Sai Sewa MR School Shridi for Boys & Girls - Shirdi

  • Home
  • Sai Sewa MR School Shridi for Boys & Girls - Shirdi

Sai Sewa MR School Shridi for Boys & Girls -  Shirdi School For Mentally Re****ed Boy's & Girl's

21/08/2026
*साईसेवा दिव्यांग विद्यालयात स्वातंत्र्य दिन सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा*     साईसेवा निवासी मतिमंद (बौद्धिक ...
20/08/2026

*साईसेवा दिव्यांग विद्यालयात स्वातंत्र्य दिन सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा*
साईसेवा निवासी मतिमंद (बौद्धिक अक्षम) मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिन सप्ताह विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व देशभक्तीपर उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्यसैनिकांविषयी आदर आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने संपूर्ण सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते.
सप्ताहाच्या सुरुवातीला विद्यालयाचे विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान यांची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनक्षमतेनुसार सोप्या भाषेत सांगण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्य दिन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम व मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असून स्वच्छ परिसरामुळे आरोग्य चांगले राहते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
शाळेचे कलाशिक्षक श्री मंगेश सर, यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रात रंगभरण स्पर्धा उपक्रम घेण्यात आला. ‘माझा भारत’, ‘राष्ट्रीय ध्वज’, या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध रंगांची सुंदर चित्रे रंगविली. तसेच विशेष शिक्षक श्री बालाजी हणमंते सर, श्री ओमप्रकाश खताळ सर व श्री दिपक कोकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कवायत, लेझीम कवायत तसेच क्रीडा स्पर्धा असे उपक्रम घेण्यात आले. तिरंगा ध्वज, फुलांची सजावट करून शाळेचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला चालना मिळाली.
सप्ताहादरम्यान शाळेच्या विशेष शिक्षिका श्रीमती नंदा शेळके व श्रीमती स्वाती शेळके यांनी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या कार्यातून देशप्रेम, धैर्य, समानता, बंधुभाव आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना शिर्डी नगरपरिषद शिर्डी येथे ध्वजारोहण करण्यासाठी घेऊन जाण्यात आले तेथे उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. व शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. देशाने मिळविलेले स्वातंत्र्य जपणे, संविधानाचा आदर करणे, देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता, शिस्त, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राबद्दल अभिमान या मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रत्येक उपक्रमात सहभागी करून घेण्यात आल्याने त्यांच्यात आत्मविश्वास, आनंद व सहभागाची भावना वाढीस लागली. कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप व मिष्टान्न भोजन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिन सप्ताहातील विविध उपक्रमांमुळे शाळेच्या परिसरात देशभक्तीमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले.

23/07/2026
29/04/2026

आधार शिक्षण व ग्रामिण विकास मंडळ संचलित
साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी
पत्ताः शिर्डी साकुरी शिव रोड शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
सन:- २०२६-२७
मोफत प्रवेश सुरू
विद्यालय सुविधा
★ शाळेसाठी शासकीय मान्यता व अनुज्ञाप्तीप्राप्त संस्था, सुसज्ज व भव्य इमारत
★ प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद
★विद्यार्थ्याकडे वैयक्तिक स्वतंत्र केस फाईल व अभ्यासक्रम
★ डिजिटल क्लास रूम
★ विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी,
★ प्रशस्त क्रीडांगण व खेळ साहित्य
★ विद्यार्थ्यांना संगीत व नृत्य शिक्षण.
वसतिगृह सुविधा
★मोफत भोजन
★ विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रसाधन व गरम पाणी, स्नानगृह
★ मनोरंजनाची विविध साधणे
★ क्रीडा व व्यावसायिक प्रशिक्षक
★ २४ तास काळजीवाहक व पहारेकरी
★अद्ययावत मोफत वैद्यकीय सुविधा
★ पिण्यासाठी शुद्ध पाणी
विशेष प्रशिक्षण
★ दिशा अभ्यासक्रम (अध्ययन अक्षम प्रवर्ग)
★ कौशल्य विकासा करिता विशेष प्रशिक्षण.
★ व्यावसायिक प्रशिक्षण, माती काम, राखी प्रकल्प, हस्तकला इ. प्रशिक्षण
प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र
★ जन्मदाखला
★ आधार कार्ड
★ दिव्यांगत्व प्रमाणपत्र
★ पासपोर्ट साईझ फोटो
★ रेशन कार्ड
★ पालकांचा जातीचा दाखला.
प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र
★ जन्मदाखला
★ आधार कार्ड
★ दिव्यांगत्व प्रमाणपत्र
★ पासपोर्ट साईझ फोटो
★ रेशन कार्ड
★ पालकांचा जातीचा दाखला.
(वेळ सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० पर्यंत)
संपर्क - ९०९६५१४३०१
घुले मॅडम (मुख्याध्यापिका)
|● ९५११६११५१८ |

https://www.instagram.com/reel/DXtHMoHjjEO/?igsh=MWxjczJoc3Y3Yzczcw==

Address

Shirdi Sakuri Shiv Road Shirdi , Tal. Rahata, Dist. Ahilyanagar

423109

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Sewa MR School Shridi for Boys & Girls - Shirdi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sai Sewa MR School Shridi for Boys & Girls - Shirdi:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share