Ujjwala Classes

Ujjwala Classes

Share

Ujjwala Classes offers classroom coaching in all subjects in Commerce from 11th to M. com, CA, and CS The class was estabished by our Honorable " Guru " Shri B.

Ujjwala Classes Private Limited is a renowned name today among the Commerce students as well as faculty community both in and outside Ratnagiri. J. Halbe in 1980. From 2006 onwards it opened the doors for professional studies for students who were looking for such ....The class is credited to create conducive and competitive environment . The faculties are expert and dedicated for students. They p

15/01/2025
Photos from Ujjwala Classes's post 05/09/2024

आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. ज्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या त्या ठिकाणी या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षक म्हणजे फक्त दुसऱ्याला शिकवणं नव्हे तर विद्यार्थ्यांची जडणघडण करणं आहे आणि नुसतीच जडणघडण नव्हे हो तर ते करता करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून समाज घडवणं आहे.

आमच्या उज्वला क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी देखील पुढाकार घेऊन आजचा हा शिक्षक दिन मोठ्या जोमाने साजरा केला. मुलांना थोडासा वाव दिला की त्यांच्या डोक्यातून सुपीक कल्पना बाहेर निघतात आणि निर्मळ मनाने त्या स्वीकारल्या तर वेगाने सर्वांपर्यंत पोहोचतात. आमचे सीए चे विद्यार्थी म्हणजे दिवस रात्र वही पुस्तक घेऊन फिरणारे. त्यांच्या ध्यानी आणि मनी अभ्यास एके अभ्यास. कोर्सची गरजच ती आहे म्हणा. पण अशा प्रसंगी मात्र थोडसं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन आमच्या सर्व मुलांनी आज दमदार कार्यक्रम सादर केला. हातात फार कालावधी नसताना देखील सीए इंटरमिजिएट आणि सीए फाउंडेशन चे सर्व विद्यार्थी एकत्र आले. गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत तरीही काही खंद्या कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना समोर मांडली. शास्त्रोक्त पद्धतीने परवानगी घेऊन सहकारी शिक्षकांना थांगपत्ता लागू न देता अर्थातच सरप्राईज देण्यासाठी हा सगळा घाट घातला.

रात्रीचा दिवस करून सगळी मेहनत केली. बारीक निरीक्षणे, शिक्षकांच्या आवडीनिवडी, सवयी या सगळ्याचा विचार करून कार्यक्रमांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी करण्यात आली. फुगे लावून वर्गखोली सुंदर सजवली होती. कधी ते फुगे फुगवले नी नेऊन वर्गात लावले ते देवास ठाऊक! एखाद्या सराईताप्रमाणे विद्यार्थ्यांनी पटापट सगळी तयारी करून शिक्षकांना खास आमंत्रण देऊन वर्गामध्ये आमंत्रित केले. गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपामध्ये फाउंडेशन तसेच इंटरमिजिएट च्या मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली. सर्वांच्या बोलण्यातून शिक्षकांविषयी चा आदर, आपुलकी प्रेम अगदी बातम्यांच्या ठळक शीर्षकांप्रमाणे दिसत होते. हीच वेळ असते जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात. हीच शिक्षकांची कार्याची पोचपावती नव्हे का! विद्यार्थ्यांची मनोगते झाल्यानंतर शिक्षकांनाही संधी देण्यात आली. अहो ज्याचं तोंड सतत एखाद्या यंत्राप्रमाणे वर्गामध्ये चालत असतं त्या शिक्षकाला आजच्या कार्यक्रमांमध्ये बोलायला द्यायचं नाही म्हणजे शिक्षाच हो! याची जाण ठेवून आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला देखील लगेचच आमचे विचार मांडण्याची विनंती केली. वेळेचे बंधन असल्यामुळे सर्व शिक्षकांनी आपापले विचार थोडक्यात पण मार्मिक पद्धतीने मांडले. तसं बघायला गेलं तर भाषणबाजी नेहमीचीच असते, म्हणूनच आमच्या मुलांनी एक गंमतीशीर उपक्रम राबवला. या उपक्रमात क्लास मधील काही शिक्षकांची मिमिक्री करण्यात आली. अर्थातच परवानगी घेऊन. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि उज्ज्वला क्लासेस चा परिवार अगदी मनसोक्त आणि खळखळून हसले. सगळा थकवा, शीण चुटकीसरशी गायब झाला. पुन्हा एकदा नव्या जोमाने, जोशाने सगळे जण पुढील वाटचालीसाठी तयार झाले. फोटोसेशन, पेढे वाटप याने कार्यक्रमाची गोड सांगता झाली.

