23/03/2020
*एक विनम्र आवाहन-आपल्या प्रिय देशासाठी*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*Nation Builder शिक्षकांसाठी*
*चला आपणही कोरोनाला हरवूया | आपला देश आपणच वाचवूया||*
😷😷😷😷😷😷😷😷😷
सर्व शिक्षकांजवळ आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे फोन नंबर आहेतच. आपण एक वर्गशिक्षक या नात्याने आपली नैतिक जबाबदारी म्हणून *पालकांनी व आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ घरातच थांबावे, अतिशय आवश्यकता असल्यासच बाहेर पडताना मास्क अथवा स्वच्छ रुमाल तोंडावर बांधूनच बाहेर पडावे, बाहेरून आल्यावर तसेच काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुवावे,* हे त्यांना फोनवर सांगून एका भल्या मोठ्या राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा.
*हे आपण का करावे?* तर शिक्षकांना आजही समाजात एक विशिष्ट मान आहे आणि विद्यार्थ्यासाठी शिक्षकांचे शब्द अंतिम सत्य आहे. शिक्षकांनी स्वतः फोन करून आवाहन केल्यास विद्यार्थी आणि पालक यात चांगली जनजागृती तर होईलच त्या बरोबर तुमच्यातील व त्यांच्यातील नातेही घट्ट होईल. *70-80-100 फोन केल्याने आपला बॅलेंस कमी होईल, थोडा त्रास ही होईल, हे करतांना थोडा इगोही आडवा येईल परंतु अश्या क्षुल्लक बाबींचा आपण विचार करणार नाही अशी आशा आहे.*
देशातील प्रधानमंत्र्यांसह, सर्व मंत्री आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत तर *आपण घरी बसल्या बसल्या हव्या त्या वेळेत एवढे एक ते दीड तासाचे छोटेसे राष्ट्रीय कार्य तर नक्कीच करू शकतो.* Work from home च्या आदेशाचाच एक भाग समजून हे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावू या!
*कृपया या मेसेजला लाईक कुणीच करू नका, forward जरूर करा. मात्र तुम्ही हे कर्तव्य बजावल्याबद्दल कर्तव्य बजावले असा एक मेसेज जरूर टाका, कदाचित तोच दुसऱ्याला ही प्रेरणादायी ठरेल..........*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
😷😷😷😷😷😷😷😷😷
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