28/05/2017
अहमदाबादचा अजब Uberवाला
------------------------------------------------
रात्रीच जेवण करण्यासाठी राहत्या जागे पासून हॉटेल पर्यंत जाण्यासाठी आम्ही uber बुक केली होती, ती तिच्या ठरलेल्या वेळेवर येऊन पोहचली. गाडीत बसताना च पाहिलं लक्ष नीट नेटकेपणा, स्वछता यांनी वेधलं. ते न्याहाळत गाडीत बसतो ना बसतो तोच ड्रायव्हर च्या सीट वरून एकदम फर्मास इंग्रजी मधे अदबीने प्रश्न आला," सर तुम्हाला GPS ने जायला आवडेल का तुम्हाला हॉटेलला जायचा एखादा शॉर्टकट माहीत आहे ?" इंग्रजीचे उच्चार आणि अदब पाहून अचंबित होऊन समोर सरकून सीट वर कोण आहे ते पाहिलं तर तो भारतीयच होता साधारण 30-32 वयातला नंतर काही जुजबी प्रश्नोत्तरांची देवाण घेवाण झाली आणि आमची गाडी निघाली. गाडीचा टापटीप पणा, त्याच अस्खलीत इंग्लीश बोलण्याची पद्धत हे सगळं पाहून कितीही नाही म्हंटलं तरी कुतूहला पोटी त्याला प्रश्न विचारायची इच्छा होत होती. मग संवाद सुरू करायचा म्हणून उगाच गाडीच कौतुक करून बोलायला सुरुवात केली अन मग नंतरच्या 15-20 मिनिटांच्या बोलण्यात त्याने असे असे बॉम्ब टाकले की त्या रात्रीच जेवण आणि पुढचे 2 दिवस आमच्या बोलण्याचा विषय फक्त तोच होता.
त्याच्यात आणि आमच्यात झालेला संवाद--
आम्ही- गाडी खूप छान मेंटेन केलीये तुम्ही, अगदी नवीन वाटतीये. दिवसभरातून 2-3 वेळा तरी पुसाव लागत असेल ?
तो- नाही सर, संध्याकाळी निघताना फक्त एकदा पुसतो मी cab पार्ट टाइम म्हणून चालवतो ?
आ- पार्ट टाइम अच्छा मग पूर्ण वेळ काय करता ? ( याच्या उत्तरात पहिला बॉम्ब)
तो- माझी स्वतःची कंपनी आहे, आम्ही solar system घरांमध्ये बसवण्याच काम करतो. अजून नवीन आहे कंपनी म्हणून हवा तेवढा नफा त्यातून मिळत नाहीये अन वर कमाई साठी अस पार्ट टाइम cab चालवायची सवय मला ऑस्ट्रेलिया मधे असल्या पासून आहे.
आ- ऑस्ट्रेलिया.. तिथे कधी होता तुम्ही ? ( इथे दुसरा बॉम्ब)
तो- सर, मी माझं MS ऑस्ट्रेलिया मधे केलं आहे नंतर काही महिने तिकडेच एका कंपनीत काम ही केलं. तेंव्हा तिथे विद्यार्थी दशेत असताना वर कमाई साठी cab चालवली आहे.
(या उत्तरा नंतर हा माणूस म्हणजे काही तरी अजब रसायन आहे याची जाणीव आम्हाला झाली, इतकावेळ सीटला मागे रेलून निवांत बसलेलो आम्ही समोर होऊन बसलो आणि त्याच्या कडून अजून ऐकण्यासाठी आतुर झालो होतो)
आ- MS, चांगल्या पगाराची ऑस्ट्रेलिया मधील नौकरी सगळं सोडून एकदम स्वतःची कंपनी आणि पार्ट टाइम cab ड्राईव्हर हे कसं काय झालं ?
तो- माझी ऑस्ट्रेलिया मधली जी कंपनी होती ती ही solar panels वर च काम करायची आणि मोठं मोठ्या कंपन्या, व्यापारी संकुल याना solar system बनवून द्यायचं काम करायची. ते काम पाहून, शिकून अस वाटलं की हेच जर आपण छोट्या प्रमाणात बनवून भारतातल्या सामान्य लोकांना त्यांच्या घरात वापरता येऊ शकेल अस बनवू शकलो तर त्यातून पैसा ही कमवता येईल आणि ऊर्जेचा प्रश्न ही सोडवता येईल अन मूळचा गुज्जू असल्याने नोकरी पेक्षा धंदा आम्हाला नेहमी सोयीस्कर वाटतो म्हणून मग एक दिवस ठरवून तिथल सगळं सोडून इथे येऊन स्वतःची कंपनी टाकायची ठरवली.
आ- वा.. भारीच.. मग कसा प्रतिसाद आहे आता आणि काय असत त्यात नेमकं ? महिन्याला किती कमावतात ?
तो- सध्या 3 महिन्यात 5 लाखा पर्यंत कमाई होतीये, हळू हळू वाढत जाईल. आमच्या कडे एका घराला 1kw वीज देऊ शकेल अशी solar सिस्टिम्स आहेत ती बसवण्याची काम आम्ही करतो, याला साधारण खर्च 70 हजारां पर्यंत येतो पण त्यावर सरकार कडून सबसिडी ही भेटते, जर तुम्हाला 1kw वीज लागत नसेल तर तुम्ही ती विकू पण शकता. ( अश्या बऱ्याच त्यांच्या कामतल्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या)
आ- तुमच्या घरच्यांचा या सगळ्याला पाठिंबा नाही का मग अस पार्ट टाइम काम करण्याची काय गरज आहे ना(एकंदर पेहरवा वरून चांगल्या घरातला वाटत होता) आज ना उद्या मोठी होईलच की कंपनी अन तसही गुजराती लोक धंद्याला नेहमी पाठिंबा देतातच ? ( सगळ्यात मोठा बॉम्ब या प्रश्नाच्या उत्तरात आहे )
तो- घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आहे पण मला कंपनी ही स्वतःच्या बळावर उभी करायची आहे, मी कोणाला सांगत नाही इतकं पण तुम्हाला म्हणून सांगतो " माझी आई अहमदाबाद शहराची माजी महापौर आहे, मोदी मुख्यमंत्री असताना 81 महापौर पैकी त्यांच्या सोबत चीन ला जाणारी एकटी महिला महापौर होती ती" घरच वातावरण हे सगळं राजकारणच आहे मला हवी ती आणि हवी तशी मदत सहज उपलब्ध होऊ शकते पण मला माझं स्वतःच्या हिमतीवर काहीतरी निर्माण करायच आहे म्हणून मी अस पार्ट टाइम cab चालवतो वर खर्च भागवण्यासाठी....
हे उत्तर ऐकून आम्ही थोडा वेळ शांतच होतो, एखाद्या सिनेमाची गोष्ट ऐकतोय की काय असंच वाटत होतं. इतक सगळं बोलणं होई पर्यंत आमच हॉटेल आलेलं मग आम्ही त्याला जेवायला यायचं आमंत्रण दिल पण माझ्या बायकोचा फोन येतोय मला जावं लागेल नंतर कधी नक्की जेवूयात अस सांगून तो निघून गेले पण आम्ही मात्र त्याच्याच विचारात होतो.
उच्च शिक्षण, मोठ्या पगाराची नोकरी सगळं सोडून तो स्वतःची कंपनी टाकण्यासाठी आला होता आणि स्वतःच्या बळावर काहीतरी निर्माण करण्यासाठी मोठ्या राजकारणी घरातला असून देखील cab ड्राईव्हर सारख काम करण्यात त्याला कमीपणा वाटतं नव्हता. मराठी लोकां मध्ये 10-6 नोकरी ला जे ग्लॅमर आहे ते धंदा किंवा व्यवसाय करण्याला नाही म्हणून मराठी लोक मागे राहतात आणि "आपण बरं आणि आपली नोकरी बरी" असा विचार करतात त्याउलट धंदा हा गुजराती माणसाच्या रक्तातच असतो.
© Abhijeet Bhalerao
Source : https://www.facebook.com/bhaleraoabhi.91
#उबेर