श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर

  • Home
  • India
  • Walchandnagar
  • श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर

श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर, Education, Walchandnagar.

Aamhi Wardhamaniy | आम्ही वर्धमानीय ♥️
विद्यार्थ्यांचे फोटोज, व्हिडिओज काही मेमरीज
इंटरेस्टिंग फॅक्ट्स, gk facts, Educational videos , Scholarship scheme
आजी-माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचा कट्टा 🏫
नॉस्टॅल्जिया • मस्ती • रील्स
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
अर्थ (मराठीत):
या जगात ज्ञानाइतके पवित्र (शुद्ध) असे दुसरे काहीही नाही.
ज्ञान मनुष्याला अज्ञानातून मुक्त करून आत्मिक उन्नतीकडे नेते.
🌼 भावार्थ:
धन, पद, शक्ती नव्हे
तर खरे ज्ञानच माणसाला महान बनवते

22/08/2026

इंजीनियरिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी.
TFWS योजना म्हणजेच ट्युशन फी माफी योजनेमुळे 100% पर्यंत फी माफी होते.

22/08/2026
17/08/2026

💰 स्कॉलरशिप

📚 इयत्ता 9वी ते 12वी — ₹15,000
🎓 Graduation — ₹75,000
🎓 Post-Graduation — ₹1,50,000
🩺 MBBS — ₹2,00,000 पर्यंत

📌 माहिती व पात्रता निकष

✅ मागील शैक्षणिक वर्षात साधारणपणे 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण
✅ 9वी–12वी विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत
✅ Graduation/Post-Graduation साठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹6 लाखांपर्यंत
✅ उच्च शिक्षणासाठी संबंधित संस्थेच्या पात्रतेच्या अटी लागू

📅 अंतिम दिनांक — 4 सप्टेंबर 2026

*आमच्या संस्थेकडे फॉर्म भरायचा असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा. किंवा तुम्ही स्वतःही जवळच्या ई सेवा केंद्रात फॉर्म भरू शकता.*

📲 अधिक माहितीसाठी संपर्क:
8208134646

⚠️ ONLY WHATSAPP
🚫 फोन कॉल करू नये.

🏆 स्मार्ट स्कॉलरशिप कन्सल्टन्सी

📌 पात्र विद्यार्थी व पालकांनी ही माहिती Save + Share करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.

15/08/2026

माझं मूल हुशार आहे… मग गुण का कमी येतात? 🤔

मुलांची बुद्धिमत्ता कमी नसते; अनेकदा पालकांच्या काही छोट्या चुका त्यांच्या अभ्यासावर परिणाम करतात.

⏰ वेळ मोजण्यापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता महत्त्वाची!
📱 मोबाईल-टीव्हीमुळे लक्ष विचलित होऊ शकते.
📚 फक्त शिकवणी नाही, तर समजून शिकणे गरजेचे!
❓ मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लावा.

आजपासून एक बदल करा… आणि मुलांच्या अभ्यासात फरक जाणवा! ❤️

📌 हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत SHARE करा.
👉 अशाच Parenting Tips साठी FOLLOW करा.

⚠️ पुढच्या भागात — इतर मुलांशी तुलना: पालकांची सर्वात धोकादायक चूक!

#पालकांच्याचुका #मुलांचेशिक्षण #पालक #अभ्यास #विद्यार्थी

13/08/2026

🎓 HDFC परिवर्तन स्कॉलरशिप 2025-26
💰 ₹15,000 ते ₹75,000 पर्यंत शैक्षणिक मदत!
✅ इयत्ता 1ली ते 12वी
✅ Diploma / ITI / Polytechnic
✅ Graduation – General व Professional
✅ Post-Graduation – General व Professional
📊 मागील परीक्षेत किमान 55% गुण आवश्यक.
💵 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
⭐ मागील 3 वर्षांतील कौटुंबिक/वैयक्तिक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य. �
HDFC Bank ECSS Programme
💰 अभ्यासक्रमानुसार मदत
इयत्ता 1–6 → ₹15,000
इयत्ता 7–12 / Diploma / ITI / Polytechnic → ₹18,000
General Graduation → ₹30,000
Professional Graduation → ₹50,000
General PG → ₹35,000
Professional PG → ₹75,000 �
HDFC Bank ECSS Programme
📲 अधिक माहितीसाठी “HDFC” कमेंट करा आणि ही माहिती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

