30/09/2023
वाह भाई वाह...मजा आ गया!
सकाळपासून पावसाने जोर धरला होता,त्यामुळे 'डेमो सेशन' विषयी थोडी धाकधूकच होती.स्टुडंटचे फोन येऊ लागले होते,'मॕडम,पाऊस फार आहे,कसे येणार?'.ठीक आहे,बघूया काय होते ते,असं मनात म्हटलं.चारच्या दरम्यान काही स्टुडंट आले,मी लगेच सेशन चालू केला.काहीच मिनिटात आणखी स्टुडंट आले मग मात्र तातडीने मेकॕनिकला फोन केला आणि सेशनची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली.
महिला स्टुडंट असोत वा पुरुष स्टुडंट,सगळेच तन्मयतेने माहिती ऐकत होते.स्टेपनी बदलायचं प्रात्यक्षिक स्वतः करत होते.मुबारकभाईंनी सोप्या शब्दात सारी माहिती उलगडून सांगितली.माझ्यासारखीच 😊एक पातळ वजनाची स्टुडंट होती,पान्याला धरुन झोके घेतली तरी चाकाचा नट काय जाग्यावरुन हलला नाही.खळाखळा हसायला लागली आणि आम्ही सगळेच तिच्याबरोबर खळखळून हसलो.
नारीशक्तीनं मनात घेतली की किती समरसून काम करते याची एक प्रचिती आली.गाडी शिकणे म्हणजे आनंदाचा मामला मात्र गाडी रीपेरींग,मेंटेनंस म्हणजे रुक्ष मामला असे अनेक समजतात.मात्र मैत्रीण स्मिता मॕडमनी चक्क मेकॕनिकला 'व्हिल अलाईनमेंट म्हणजे काय,ती कशासाठी करतात आणि कशी करतात?',असा प्रश्न विचारला.(continued)
विचारला.म्हटलं तर हा क्लिष्ट विषय.मात्र मेकॕनीक सुखावला...पार गाडीच्या टायरची बॕलन्सिंग वेट्स त्यांनी काढून प्रत्येक स्टुडंटला बघायला दिली आणि सगळी माहिती सांगितली.जाताना मला म्हणाला,'मॕडम,असे प्रश्न विचारणारे स्टुडंट असतील तर मजा येते डेमो सेशन करायला.मीही हसून मान डोलावली.
शब्दसंख्येची भीती वाटते.एव्हढ्या मोठ्ठ्या पोस्टी वाचणार😊🤦🏻♀️😂 कोण?...असो,थांबत्ये!👍👍🏻👍🏻🚗🚗🚗फोटोज् शेअर करते.