मकरंद नगिन पाटील

मकरंद नगिन पाटील प्रा.मकरंद पाटील ,
मा. गटप्रमुख शहादा न.पा.

स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या छत्रछायेत वाढलेले आणि बापूसाहेब दिपकभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असलेले राजयोगी प्रा.मकरंद पाटील यांचा जन्म 31 ऑगस्ट 1970 रोजी लोणखेडा येथे झाला.

त्यांनी शिक्षण M.E.(Instru),B.E.(Instru) केलेले असून,सध्या ते पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक आहेत.
तसेच शहादा नगरपालिकेचे मावळत्या सभागृहात गटप्रमुख होते.ते नंदूरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्षही आहेत.

उत्कृष्ट शेतकरी, कुशल प्रशासक,संवेदनशील मनाचे व्यक्तिमत्त्व ,शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत.
कडक शिस्त,स्पष्ट विचार आणि निर्णय तत्परता या तीन ही जीवनमुल्यांना प्रत्यक्ष अंगीकारून आपली जगण्याची शैली भारदस्त करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून सुपरिचित आहेत...

शैक्षणिक कार्यासोबत त्यांची सामजिक भूमिका ही लक्षणीय आहे.सदैव नागरिकांच्या समस्येवर उपाययोजना करण्यात ते व्यस्त असतात.
पी.के.अण्णा पाटील फौंडेशन च्या सहभागातून
कोविड असो की अजून इतर समस्या त्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे.

साधी राहणी,उच्च व सुस्पष्ट विचार आणि त्यानुसार आचार असणारे मकरंदसर आजच्या चलता पुर्जा जमान्यात एक अजब रसायन आहेत.

विरोधात राहून विरोधाला विरोध न करता विकासकामांना सहकार्य करणारे जंटलमन म्हणून ते समोर आले आहेत.

कधीही प्रसिध्दीची आशा न धरता प्रत्येक निवडणुक आणि अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांचे सुत्रबध्द नियोजनाचे पडद्यामागचे सुत्रधार म्हणून ते आपले थोरले बंधू श्री.दिपकबापूंच्या पाठीशी सावलीसारखे उभे असतात.न्यायसंमत जे असेल त्याला पुरजोर संमती.कोणताही बडेजाव नाही. तोंडदेखल्या स्तुतीचा तिटकार आणि जे आवडले नाही त्याचा जागच्या जागी फटकार ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत.

ते नेहमीच स्पष्ट,सरळ आणि रोखठोक भूमिका व निर्णय घेण्याचा वकुब राखुन असतात.

15/08/2026
श्रावणाच्या या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साधनेने महादेवांचे स्मरण करूया. भगवान शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने प्रत्ये...
13/08/2026

श्रावणाच्या या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साधनेने महादेवांचे स्मरण करूया. भगवान शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना.

एका जनार्दनी सांवता तो धन्य। तयाचे महिमान न कळे काही भक्ती, श्रम आणि समतेचा संदेश आपल्या आचरणातून देणारे संत शिरोमणी साव...
11/08/2026

एका जनार्दनी सांवता तो धन्य। तयाचे महिमान न कळे काही
भक्ती, श्रम आणि समतेचा संदेश आपल्या आचरणातून देणारे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻

पुण्यश्लोक संत नामदेव महाराजांच्या स्मरणदिनानिमित्त त्यांच्या अभंगसेवेचा व कीर्तनसंप्रदायाचा वारसा जपत, त्यांना त्रिवार ...
10/08/2026

पुण्यश्लोक संत नामदेव महाराजांच्या स्मरणदिनानिमित्त त्यांच्या अभंगसेवेचा व कीर्तनसंप्रदायाचा वारसा जपत, त्यांना त्रिवार वंदन ! त्यांच्या भक्तीमार्गाने देशभरात अध्यात्माचा प्रकाश पसरवणाऱ्या या संतशिरोमणीस विनम्र अभिवादन.

विनम्र अभिवादन 🙏🏻
01/08/2026

विनम्र अभिवादन 🙏🏻

💐 गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा 💐
29/07/2026

💐 गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा 💐

आज कारगिल विजय दिवस..पाठीवर प्रहार करून शत्रूने केलेल्या भ्याड हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी दिलेले प्रत्युत्तर म्हणजे आ...
26/07/2026

आज कारगिल विजय दिवस..
पाठीवर प्रहार करून शत्रूने केलेल्या भ्याड हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी दिलेले प्रत्युत्तर म्हणजे आजचा दिवस.
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा आणि कारगिल युद्धात अमर झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन 🙏🏻

सुंदर ते ध्यान उभे विटेवर,कर कटावरी शोभतसे.श्रीविठ्ठलाची कृपा तुमच्यावर सदैव राहो,एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🚩
25/07/2026

सुंदर ते ध्यान उभे विटेवर,
कर कटावरी शोभतसे.
श्रीविठ्ठलाची कृपा तुमच्यावर सदैव राहो,
एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🚩

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी विनम्र अभिवादन 🙏🏻सार्वजनिक गणेश...
23/07/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी विनम्र अभिवादन 🙏🏻
सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उपक्रमांतून राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवणाऱ्या लोकमान्य टिळकांचे कार्य, विचार आणि राष्ट्रभक्ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन !

Address

KHaredi Vikri Sangh
Shahada
425409

Alerts

Be the first to know and let us send you an email when मकरंद नगिन पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to मकरंद नगिन पाटील:

Shortcuts

Share

Category