, कु. पुनम जाधव, कु. जितकर, कु. शितल देशमुख, कु. शुभांगी मुठाळ आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

ममता बिहाडे वक्तृत्व स्पर्धेत द्वितीयराजस्थान महाविद्यालयातील कु.ममता प्रकाश बिहाडे यांचा सावित्रीबाई फुले महिला महाविद्...
05/10/2014

ममता बिहाडे वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय

राजस्थान महाविद्यालयातील कु.ममता प्रकाश बिहाडे यांचा सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात गांधी अध्ययन केंद्राद्वारे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आला आहे.

'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन व शैक्षणीक विचार' या विषयावर आयोजित झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. ममता बिहाडे यांनी महत्मा गांधीचे जीवन व शैक्षणिक विचारांचे अनेक दाखले देत. प्रगटिकरण केले. कु.ममता बिहाडे ही एक उत्तम निवेदिका असून, तीला अभियनाची सुध्दा आवड आहे. नुकत्याच रासेयो सप्ताहाच्या अंतर्गत सादर झालेल्या 'गोष्ट एका गावाची' या एकंकिकेत शिक्षिकेची उत्कृष्ट भूमिका सादर करून दाद मिळविली. तिच्या वक्तृत्वा करिता महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष राठी, प्राचार्य डॉ.एस.एल. सरम्बेकर सर, रासेयो अधिकारी डॉ.विजय जाधव, डॉ.विपीन राठोड, डॉ.अनिल बन्सोड यांचे मार्गदर्शन मिळाले.

स्थानिक राजस्थान आर्य महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग...
23/08/2014

स्थानिक राजस्थान आर्य महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डी.सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन अभ्यास मंडळ स्थापना करण्यात आली. कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. वाणिज्य अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी रवी अंभोरे, उपाध्यक्षपदी गोपाल अहीर, कोषाध्यक्ष अमोल माने, सचिव डिगांबर इढोळे, सदस्य पद हर्षा डोईफोडे, राधिका मुंदडा, मयुरी पिसे, प्रियंका तायडे, पुजा असले, निलेश राऊत, चंद्रकांत गावंडे, शुभांगी भिसे, कल्याणी मोरे, किरण खडसे यांची नियुक्ती करण्यात आले. या सभेला प्रा.डॉ.कमल अग्रवाल, प्रा.डॉ.विणा वर्‍हाडे, प्रा.दिनेश इंगळे, डॉ.आर.पी. इंगळे आदीची उपस्थिती होती. या मंडळाच्या अंतर्गत विविध विषयावर तज्ञ पाहुण्याचे मार्गदर्शन शैक्षणिक सहत्य, व्यक्तीमत्व विकास शिबिर असे अनेक कार्यक्रम वर्षभर होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

14/01/2013

Being a Soldier

17/07/2012

Applications are invited for the post of Young Leaders who can take initiative and collect people in large numbers for the 26 July(Thursday) Kargil Diwas -Candle Light march in all the cities across Mothernation India.
Fill the required details like
Name
Contact info
E-mail id
Place where you want to hold the gathering
Route
Time.

And send the Details to us at
[email protected] and mention the subject as 'Kargil Diwas March'"

Jai Hind!!!

Address

Nr. Collector Office, Kata Road
Washim
444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when R A College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to R A College:

Shortcuts

Share

Category