Now in educational institute named as Sw. Savrkar Pratishthan

  • Home
  • India
  • Sangli
  • Now in educational institute named as Sw. Savrkar Pratishthan

Now in educational institute named as Sw. Savrkar Pratishthan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Now in educational institute named as Sw. Savrkar Pratishthan, Sangli.

18/01/2024

सहवीस जानेवारी साजरा करतांना पुढे दिलेली कविता आपण विद्यार्थ्यांचे कडून म्हणून घेऊ शकता. ______

मातृभूमी वंदना...
सामर्थ्य दे तू मला मातृभूमी
सेवा तुझी नित्य हातून व्हावी
तुझी किर्ती आम्ही दिगंतात न्यावी | धृ.|

गंगा नि सिंधू कावेरी कृष्णा
सहस्र सरिता शमवीती तृष्णा
सुजलाम भूमी सुफलाम भूमी
अन्नोदकाची आम्ही आण घ्यावी |१|

तुझा उंच माथा, हिमालयाचा
तुझ्या हाती साठा रत्नाकराचा
तू स्वर्ण भूमी, तू स्वर्ग भूमी
तुझ्या वैभवाची आम्हा जाण यावी |२I

तुझी संस्कृती सहस्रकांची
वैदिक द्रविड जीन बौध्द यांची
तू आर्यभूमी तू पुण्यभूमी
अशी दिव्य मूर्ती हृदयी जपावी. |3 |

तू क्षात्रभूमी श्री विक्रमांची
चाणक्य मौर्य प्रताप शिवांची
सन्मार्गतेने जग जिंकणार्या
त्या क्षात्रतेजा पुन्हा जाग यावी | ४ |

तू कर्मभूमी गीतार्थतेची
तू ज्ञानभूमी शोधक साधकांची
जगाच्या पुढे जी नेईल आम्हा
अशी ज्ञानगंगा पुन्हा प्राप्त व्हावी |५|

नवीन यूग नवीन पर्व
समृध्दतेचे नवीन मार्ग
चारित्र्य जपुनी ते चालतांना
संधी सुखाची सर्वांस द्यावी | ६ |
------प्रभाकर खाडिलकर

22/09/2022

श्यामच्या आईचं आज काय करायचं.......?

या शिक्षण विषयाच्या लेखात वसंत बापट लिहितात की साने गुरूजींची आई म्हणजे शामची आई, कोकणातल्या गरीब कुटुंबातील चारचौघींसारखी सामान्य स्त्री असली तरी तिच्या सामान्य असण्यात तिचे असामान्यत्व होते.

मूल ६ तास शाळेत आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा तशी उशिराच येते. त्याची सुरवातीची महत्वाची वर्षे आईच्या विद्यापीठात जातात.

शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे? याचा आपण विचार करूया
त्यासाठी श्यामच्या आईची वैशिष्ठ्ये पहायला हवीत.

*‘श्यामची आई’* कोणतेच तत्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशीक भारतीय महिला आहे. अविरत कष्ट, सोशीकता आणि अपार समजूतदारपणा यांनी तीचं आयुष्य व्यापलेलं आहे. त्यामुळे ती आजच्या नव्या पिढीच्या तथाकथित स्वातंत्र्यवादी महिलांना आदर्श वाटणार नाही.

पण तिचे ते समर्पण गुलामी म्हणून बघता येणार नाही.
ती हलाखीच्या दारिद्रयात अत्यंत स्वाभिमानी आहे.
स्वत:च्या वडिलांना ही ती दरिद्रयात आम्ही आमचे बघून घेऊ हे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच ती नागिणीसारखी परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर धावून जाते.

हा तिचा दारिद्रयातला स्वाभिमान थक्क करून टाकतो.
श्यामने कुठेतरी जेवायला गेल्यावर दक्षिणा आणल्यावर ती त्या गरिबीतही ते पैसे मंदिरात नेऊन द्यायला सांगते.

गरिबीतल्या तिच्या या मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे. ती स्वत: मुलांना आदर्श तिच्या समर्पणातून घालून देते.
त्यामुळे शाभची आई एक शिक्षिका म्हणून खूप भावते.

कुटुंबव्यवस्थेत ठरवले तर किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात? छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणिवा विकसित करते. यासाठी मला ती भावते.

ती पर्यावरण, जातीयताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सारं सारं शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पाने तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते.

आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. दलित म्हातारी मोळी उचलू शकत नाही म्हणून त्या बुरसटलेल्या काळात श्यामला दलित म्हातारीला स्पर्श करायला लावते.
या सर्व गोष्टीतून ती जे संस्कार त्याच्यावर करते ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत.

श्याम डोक्यावरचे केस वाढवल्यावर. वडील रागावतात.तेव्हा श्याम म्हणतो *“आई केसात कसला गं आलाय धर्म"* तेव्हा ती म्हणते, *"तुला केस राखायचा मोह झाला ना. मोह टाळणे म्हणजे धर्म!"* इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच कोणी सांगितली असेल.

शामची आई मुलाला केवळ उपदेश न करता तीचे संवादी राहणे विलक्षण हलवून टाकते. मूल जे विचारील त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार ती समजून सांगत राहते. आजच्या नव्या पिढीच्या मातांसाठी श्यामची आई मला म्हणूनच महत्वाची वाटते.

आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते ते मुलाच्या करियर च्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत.

पण श्यामने इतक्या गंभीर चुका करून ही त्याची आई सतत करुणेने ओथंबली आहे. आज हा संवाद आणि मुलांशी त्याच्या पातळीवर जाऊन व्यक्त करणेच कमी झाले आहे. असलाच तर *‘श्यामच्या आई’* चा हा धागा महत्वाचा आहे.
तेव्हाचा अभावातला आणि समर्पणातला आनंद महत्वाचा आहे.

आजच्या पिढीच्या मातांसाठी श्यामच्या आईचे आज औचित्य काय आहे? असे विचारल्यावर
अनेकजण म्हणतील की आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुले आता काही श्याम इतकी भाबडी राहिली नाहीत. मोबाइल आणि संगणक वापरत ही पिढी खूप पुढे गेली आहे.

हे जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवायला मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल.

आज मध्यमवर्ग /उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत.

जीवनात आनंद, यश विकसित करावे लागतात, रेडीमेड मिळत नाहीत याची जाणीव मुलांना असणे आवश्यक आहे. अभाव वाट्याला न आल्याने गरीबी वंचितता याची वेदना त्याना कळत नाहीत.

अभावातूनही पुढे कसे जायचे हे ही उमगत नाही किंवा आजूबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरीबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही.

आजची मुले एकमेकात ज्या गप्पा मारताना कळते की मूले आत्मकेंद्रित होत आहेत. ते भयावह आहे.

समाजातील वंचितांविषयीची वेदना त्यांना हलवत नाहीत. सामाजिक किंवा कौटुंबिक उत्सवाचे, यशाचे, आनंदाचे प्रसंगही त्यांना आपले वाटेनासे होताहेत.

डिस्कवरी वाहिनीवर, हरिण जिवाच्या आकांताने पळत असतांना. वाघ हरिणावर झेप घेते ते दृश्य मुले सहजतेने बघतांना ती भयचकित होत नाहीत.
हीच मुले पुढे अपघात आणि खून ही असेच चवी चवीने लाईव्ह बघतील.

मुलांचे हे कोलमडणारे भावविश्व याची मला चिंता वाटते आणि हीच मुले उद्या अधिकारी होणार आहेत. निर्णयप्रक्रियेत सहभागी असणार आहेत. त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे प्रश्न तरी कळतील का?

पुन्हा या सर्वातून मुलांचा अहंकार चुकीच्या पद्धतीने विकसित होतो आहे.
थोडे बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.

पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर काम आणि घरी आल्यावर टीव्ही फोन आणि सोशल मीडियात रमून गेलेत.
याला मुलांच्या आई ही अपवाद नाहीत.
यातून मुलांशी संवाद बंद झालेत.

घरात वस्तु मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये. यातून मुले प्रेम दुसरीकडून, वस्तूमधून मिळवतात आणि संवाद ही चुकीचा करू लागतात.

*इथेच नेमकी श्यामची आई मला महत्वाची वाटते.* ती मुलाशी सतत बोलत राहते. वैतागून चिड चिड न करता पण कणखरपणे ती त्याला समजावून सांगते.

छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते.

आजच्या सुशिक्षित कुटुंबातील श्यामच्या आईकडून हे शिकायला हवे.
(वसंत बापटांचे मूळ लेखाचा हा सारांश आहे)

19/09/2022

कांग्रेसने केले काळे कायदे.
वक्फ बोर्डाने उचलले फायदे.
आपण करत बसलो ध्यान
विसरून देशहिताचे भान.

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Now in educational institute named as Sw. Savrkar Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share