आयुष्याच्या पुढच्या वळणावर कधीतरी विसावताना याच सगळ्या आठवणी आम्हा शिक्षकांचा आनंद उत्साह द्विगुणीत करतील यात शंका नाही.

Photos from Ujjwala Classes's post 09/03/2024

Seminar at your place.... Do visit..

Photos from Ujjwala Classes's post 09/02/2024
Photos from Ujjwala Classes's post 08/02/2024

CA Fᴏᴜɴᴅᴀᴛɪᴏɴ 2023 ʀᴇsᴜʟᴛs ᴀʀᴇ ᴅᴇᴄʟᴀʀᴇᴅ.

Cᴏɴɢʀᴀᴛᴜʟᴀᴛɪᴏɴs ᴇᴠᴇʀʏᴏɴᴇ!! Yᴏᴜ’ᴠᴇ ᴘᴜᴛ sᴏ ᴍᴜᴄʜ ʜᴀʀᴅ ᴡᴏʀᴋ ɪɴ ᴀɴᴅ ɪᴛ ᴘᴀɪᴅ ᴏғғ.

5 AIR ᴀᴛ CA Fᴏᴜɴᴅᴀᴛɪᴏɴ ʟᴇᴠᴇʟ, 2 AIR ᴀᴛ CA Fɪɴᴀʟ ʟᴇᴠᴇʟ ᴀɴᴅ 1 AIR ᴀᴛ CA Iɴᴛᴇʀᴍᴇᴅɪᴀᴛᴇ Lᴇᴠᴇʟ, ᴏᴜʀ sᴛᴜᴅᴇɴᴛs ᴀɴᴅ ᴏᴜʀ ᴛᴇᴀᴍ ʜᴀs ᴀʟᴡᴀʏs ᴍᴀᴅᴇ ᴜs ᴘʀᴏᴜᴅ.

Wᴇ ᴀʀᴇ ᴇxᴛʀᴇᴍᴇʟʏ ʜᴀᴘᴘʏ ᴛʜᴀᴛ ᴏᴜʀ ᴛᴇᴀᴍ ᴇғғᴏʀᴛs ʜᴀs ʟᴇᴅ ᴜs sᴜᴄᴄᴇssғᴜʟʟʏ ᴀᴄʜɪᴇᴠᴇ ᴛʜᴇ ʀᴇsᴜʟᴛ ᴏғ 71.01% ᴡʜɪʟᴇ ᴛʜᴇ Aʟʟ Iɴᴅɪᴀ ʀᴇsᴜʟᴛ ɪs 29.99%
46.95% ᴏғ ᴛʜᴇ Sᴛᴜᴅᴇɴᴛs ʜᴀᴠᴇ ᴄʟᴇᴀʀᴇᴅ CA Fᴏᴜɴᴅᴀᴛɪᴏɴ Dᴇᴄᴇᴍʙᴇʀ 2023 Exᴀᴍ ᴡɪᴛʜ Dɪsᴛɪɴᴄᴛɪᴏɴ.
Wɪᴛʜ ᴛʜᴇ Sᴀɴᴋᴀʟᴘ ᴏғ 100% Sᴜᴄᴄᴇss, ᴡᴇ ᴀʀᴇ ɢʟᴀᴅ ᴛᴏ ᴀɴɴᴏᴜɴᴄᴇ ᴏᴜʀ Cᴏᴍᴘʀᴇʜᴇɴsɪᴠᴇ Sᴜʀᴇ Sᴜᴄᴄᴇss Bᴀᴛᴄʜ ғᴏʀ CA Fᴏᴜɴᴅᴀᴛɪᴏɴ Dᴇᴄᴇᴍʙᴇʀ 2024 ᴀɴᴅ CA Iɴᴛᴇʀᴍᴇᴅɪᴀᴛᴇ Nᴏᴠᴇᴍʙᴇʀ 2024.

Want your school to be the top-listed School/college?

Telephone

Opening Hours

Monday 07:00 - 19:00
Tuesday 07:00 - 19:00
Wednesday 07:00 - 19:00
Thursday 07:00 - 19:00
Friday 07:00 - 19:00
Saturday 07:00 - 19:00
Sunday 07:00 - 19:00