Dr R G Bhoyar Arts, Commerce and Science College Seloo

Dr R G Bhoyar Arts, Commerce and Science College Seloo To provide education to all class of Society

21/05/2026
20/05/2026
डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म...
14/04/2026

डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम पंचारीया यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. नागदिवे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. करुणा गणवीर आणि डॉ. के. डंभारे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.या सोहळ्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या स्नेहाचे प्रतीक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा छोटा सुबक पूर्णकृती पुतळा महाविद्यालयाला भेट दिला. प्राचार्य डॉ. राम पंचारीया यांनी हा प्रेमोपहार स्वीकारला.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. अभिजित पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. शशांक निकम यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. आर. जी. भोयार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सेलू येथे “प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे य...
20/03/2026

डॉ. आर. जी. भोयार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सेलू येथे “प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. एम.बी.ए. व एम.कॉम. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत संशोधन पद्धती, सिनॉप्सिस लेखन व प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी एकूण ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम ओ. पंचारिया होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आशिष लिंगे (सेशन एक्स्पर्ट) यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आवश्यक असलेल्या बाबी, संशोधनाची अचूक पद्धत व लेखनातील शिस्त याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रा. दिपाली काळे व प्रा. पंकज राठी यांचीही उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंका उपस्थित केल्या, ज्यांचे निरसन तज्ज्ञांकडून करण्यात आले.
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन व लेखन कौशल्यात वाढ होईल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

*Dr. R. G. Bhoyar Arts, Commerce & Science College, Seloo**Notice* All the students are hereby infomed to remain present...
17/03/2026

*Dr. R. G. Bhoyar Arts, Commerce & Science College, Seloo*

*Notice*

All the students are hereby infomed to remain present for Prize & Certificate Distribution Ceremony and Inauguration of Certificate Course in Vermiculture & Vermicomposting.

📅 Date: Tuesday, 17-03-2026
⏰ Time: 2.00 PM
📍 Venue: Seminar Hall
Agenda:
- Inauguration of Certificate Course
- Prize & Certificate Distribution for Skill-Based Training Programme (11-13 March 2026)

Join us to explore sustainable practices...

Regards,

Dr. Ram Panchariya (Principal)
Dr. Vaishali Badwaik (Course Coordinator)

सेलू येथील डॉ. आर. जी. भोयर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे “Certificate Course in Artificial Intelligence” या प्रम...
16/03/2026

सेलू येथील डॉ. आर. जी. भोयर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे “Certificate Course in Artificial Intelligence” या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम पंचारिया होते. यावेळी एआय व पायथन ट्रेनर श्री. राजेश इंगळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून Artificial Intelligence या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रांतील उपयोग, तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. वसीम खान यांचीही उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. राम पंचारिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कौशल्यविकासाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. या अभ्यासक्रमाचे समन्वयक श्री. सोनल पंचभाई असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

*DR. R. G. BHOYAR ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, SELOO, WARDHA* *ORGANIZING**ONE DAYS WORKSHOP ON PROJECT REPORT WRIT...
15/03/2026

*DR. R. G. BHOYAR ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, SELOO, WARDHA*
*ORGANIZING*
*ONE DAYS WORKSHOP ON PROJECT REPORT WRITING*
Date: 20th March 2026
Time: 11.00 AM To 2.00 PM
*For MBA & M.Com. Students*

*Resource Person:*
*Dr. Ashish Linge*
Founder Director
Research Vidya
Associate Professor
C. P. & Berar College, Nagpur

*Certificate of Participation to AlI Participants*

*Registration Fee : ₹ 300/-*

Venue: Department of Commerce & Management, Indraprastha New Arts, Commerce & Science College Wardha

*Registration Link: https://forms.gle/aEA5nkQWLvPjVYP87*
*For Details Call: 9370932600*

Address

Mohanapur
Wardha
442104

Telephone

+917155299036

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr R G Bhoyar Arts, Commerce and Science College Seloo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr R G Bhoyar Arts, Commerce and Science College Seloo:

Shortcuts

Share

Category