08/04/2021
कमवा व शिका योजने अंतर्गत
आता हॉटेल मॅनेजमेंट सातारा , अकलूज आणि महाबळेश्वर मध्ये
सध्या हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी तरुणांचा कल वाढत चालला असून, अनेक तरुणांना हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी मुंबई, पुणे येथे जावे लागत आहे. बाहेरगावी जाऊन हा कोर्स करणे तरुणांना खर्चिक ठरत आहे. त्यामुळे अनेक तरुण प्रबळ इच्छा असून सुद्धा जास्त खर्च होतो म्हणून बाहेरगावी जात नाहीत. परंतु आता या कोर्स साठी पुणे, मुंबई ला जाण्याची गरज नसून, सातारा येथील अॕम्बिशन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ची शाखा अकलूज येथील हॉटेल सुजीत गार्डन येथे सुरु झाली असून, या ठिकाणी प्रवेश देणे सुरु झाले आहे.
हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमा मध्ये इ.10 वी ,12 वी आणि पदवीधर पास नापास विद्यार्थ्यांना अल्प फि मध्ये हाॅटेल मॅनेजमेंट शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी अकलूज येथे उपलब्ध झाली असून, बाहेरगावच्या विद्यार्थी यांचे साठी शाखेच्या वतीने
एस टी पासची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच
अनुभवी शिक्षक, याशिवाय
वैयक्तिक मार्गदर्शन,
सुसज्जअशी कार्यशाळा घेण्यात येणार असून,यासाठी प्रवेश फी देखील अतिशय माफक आहे. सातारा, महाबळेश्वर पाठोपाठ आता अकलूज मध्ये शाखा सुरु झाली असून, अधिक माहिती साठी
संपर्क क्र.9130819288, 9960725588.नाना गायकवाड
या नंबर वर संपर्क साधावा. आणि आपला प्रवेश निश्चित करावा. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर 100%नोकरी ची संधी उपलब्ध होणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअर
अलीकडे तंत्रज्ञानाच्या स्फोटाबरोबर मानवी राहणीमानाचा दर्जाही सुधारला आहे. दळणवळणाची असंख्य साधने निर्माण झाल्याने या प्रदेशातून त्या प्रदेशात भ्रमंती करणे आता सहज शक्य आणि सोपे झाले आहे. अर्थात गेल्या काही वर्षात देशाला पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पनात वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही सुगीचे दिवस आले आहेत. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय याचा अनन्यसाधारण संबंध आहे. तसे पाहता आपल्याकडे खवय्यांची संख्या जास्त आहे. हमखास सुट्टीच्या दिवशी हॉटेलात जाणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. दरडोई उत्पन्न वाढल्याने त्याच्या आवडीनिवडी तो जोपासू लागला आहे. अगदी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मालवणी, अस्सल आगरी, वऱ्हाडी, पंजाबी असे जेवणाचे प्रकार प्रसिद्ध आहेत. उत्तम पद्धतीने विविध पदार्थ बनवुन देणाऱ्या अनेकास खूप मागणी असल्याचे आपण पाहतो. फाईव्ह स्टार ते सेव्हन स्टार अशी ही हॉटेल इंडस्ट्री विस्तारत आहे. रोजगाराच्या अमाप संधी इथे उपलब्ध असल्याने जागतिक मंदीचाही परिणाम या क्षेत्रावर झालेला नाही. भविष्यात या क्षेत्रात अफलातून करिअरच्या अफलातून संधी असल्याने त्या अनुषंगाने या क्षेत्रातील इतर बाबींचा घेतलेला आढावा खास संघर्ष योद्धा पोर्टल साठी.
पात्रता
बारावीनंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. तसेच बारावीत इंग्रजी विषय अनिवार्य आहे. प्रवेशासाठी जेईई आणि महाराष्ट्र शासनाची एमएचसीईटी(हॉटेल मॅनेजमेंट) या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
उपलब्ध कोर्सेस
• मास्टर / बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
• मास्टर / बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पीटॅलीटी अँड हॉटेल अॅडमीनीस्ट्रेशन
• डिप्लोमा इन हॉटेल अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
• हाउसकिपिंग, वेटर, बेकरी, कुकरी (कमी कालावधीचे कोर्सेस)
कामाच्या संधी
या क्षेत्राची सद्यस्थिती उत्तम असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. नोकरीसाठी प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट पद्धतीने कॉलेज किंवा प्रशिक्षण संस्थाही प्रयत्न करतात. फाईव्ह स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट, एअरलाईन्स फुड सर्विस देणाऱ्या संस्था, हॉस्पिटल, कॉर्पोरेट कँटीन, मॉल्स, रेल्वे, शिपिंग तसेच फास्टफुड क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. तसेच पुरेशा अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करता येईल.
या विभागात तुमची गरज भासेल..?
फ्रंट ऑफिस, हाऊस किपिंग, फूड अँड बेव्हरेजेस विभाग, अकौंटिंग विभाग, सेक्युरिटी विभाग, बँक्वेट विभाग, बिझिनेस सेंटर, मार्केटिंग विभाग, इंजिनिअरिंग किंवा मेंटेनन्स विभाग. कल आणि आवडी निवडीनुसार कामाची निवड करता येते.
वेतन
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १८ ते २२ हजारापर्यंत सुरुवातीस वेतन मिळू शकते. अनुभवानंतर चांगले आकर्षक पॅकेज मिळते. तसेच परदेशी गेल्यास उत्तम पगाराच्या संधी मिळतात. स्वतः व्यवसायात उतरल्यास अमर्यादित आर्थिक उत्पन्न मिळू शकते. चला तर मग, आजच आपला प्रवेश निश्चित करूयात.
#पंढरपूर #करमाळा #मोहोळ #सोलापूर #मगंळवेढा #माढा #अककलकोट #माळशिरस #महाराष्ट्र #सातारा #सागंली #कराड