13/09/2025
रामराव आदिक पब्लिक स्कूल ची तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत दुहेरी विजयी घोडदौड
🏆🏆🎉🎉
रामराव आदिक पब्लिक स्कूल ने तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अंडर-17 मुलींच्या व अंडर-19 मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयांमुळे दोन्ही संघांनी जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून, हे विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद यश आहे.🎉
या यशामध्ये क्रीडा प्रशिक्षक किरण काहंडळ सर, अभिषेक आढागळे सर व अक्षदा यादव मॅडम यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.