29/01/2026
*'जनता गर्ल्स हायस्कूल'च्या विद्यार्थिनींचे दैदिप्यमान यश; 'ए मेरे वतन' स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक*
शेंदुर्जना घाट
येथील जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्रांतीसूर्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'ए मेरे वतन' या भव्य नृत्य स्पर्धेत शाळेच्या मुलींनी 'ब' गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
देशभक्तीने प्रेरित असलेल्या या स्पर्धेत वरुड तालुक्यातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग नोंदवला होता. मात्र, जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्य अविष्काराने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या या सादरीकरणातून प्रबळ राष्ट्रभक्ती, आदिवासी संस्कृती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या ऐतिहासिक विजयात खालील विद्यार्थिनींचा सहभाग होता:
* कु. श्रुतिका सूर्यभान उईके
* कु. श्रावणी मनोज खंडारे
* कु. अश्विनी कमलाकर युनाते
* कु. संजना ज्ञानेश्वर कवडे
* कु. हिमांशी महादेव आहाके
* कु. रूपाली रूपचंद वाडीवे
* कु. शालू प्रवीण शिवणकर
* कु. तनुश्री हरिश्चंद्र कानडे
* कु. वंशिका राजेश परतेती
* कु. सलोनी प्रफुल आकर्ते
* कु. अर्पिता अनिल तूमडाम
* कु. सुनाक्षी किशोर उईके
* कु. साक्षी नरेंद्र कवडे
या यशामागे शाळेतील शिक्षक श्री.संजय डोक सर, श्री. पंकज व्हेराटे सर आणि कोरिओग्राफर शीतल युनाते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेतले होते. तालासुरांचा सराव, शिस्त आणि कोरिओग्राफीवर दिलेला विशेष भर यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाने प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय डॉ. मायताई हिवसे मॅडम, पर्यवेक्षक श्री प्रमोद येवले आणि इतर शिक्षक वृंदानेही या यशाचे स्वागत केले आहे. या विजयामुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे आणि आनंद पसरले आहे.