Brain Powers India

Brain Powers India

Share

Brain Powers India acts as education and career consultancy

28/04/2026
Photos from Brain Powers India's post 28/04/2026

परिवहन मंत्री ( महाराष्ट्र राज्य) आदरणीय श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित एक अविस्मरणीय भेट...यावेळी मी माझे पुस्तक
रहस्य मुलांच्या यशाचे ....हे पुस्तक भेट दिले

25/04/2026

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आज वाढदिवस त्यांना माझे रहस्य मुलांच्या यशाचे हे पुस्तक भेट दिले ...साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉

आपल्या नेतृत्वाखालीव महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेत नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. जनतेला सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहात. आपल्या कार्यातून समाजाच्या प्रगतीसाठीची आपली तळमळ स्पष्टपणे दिसून येते.

आपल्या या वाढदिवसानिमित्त आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपण असेच जनतेची सेवा करत राहा, हीच सदिच्छा.

पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🙏

28/12/2025

*मुलांच्या यश, आत्मविश्वास आणि चांगल्या सवयींसाठी पालकांनी पाळायला हवे असे १० गोल्डन रुल्स*

🎯प्रेम आणि सुरक्षितता द्या
मुलांना प्रेम, स्वीकार आणि सुरक्षित वातावरण मिळालं तर ते निर्भयपणे शिकतात आणि वाढतात.

🎯ऐका — फक्त सल्ला देऊ नका
मुलं काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐकलं तर त्यांना आपलेपणा आणि महत्त्वाची भावना मिळते.

🎯तुलना करू नका
इतर मुलांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो — प्रत्येक मुलं वेगळी आणि खास असतात.

🎯प्रशंसा योग्य ठिकाणी करा
प्रयत्न, मेहनत आणि प्रगतीचे कौतुक करा — फक्त निकालाचे नाही.

🎯रोल मॉडेल बना
मुलं सांगितलेलं नाही तर पालकांचं वागणं कॉपी करतात — म्हणून आदर्श वर्तन दाखवा.

🎯शिस्त प्रेमाने लावा, रागाने नाही
शिक्षा न देता नियम समजावून सांगितल्याने मुलं स्वतःहून जबाबदार बनतात.

🎯स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवा
अभ्यास, खेळ, वाचन आणि क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीज यांना प्राधान्य द्या.

🎯जिज्ञासा आणि प्रश्नांना प्रोत्साहन द्या
“का?” विचारणारी मुलं जास्त शिकतात — प्रश्न विचारू द्या, रोखू नका.

🎯स्वावलंबन शिकवा
छोटी कामं स्वतः करू द्या — यामुळे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो.

🎯भावनिक शिक्षण महत्त्वाचं ठेवा
भावना ओळखणे, नियंत्रित करणे आणि व्यक्त करणे — हीच मुलांच्या यशाची पायाभरणी आहे.

🎯अधिक माहितीसाठी संपर्क करा
श्री गोरख सुतार.
ओळखा सामर्थ्य मुलांचे
संपर्क
8433569122

26/12/2025

पालकांसाठी काही महत्वाच्या टिप्स...

19/11/2025

video-5.mp4
प्रत्येक मुलाचे अभ्यास करण्याची पद्धत आणि पॅटर्न कोणते ?
मुलांचे अभ्यासात लक्ष का लागत नाही ??

16/11/2025

fb-ad-video-4.mp4
कोणत्या कारणांमुळे मुलं शिक्षण, करिअर आणि जीवनात सफल होतात???

14/11/2025

fb-video-3.mp4
मुलांनी अभ्यास कोणत्या प्रकारे केला पाहिजे??
जेणेकरून अभ्यास कायमस्वरूपी मुलांच्या लक्षात राहील

12/11/2025

पहिली ते दहावी हा अभ्यास करून मोठे यश कसे मिळवावे ??

पहिले ते दहावी हा संपूर्ण काळ मुलांच्या मेंदूचा, सवयींचा आणि अभ्यासाच्या गतीचा पाया तयार करणारा असतो.

👉म्हणून योग्य गुण (Habits + Skills) लहानपणीच विकसित केले तर मार्क्स आपोआप वाढू लागता.

