Fabtech Polytechnic College, Sangola

Website

Fabtech Polytechnic College,  Sangola We don’t just offer Diploma courses—We shape careers, build confidence and open doors to endless opportunities!

 #फॅबटेक_सांगोलाफॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक सांगोला, महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २८ सप्ट...
28/09/2026

#फॅबटेक_सांगोला

फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक सांगोला, महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पालक मेळाव्याच्या सुरुवातीस सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने पालक प्रतिनिधी जितेंद्र मोकाशी, राणीताई माने व मैना बाबर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय उपस्थित पालकांचे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने गुलाब देऊन स्वागत करण्यात आले.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. श्याम कोळेकर संबोधित करताना म्हणाले, फॅबटेक पाॅलिटेक्निक महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आवश्यक ते प्रयत्न आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांमधील स्किल्स बाहेर काढून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून करिअर कडे लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षण घ्या. मोबाईल मध्ये टाईमपास न करता अभ्यास लक्ष द्या. आई वडीलांना मदत करावी. शिक्षणाला वयाची अट नसते. माणसू हा विद्यार्थी आहे. सतत काही तरी शिकले पाहिजे असे मत शिक्षक प्रतिनिधी जितेंद्र मोकाशी यांनी व्यक्त केले याशिवाय अनेक उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाब व भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले. या मेळाव्याचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन कुमारी साक्षी ढोबळे आणि कुमारी प्रणाली पाटील यांनी केले.

25/09/2026
📚 Today, I conducted an Electronics Model Making Workshop at Udysinh Mohite Patil English Medium School, Mangalwedha. 🏫⚡...
25/09/2026

📚 Today, I conducted an Electronics Model Making Workshop at Udysinh Mohite Patil English Medium School, Mangalwedha. 🏫⚡
It was a wonderful and memorable experience, and I truly enjoyed interacting with the enthusiastic students.

 #सांगोला_फॅबटेक_काॅलेज_ऑफ_पाॅलिटेक्निकफॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी मेकॅनिकल...
20/09/2026

#सांगोला_फॅबटेक_काॅलेज_ऑफ_पाॅलिटेक्निक

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी मेकॅनिकल विभागाचा माजी विद्यार्थी सागर अनुसे यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष२०१५–१६ बॅचचे माजी विद्यार्थी सागर अनुसे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे सब इंजिनिअर पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सागर अनुसे यांनी आपला शैक्षणिक व करिअर प्रवास उलगडून सांगितला. स्पर्धा परीक्षेची तयारी, तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व, मेकॅनिकल विभागातील उपलब्ध करिअरच्या विविध संधी, नियोजनबद्ध अभ्यास, मेहनत आणि सातत्य या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशेबाबत प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमास मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी सेलचे समन्वयक प्रा. स्वप्निल बंडगर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Address

Sangola
413307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fabtech Polytechnic College, Sangola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share