22/09/2024
*मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात कोल्हापूर विभागात कळंबीची अजितराव घोरपडे विद्यालय शाळा पहिली 21 लाखाचे बक्षीस*
कोल्हापूर शिक्षण उपसंचालक विभाग अंतर्गत असलेल्या कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी व सांगली या पाच जिल्ह्यातून ही शाळा प्रथम आलेली आहे. राज्य स्तरावरील स्पर्धेत ही शाळा पात्र ठरलेली आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांनी दिली. शिक्षण विभागाने गुणांकनाच्या आधारे शाळेचे मूल्यमापन केले असून यामध्ये शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा विद्यार्थी लाभाच्या प्रभावीपणे राबवलेल्या योजना, इको क्लब, सोलर सिस्टिम, १००% विद्यार्थी आधार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ७५ वेगवेगळे उपक्रम राबवून इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केलेली नोंद अशी असलेली देशातली एकमेव शाळा, शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांना राज्य सरकारकडून मिळालेले आदर्श शिक्षक पुरस्कार, स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयात जिल्हास्तरावर आलेला प्रथम क्रमांक, मिपा औरंगाबाद या शासनाच्या संस्थेने जाहीर केलेली महाराष्ट्रातील एक सृजनशील शाळा म्हणून केलेली निवड ,सतत १४ वर्षातील १० वीचा १००% टक्के निकाल, एन एम एम एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती व स्कॉलरशिप यामध्ये ६२ विद्यार्थ्याना ४८ हजार प्रमाणे मिळालेली शिष्यवृत्तीचा लाभ, गुणवत्ता वाढ करण्यासाठी शाळेने राबवलेले वेगवेगळे उपक्रम, कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण, परसबाग, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये राबवलेली स्वच्छतेविषयी जागृती ओला कचरा गांडूळ खत निर्मिती तंबाखूमुक्त शाळा, मेरी माटी मेरा देश अंतर्गत राबवलेली उपक्रम, कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांचे घेतलेले प्रशिक्षण व मिळालेले प्रमाणपत्रे, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आर.ओ. शुद्ध पेयजल पुरवठा, ७५ हँड वॉश स्टेशन, वर्गाचे व शाळेचे सुशोभीकरण, पट संख्येत भरीव वाढ आसपासच्या गावातील ५१० विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश तसेच शाळेने राबवलेल्या प्रभावशाली उत्कृष्ट उपक्रमांचा विचार या मूल्यांकनामध्ये करण्यात आला. शाळेतील वृक्षारोपण पर्यावरण पूर्वक वातावरण आनंददायी वर्ग प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही मार्फत विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाने केलेले अध्ययन अध्यापन, अटल टिंकरिंग लॅब मार्फत रोबोटिक्स कोडींग चा वापर करून तयार केलेले विद्यार्थ्यांचे उपक्रम, आयसीटी लॅब मध्ये मार्फत विद्यार्थ्यांचे घेतलेले कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण,शालेय प्रशासकीय कार्यालयीन सर्व कागद कागदपत्रांची शाळेची दाखले बोनाफाईड सर्व निकाल पत्रके यांची संगणक सॉफ्टवेअर द्वारे केलेली नोंद, क्रीडा स्पर्धेत मिळालेली पारितोषिके, शाळा विकासासाठी मोठ्या प्रमाणात घेतलेला लोकसहभाग मदत, शासनाच्या महावाचन चळवळीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग, मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा समिती मार्फत राबवलेले उपक्रम व निर्भया व दामिनी पथकाचा शाळेने घेतलेला सहभाग, एक सुरक्षित शाळा म्हणून मिळालेली समाज मान्यता, निसर्गरम्य शालेय परिसर, या सर्व बाबींची पाहणी शिक्षण विभागाने कोल्हापूर शिक्षण उपसंचालक विभागीय अंतर्गत कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग व सांगली ५ जिल्ह्यातील स्पर्धेत पण ही शाळा प्रथम आली आहे. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ही शाळा पात्र ठरलेली आहे कळंबी ता मिरज अजितराव घोरपडे विद्यालय या शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे प्राथमिक माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शाळेत शिकणाऱ्या भोसे सोनी पाटगाव सिद्धेवाडी मानमोडी मालगाव तानंग पालक सरपंच पदाधिकारी, शिक्षण प्रसारक मंडळ कळंबी यांनी शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केलेली आहे.