02/02/2024
*सोशल मीडिया पोस्ट पाहून खो-खो खेळाडूंना बक्षीस*!
*श्री.अमोल गायकवाड सर ( सांगोला) यांच्या कडून कुलाळवाडीच्या संघाचे कौतुक*!
सातत्यपूर्ण खेळाने तालुक्यात सर्वोत्तम कामगिरी करत सर्वांची मने जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत निर्णायक वेळी झेप घेत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना गारद करणाऱ्या यश बंडा नेमाने यास 251 रू. बक्षीस देऊन वृक्षप्रेमी गायकवाड सरांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. सोबतच विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी मेहनत घेणारे श्री. मुंडे सर, घोदे सर, कोरे सर,पवार सर, राख सर, कोकणी सर, श्रीमती खरात मॅडम, मुख्याध्यापक श्री. कबाडगे सर यांचे अभिनंदन सरांनी केले.
सरांचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार!