फार्सी शिकूया मराठीतून let's learn farsi through marathi

  • Home
  • India
  • Satara
  • फार्सी शिकूया मराठीतून let's learn farsi through marathi

फार्सी शिकूया मराठीतून let's learn farsi through marathi learning new scripts keeps brain healthy

Saturday, 16 July 2011फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन २- अरबीअक्षराची भूमितीअरबी लिपीत अक्षरांच्या भौमितिक आकारांचे प्र...
03/01/2023

Saturday, 16 July 2011
फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन २- अरबी

अक्षराची भूमिती
अरबी लिपीत अक्षरांच्या भौमितिक आकारांचे प्रमाण सौंदर्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सरळ उभ्या दंडाने दर्शवलेल्या ‘अलिफ’ या पहिल्या अक्षराच्या मापाने पुढील सर्व अक्षरांचे आकार ठरतात. ‘अलिफ’ हा लेखकाच्या शैली नुसार तीन ते बारा टिंबांच्या मापाचा असतो. टिंब लेखणीच्या टोका इतका असावा. तितकीच जाडी ‘अलिफ’ ची असावी. ‘अलिफ’च्या व्यासाचे वर्तुळ सर्व अक्षरांना सामावून घेते.

अरबी सुलेखन - शैली

सुलेखन कलेत या लिपी इतके प्रयोग आणि वैविध्य इतरत्र क्वचितच सापडते. शंभरावर शैली प्रसिद्ध असल्या तरी त्यांचे- कुफि(कुफिक़) ही भौमितिकदृष्ट्या प्रमाणबद्ध आणि नस्ख, रुक़ा, तुलुथ आणि इतर लपेटीदार अक्षरशैली असे प्रमुख दोन प्रकार पडतात.

कुफी
शिलालेख वगैरे कोरण्यास आयताकृती, भौमितिक आकार यामुळे वापरली जाणारी.{वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}

तुलुथ
तुलुथ म्हणजे १/३ तृतीयांश, लेखणीच्या आकारामुळे हे नाव पडले आहे. ही लिपी तुमार या लिपीवरून तयार झाली. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}

नस्ख نسخه
copy म्हणजे नक्कल या अर्थाच्या शब्दाने ओळखली जाणारी नस्ख लिपी प्रमाणबद्ध आणि सुवाच्य आहे. त्यामुळेच धर्मग्रंथ, पुस्तके याच लिपीत लिहीत.
{वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}

ता लिक़

तालिक़ म्हणजे टांगलेली, फारसी ने ९व्या शतकात संशोधित केलेली लिपी, यात शब्दातील अक्षरे एकमेकांना जोडली जाताना बेसलाईन पासून वर चढत जातात. {वाचन :- बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम}

दिवानी

ता’लिक़ वरून ओटोमान तुर्कांनी आपल्या दरबारी पत्रांसाठी तयार केलेली दिवानी लिपी, आपल्या गिचमीडपणात अव्वल आहे.

रिक़ा
लिहायला सोपी आणि वेगवान लिपी रोजच्या लिखाणाला उपयुक्त.

केवळ अक्षरातून चित्र निर्माण करण्याची शैली फारसीत रूढ झाली.

https://farsi-marathi.blogspot.com/2011/07/blog-post_16.html

Thursday, 14 July 2011फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखनया आधी म्हणजे ‘फार्सी लिपीचे प्रकार’ या धड्यात [link: http://farsi...
03/01/2023

Thursday, 14 July 2011
फारसी कॅलीग्राफी - फार्सी सुलेखन
या आधी म्हणजे ‘फार्सी लिपीचे प्रकार’ या धड्यात [link: http://farsi-marathi.blogspot.com/2011/02/blog-post_8188.html] आपण फारसी लिपीचे प्रकार पाहिले आहेत.
नेस्ख आणि तालिक़ या लिप्यांच्या संगमातून बनली ‘नेस्तालिक़’ लिपी. सुलेखन (खरं तर अक्षरचित्रे ) काढण्यासाठी हिचा फार उपयोग केला जातो. हिला अक्षरचित्रांची वधू(प्रियतमा) म्हणून लाडाने ओळखले जाते. कालौघात हिच्यात फार थोडे बदल झाल आहेत. ‘मीर अली तब्रीझी’ यांनी सातशे वर्षांपूर्वी तयार केलेले वळण इतकं संपूर्ण आहे की त्यात बदल असंभव!

जेम्स बालेन्टाईन यांनी स्कॉटीश नेव्हल आणि मिलिटरी अकादमी साठी केलेला चार्ट

सोबतच्या चित्रात कलम तासण्याची रीत दाखवलेली आहे.
‘कलम’च्या टोकाच्या प्रमाणात अक्षरे त्यांची उंची दाखवलेली आहे.

03/01/2023

Tuesday, 29 March 2011
माझा हात
नखे - नाखोन
तळहात - कफ़ ए दस्त
बोटे - अंगोश्त
मनगट - मोच ए दस्त
नाडी - नब्ज
हात - दस्त
कोपर - आरंज
बाहू - बाज़ू
खांदा - शाना

03/01/2023

Sunday, 27 March 2011
माझे डोके

डोके - सर
केस - मू
कपाळ - पिशानी
भुवई - आबरू
पापणी - पलक ए चश्म
डोळा - चश्म
नाक - दमाग़
ओठ - लब
तोंड - दहान
हनुवटी - चाना
गाल - गुना
चेहरा - सुरत
कान - गुश
पापणी चे केस - मोजा
घसा - गलू
मान - गर्दन
खांदा - शाना
जीभ - ज़बान
दात - दन्दन

03/01/2023

Friday, 25 March 2011
वाचन - सोपी वाक्ये
उजवीकडून वाचा

من یک کتاب دارم
म र दा ब ता की क ई न म
{मन ईक किताब दारम }
[माझ्याजवळ एक पुस्तक आहे]

او یک قلم دارد
द र दा म ल क क इ उ(औ)
{उ इक कलम दारद }
[त्याच्याजवळ एक लेखणी आहे ]

شما اینجا هستید
द स्ति ह जा इं मा श(शो)
{शोमा इन्जा हस्तीद }
[तू इथे आहेस }

این درس آسان است
स्त अ न सा आ स र द न ऐ
{ऐन दरस आसान अस्त }
[हा धडा सोपा आहे ]

03/01/2023

Thursday, 24 March 2011
क्रिया विशेषणे
नामाला अना ‘ انه ’ प्रत्यय जोडला की क्रियाविशेषण तयार होते.

शरीफ़ - कुलीन = शरीफ़ाना
पादशाह - राजा = पादशाहाना

किंवा बा ‘ با ’ प्रत्यय जोडला की क्रियाविशेषण तयार होते.
फ़झल - श्रेष्ठता = बा फ़झल - श्रेष्ठत्वाने
अस्तवारी - निश्चय = बा अस्तवारी
दवलत - संपत्ती = बा दवलत

03/01/2023

Friday, 11 March 2011
फार्सी लघुत्व दर्शक शब्द
ह, चा, का, क या प्रत्ययांनी लहानपणा, नाजुकपणा दाखवला जातो.

ك - مردك मर्द - मर्दक -छोटा माणूस
अस्ब - अस्बक - लहान घोडा

03/01/2023

Friday, 11 March 2011
अव्यय
दोन शब्द जोडण्याचे काम अव्यय करते. फार्सीत यांचा फार वापर होतो.

बाला - च्या वर
पाईन - खाली
जबर - वर
जेर - खाली
पीश - पूर्वी
पेस - मागे, नंतर
मियान- मध्ये
पहलू - बाजूस
नज्द, नज्दीक -जवळ
बहर, बरायी - च्या कारणाने
बुइरून - बाहेर (बाहेरून)
अन्दरून - आत

(अरबीतून आयात)
कबल - च्या पूर्वी
बआद - च्या नंतर
जेअहत - च्या दिशेने
जानीब - कडेला

जोडून वापरली जाणारी,
अज, ज- पासून
बर , आबर - च्या वर
बे - ला
बा - सह
दर - च्या आत
रा - कडे, चा
अजबाला - वर पासून
अजफ़राज - उंचापासून
अज पाईन - खालपासून

उभयान्वयी अव्यये

हम, निज - च्या प्रमाणे
अगर, गर - किंवा
या - किंवा
मगर- तरीही

03/01/2023

Thursday, 10 March 2011
वस्तूंच्या जागा
वस्तूचे स्थान दाखवताना, ‘खाना, गाह, जार, दान, स्तान’ हे प्रत्यय जोडतात.

गुल इ स्तान - गुलाबाची बाग
खार इ स्तान - काटेरी जागा

हेन्दू - काळा = हेन्दूस्तान - काळ्या लोकांचादेश

नमक जार
शौर इ जार - मीठाचे वाळवंट
लाल: -त्युलिप = लालहजार - त्युलिपचा वाफा

सन्जल - जेवणे (पैसे देऊन) = सन्जलगाह/ सन्जल खाना - खाणावळ
किताब - पुस्तक = किताब खाना - ग्रंथालय

बुत कदा - मुर्तीसह देऊळ

कलमदान
शमादान

कोह सार - डोंगरी प्रदेश

संग लाख - खडकाळ
दीव लाख - शापित प्रदेश

03/01/2023

Thursday, 10 March 2011
संज्ञा / substantives( भाववाचकनाम )

विशेषणाला ‘ई’ प्रत्यय जोडून भाववाचक नाम बनवता येते, जसे मराठीत ‘-पणा’ जोडतात.

शर्मसार - शर्मसारी- सलज्जता
स(/सि)याह - स(/सि)याही - काळेपणा

‘ه’ ‘ह’ जर शेवटी असेल तर ‘की’ जोडतात
बन्दा- बांधलेला- बन्दकी - गुलामी
बिकाना -नवा- बिकानकी -नाविण्य

‘अ’ जोडूनही करतात

गरम - गरमा - उब

क्रियापदाला( धातूला) अर प्रत्यय जोडून
दीद - पाहा - दीदार -दष्टी
गोफ्त -बोल- गोफ्तार-भाषण

परवर- परवरश
अलाइ-अलाइश

कर्ता, करणारा या साठी शेवटी ‘ न्दा ’ जोडतात

फ़रीब- फ़रीबन्दा- फसवणारा
फ़रोश- फ़रोशन्दा- विक्रेता

किंवा ‘बान, गर, गार’ हे प्रत्यय जोडतात.
दस्त- हात= दस्तगार- हाताने काम करणारा
अहन -लोह=अहनगर- लोहार
दर- द्वार=दरबान -द्वारपाल

03/01/2023

Thursday, 10 March 2011
गुणवाचक / Epithets
याचे तीन प्रकार आहेत.

नाम+धातूसाधित विशेषण /कृदन्त
नाम+विशेषण
नाम+नाम

नाम+धातूसाधित विशेषण /कृदन्त
दिल आजार - हृदय पिळवटणारे
गुल अफ़्शान - फूल चिरडणारे

नाम+विशेषण

शिरीन गार - गोड आवाजाचा
खुश अलहान - सदवर्तन

नाम+नाम

परी रुई - परीचे मुख असणारी
शीर(शेर)दिल - सिंह हृदयी

याशिवाय उपपद + नाम अशीही गुणवाचके आहेत

हम म्हणजे सह, एकत्र,

हमखाना - एकाच घरात राहणारे
हम सोहबत - सोबती
हम दम - एकत्र श्वास घेणारे
हम दर्द - एकच वेदना भोगणारे
हम मकतब - एकाच शाळेत जाणारे
हम राज - एकच गुपीत असणारे
हम बिस्तर - एकाच बिछान्यात झोपणारे

ना, कम, बे कमतरता दाखवतात,

नाअ(उ)मीद - निराश
बेअमान - निर्दयी
कमबहा - कमी किमतीचा

ना - नाही
बे -शिवाय
कम - थोडे

नादान - अज्ञानी
नामर्द - पुरुष नसलेला
नापाक - अपवित्र

बेखेरद - संवेदनाशून्य
बे तमीज - भेदभाव न करता
बे मसरफ़ - उपयोगशून्य
बे दीन - अधार्मिक
बे बाक - निष्काळजी

कम तजरबा - कमी अनुभवी
कम बुहा - कमी किमती
कम रीश - पातळ दाढीचा

मालकीदर्शक झू, साहब, अमल +नाम

झूजलाल - राजेशाही
अहल हकमत - चातुर्याने
साहब जमाल - सुंदर

नाम+वैपुल्य दर्शक सार, किन, मन्द, नाक, वार, वर

शर्म सार - लाजलेला
दानशमन्द -विद्वान
गमगीन - दुःखपूर्ण
जहरनाक - विषारी
जान वर - जीव असलेला

नाम + इन

जर इन - सोनेरी
सीम इन - चन्देरी
जमरदीन - पाचूचा बनवलेला

समानता दाखवणारा नाम+ सा, असा, वश
अंबर आसा - अ‍ॅंबर सारखा
माह वश - चंद्रा सारखा
सहरसा - जादूसारखा

रंग नाम + फ़ाम, गोन

गुलफ़ाम - गुलाबाच्या रंगाचा

03/01/2023

Wednesday, 9 March 2011
रंग
रंग - रंग

काळा - सियाह, मेश्की
निळा - आबी
नेव्ही ब्लू - सुरमेई
टॉरकॉइज - फेरुझी
तपकिरी -गह्वेइ
हिरवा - सब्ज
नारंगी - नारेंजी
गुलाबी - सुरती
जांभळा - बनफ़्श
लाल - किर्मिज
पांढरा - सफेद
पिवळा - झर्द

Address

Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when फार्सी शिकूया मराठीतून let's learn farsi through marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to फार्सी शिकूया मराठीतून let's learn farsi through marathi:

Shortcuts

Share