Top Colleges
13/08/2026

Top Colleges

12/08/2026

🏆 श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 🏆

पुणे जिल्हा कुमार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील 5 किमी जलद चालणे या स्पर्धेत
🥇 प्रथम क्रमांक – यश कुलकर्णी
🥈 द्वितीय क्रमांक – अनुरंग फडतरे

दोन्ही खेळाडूंची रूणागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड! 🇮🇳🏃‍♂️

जिल्ह्यात चमकले… आता राज्यात गाजणार! 🔥

हार्दिक अभिनंदन व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🏆

#श्रीवर्धमानविद्यालय #वर्धमानविद्यालय #अभिनंदन #राज्यस्तरीयस्पर्धा

05/08/2026

🏆 यशाचा सन्मान... प्रेरणेचा उत्सव! 🌟
वालचंदनगर माजी विद्यार्थी मंडळ, पुणे यांच्या वतीने कै. अंजली सातपुते व कै. यशवंत सातपुते यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य सत्कार व शिष्यवृत्ती प्रदान समारंभ.
या प्रेरणादायी सोहळ्यात श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
📅 दिनांक: ९ ऑगस्ट २०२६ (रविवार)
🕠 वेळ: सायंकाळी ५:३० वाजता
📍 स्थळ: पद्मजी हॉल, टिळक रोड, पुणे
✨ चला, विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करूया आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेचा भाग बनूया!
👇 या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर कमेंटमध्ये "🌟 अभिनंदन" नक्की लिहा आणि ही पोस्ट शेअर करा.



Hemant Dhome Prakash Khot श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर Suraj More

30/07/2026

पालकांनो सावधान! शाळा-कॉलेज कॅन्टीनमध्ये आता मोठा बदल!
FDA च्या नव्या नियमानुसार तळलेले पदार्थ, साखरयुक्त पदार्थ आणि कोल्ड्रिंक्सच्या विक्रीवर निर्बंध!
आदेश मोडल्यास कडक कारवाई. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या!

26/07/2026

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री वर्धमान विद्यालयाचे घवघवीत यश

नव्या स्वरूपातील पहिल्याच परीक्षेत १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र; ४४.८२ टक्के निकालाने विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम

वालचंदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने यावर्षी प्रथमच इयत्ता सातवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी होत होती. बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर नवीन आव्हान उभे राहिले होते. मात्र, या आव्हानाला समर्थपणे सामोरे जात श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटविला आहे.

या परीक्षेस विद्यालयातील २९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाचा ४४.८२ टक्के निकाल लागला आहे. नव्या स्वरूपातील पहिल्याच परीक्षेत मिळविलेले हे यश विद्यार्थ्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे फलित मानले जात आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी दबडे (२३४ गुण), वेदिका रणमोडे (२२२ गुण), संस्कृती सावंत (२१० गुण), हर्षाली कुंभार (२०६ गुण), नंदिनी तरडे (१९० गुण), रुद्र सोकांडे (१९० गुण), अरमान आळंद (१८६ गुण), समृद्धी शिरतोडे (१८४ गुण), मयुरेश मेटकरी (१७४ गुण), साक्षी सोनटक्के (१७४ गुण), धनराज रणमोडे (१७० गुण), सई रणमोडे (१६६ गुण) आणि अनघा यादव (१५४ गुण) यांचा समावेश आहे.

या यशामागे सौ. ए. आर. पांढरपट्टे, सौ. एस. एस. हिप्परकर, सौ. एस. एस. आगलावे आणि सौ. एस. जी. मुसळे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, सराव, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष श्री. मकरंद वाघ, उपाध्यक्ष श्री. प्रशांत महामुनी, प्राचार्य श्री. हनुमंत कुंभार, उपप्राचार्य श्री. रामनाथ नाकाडे, उपमुख्याध्यापक श्री. शिवप्रसाद कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. अनिल उबाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या या यशामुळे पुढील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून, "मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते," हा संदेश या निकालातून अधोरेखित झाला आहे.

– लेखन : श्री. सुरज मोरे
#शिष्यवृत्ती #इयत्ता7वी #विद्यार्थी #शैक्षणिकयश #मराठी

Address

Walchandnagar

Telephone

02118252269

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category