Aio Academy

Aio Academy Science & Maths Classes

23/09/2022

गणिताची भीती कमी करण्यासाठी काही उपाय :

1. सकारात्मक दृष्टिकोन :
आपल्याकडे एक प्रचंड मोठा गैरसमज आहे की ज्याचे गणित चांगले, तोच विद्यार्थी हुशार आहे. खरे तर प्रत्येकाच्या अंगात काही उपजत कलागुण असतात. प्रत्येकाची हुशारी वेगवेगळ्या गोष्टींत असते. काही जणांच्या म्हणण्यानुसार गणित जमत नाही म्हणजे मूर्ख, “ढ” आहे असाच समज मुलांच्या मनात भरवून दिला जातो. ह्याने लहान मुलांचा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. मनात अकारण स्वतःविषयी नकारात्मक भावना येते. ज्यांना अश्या नकारात्मक भावनेने आणि गणिताच्या भीतीने ग्रासले आहे त्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत म्हणून त्यांना जे चांगले येते, जमते त्याविषयी कौतुक केले पाहिजे. त्यांच्या इतर कलागुणांना वाव दिला पाहिजे. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मनातली भीती घालवली पाहिजे. त्यांच्या मनात तयार होणारी सकारात्मक भावना त्यांना अभ्यासावर जास्त चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.

2. भीतीला धाडसाने तोंड द्या, त्याविषयी चर्चा करा :
“असे कसे तुला येत नाही ? हे न जमायला काय झाले?” असा ऍटिट्यूड न ठेवता तुमच्या मुलांशी गणित येत नाही म्हणजे त्यातले नेमके काय कळत नाहीये, कुठला विषय अवघड जातोय ह्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करा. “हे तर इतके सोपे आहे, ह्यात न कळण्यासारखे काय आहे” असे न म्हणता त्यांना तो विषय समजेल अश्या पद्धतीने शिकवा. आपल्या पाल्याला गणित अवघड जातेय हे प्रथम पालकांनी स्वीकारणे आवश्यक आहे तरच त्यावर काही उपाययोजना करता येऊ शकेल.

3. नियमितपणे सराव करा :
“प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट” ह्या उक्तीप्रमाणे नियमितपणे गणिताचा सराव करा. पालकांनी आपल्या पाल्यांकडून गणिताचा सराव करून घ्या. नियमित सराव हे यशाचे गमक आहे. रोज इतकी उदाहरणे सोडवली गेली पाहिजेत असे ठरवून तितका सराव पूर्ण करा. सुरुवात थोड्याने करून नंतर रोज हळू हळू उदाहरणांची संख्या वाढवत नेली तर पाल्यावर सुद्धा सरावाचे दडपण येणार नाही. घरी पालक गणित शिकवू शकत असतील तर उत्तमच, नाही तर “पर्सनल अटेन्शन” देणारी शिकवणी लावा जिथे मुलांच्या शंका त्यांना मोकळेपणाने विचारून सोडवता येतील.

4. शिकवण्याची पद्धत सोपी व मनोरंजक असावी :
गणित असो किंवा इतर भाषा, जर शिकवणाराच नीरस आणि रुक्ष पद्धतीने शिकवत असेल तर मुलांना त्या विषयाबद्दल मनात भिती बसणारच. कठीण गणिते सुद्धा सोप्या पद्धतीने “स्टेप बाय स्टेप” शिकवता येऊ शकतात. लहान मुलांच्या पालकांनी लहानपणापासूनच मुलांना मनोरंजक गणितीय कोडी, गेम्स खेळायची सवय लावली तर मुलांना गणिताची गोडी लागण्यास मदत होते. आता तर अनेक मोबाईल ऍप्स, यूट्यूब चॅनल्स व वेबसाइट्स आहेत ज्यामुळे गणित शिकणे खूप सोप्पे झाले आहे.

5. गणिताकडे एक सर्जनशील (क्रिएटिव्ह) विषय म्हणून बघायला शिका :
भाषा, कला म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह असतं, आणि गणित हा अवघड, कंटाळवाणा विषय आहे सामान्यपणे असा समज मानसांत आढळतो. पण गणित सोडवताना सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी उत्तर काढू शकता, म्हणजेच गणितात सुद्धा सर्जनशीलतेला वाव आहे. लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी बेस्ड गणित करणे केव्हाही चांगले, त्यातून मुलांना गणिताची गोडी लागते आणि मुलं गणित शिकताना कंटाळत नाहीत.

6. दैनंदिन जीवनात गणिताचा वापर :
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे ह्यासारख्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात रोजच करतो. लहान मुलांना लहान लहान आकड्यांचे हिशोब, बेरीज, वजाबाकी करायला दिल्याने त्यांच्यातला आकडेमोड करण्याविषयीचा आत्मविश्वास वाढतो. गणित हा फक्त शाळेत शिकण्याचा विषय नसून दैनंदिन जीवनाचा भाग आहे असा विचार त्यांच्या मनात रुजतो. पोळीचे तुकडे करून तुम्ही लहान मुलांना फ्रॅक्शन्स शिकवू शकता, स्वयंपाक करताना इतक्या माणसांना इतके जेवण लागते तर इतक्या माणसांना किती लागेल असे कसे मांडायचे हे मजेत रोजच्या उदाहरणांतून शिकवू शकता. थोड्या मोठ्या मुलांना फायदा नुकसान (प्रॉफिट लॉस), बँकेचे व्यवहार शिकवताना व्याज, मुद्दल वगैरे शिकवू शकता. अशाने मुले व्यावहारिक ज्ञान तर शिकतीलच शिवाय आकडेमोड आणि गणित सुद्धा त्यांना दैनंदिन जीवनात किती आवश्यक आहे हे लक्षात येऊन ते गणिताचा कंटाळा कमी करतील. ह्याशिवाय हल्ली गणित शिकण्यासाठी अनेक ऍप्लिकेशन्स, व्हिडीओज, यूट्यूब चॅनल्स व वेबसाइट्स ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावू शकता. एकदा गोडी लागली की मग हळूहळू त्याचा सराव करून, शंका निरसन करून गणिताची भीती कमी होऊ शकेल. एकदा गणित आलं म्हणजे काम झालं असं नव्हे तर नियमित सराव करून सतत गणिताचे ज्ञान पॉलिश करत राहणे महत्वाचे आहे. तर आजपासून गणिताला शत्रू समजणे बंद करा, त्याची भीती मनातून काढून टाका. आणि हसतखेळत गणित एन्जॉय करा.

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aio Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aio Academy:

Shortcuts

Share

Category