👉 पहिली ते दहावी – शिकणाऱ्या मुलांचे “स्कोर वाढवणारे” 15 गुण
👉अभ्यासाशी थेट संबंधित सवयी

👉1) Daily Study Routine (दररोज 30–90 मिनिटे अभ्यास)
रोज थोडा अभ्यास = हाई रिटेन्शन
→ 5 मिनिटे वाचन, 10 मिनिटे रिपीट, 15 मिनिटे प्रश्न सोडवणे.

👉2) Attention & Focus (ध्यान केंद्रित करण्याची सवय)
25 मिनिटे “No Distraction Study Zone”
मोबाईल/टीव्हीपासून दूर.

👉3) Reading Habit (दररोज वाचनाची सवय)
Textbook + General reading
→ vocabulary, understanding, writing सुधारतं.
10 मिनिटे वाचन पूर

👉4) Concept Understanding (रटाळ अभ्यास नाही – समजून शिकणे)
“का?” “कसं?” “कशासाठी?” विचारण्याची सवय.

👉5) Practice Sheets / Problem Solving
गणित, विज्ञान, इंग्रजी—जास्तीत जास्त प्रॅक्टिस.
आज 10 प्रश्न सोडवले?

👉6) Revision Habit (रिपीटेशन)
आठवड्यातून 1 दिवस Revision Day.
आठवड्याचं revision झालं?
(B) मानसिक/भावनिक कौशल्ये

👉7) Patience & Consistency (सातत्य)
रोज थोडं काम करण्याची mental strength.
Weekly consistency
score (1–5)

👉8) Confidence Building
मुलाने शिकलेल्या गोष्टी समजवून सांगणे → आत्मविश्वास वाढतो.
मुलाने आज कोणती एक गोष्ट explain केली?

👉9) Self-Discipline (वेळेवर काम पूर्ण करणं)
Homework Time, Study Time, Sleep Time fix.
टाइमटेबल फॉलो केलं?
(C) जीवन कौशल्ये

👉10) Curiosity (जिज्ञासा – प्रश्न विचारण्याची सवय)
“Why, How, What” विचारणारी मुलं वेगाने शिकतात.
आज किती प्रश्न विचारले? (1–5)

👉11) Handwriting / Presentation Skill
पेपर neat & clean लिहिणं = direct 5–10% जास्त मार्क्स.
आजच्या writing score (1–5)

👉12) Organization & Planning
पुस्तकं नीट ठेवणे, पोउच व्यवस्थित.
School bag organized? (Yes/No)

👉15) Positive Mindset
“मी करू शकतो” attitude

👉चुका मान्य करून सुधारण्याची सवय.
Today’s Mood Score (1–5)

👉 आपण हॅबिट ट्रॅकर तयार करत असाल तर
❇️ शिक्षणामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी चार आवश्यक स्किल
👉Study Skills +
👉Thinking Skills +
👉Discipline Skills +
👉Emotional Skills
या चारच गोष्टी मुलाला यशस्वी बनवतात.

👉वरील सर्व सवयी साठी आपण आपल्या मुलांना ट्रेन करू शकाल आणि यामुळे मुलांना शिक्षणात चांगले मार्क नक्की मिळतील.

धन्यवाद 🙏🏻
👉श्री गोरख सुतार
मार्गदर्शक
शिक्षण आणि करियर
संपर्क 8433569122
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

09/11/2025

fb-video-2.mp4

08/11/2025

❇️मुलं स्वतःहून अभ्यास करत नाहीत असे पालकांना वाटते.

👉जसे आपण एखादा हॉटेलमध्ये जातो त्यावेळी आपण एन्जॉय करतो गाणी गातो आणि हॉटेलमधील
जेवणाचा आस्वाद घेतो हे आपण सर्व करतो याचे कारण हॉटेलमधील वातावरण एन्जॉय करण्याचे असते.

👉मुले ज्यावेळी शाळेमध्ये असतात त्यावेळी शाळेमध्ये वातावरण शांततेचे असते आणि शिक्षक शिकवतात ते गांभीर्याने शिकण्याचे वातावरण शाळेमध्ये असते.

👉 परंतु पालकांना जर वाटत असेल की मुलांनी घरी स्वतःहून अभ्यास करावा तर त्यासाठी
यासाठी पालकांनी काय करावे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन.

❇️श्री गोरख सुतार
मार्गदर्शक
शिक्षण आणि करिअर

Want your school to be the top-listed School/college in Thane?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Thane

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm