SVIT Solapur

Website

SVIT Solapur Swami Vivekanand Institute Of Technology Polytechnic, Solapur
16/2, Solapur-Barshi Road,Dist- Solapur

29/06/2026
27/06/2026

मोहोळ तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा २०२५-२६ मधील गुणानुक्रमे तीन.
गुणवंत विद्यार्थ्यांचा महासन्मान व सेवानिवृत्त शिक्षक कृतज्ञता सोहळा.
शनिवार दि. २७ जून २०२६.

SVIT Solapur तर्फे ८२१ गुणवंत विद्यार्थी व ४४५ शिक्षकांचा सत्कार!!!श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (SVERI)...
13/06/2026

SVIT Solapur तर्फे ८२१ गुणवंत विद्यार्थी व ४४५ शिक्षकांचा सत्कार!!!

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (SVERI), पंढरपूर संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT), सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील SSC व HSC परीक्षेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे तसेच सायंकाळी SVIT Khed एसव्हीआयटीच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमामागे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच त्यांना करिअरविषयक योग्य दिशा व प्रेरणा देण्याचा उद्देश होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व प्रेरणादायी वक्ते डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यशस्वी जीवनासाठी कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचे महत्त्व विशद केले. “स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या विकासासाठीही योगदान देणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बी. पी. रोंगे यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ज्युनिअर कॉलेज व विज्ञान शाखेतील शिक्षण घेताना आलेल्या अडचणींचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास दिला. “कष्टाला पर्याय नाही,” हा यशाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

या उपक्रमात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध शाळांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त एकूण ८२१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय निवृत्त शिक्षक व २६८ कार्यरत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसव्हीआयटीच्या कॅम्पस इन्चार्ज प्रा. कीर्ती भोसले तसेच प्राचार्य डॉ. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Address

Solapur-Barshi Road, Khed
Solapur
413255

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVIT Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share