Little Angels School & Jr College, Puntamba

Little Angels School & Jr College, Puntamba Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Little Angels School & Jr College, Puntamba, School, Shrirampur Road, Puntamba.

आपली शाळा-आपला अभिमान!सन्मान कर्तुत्वाचा! सन्मान दातृत्वाचा!आपणास कळविण्यास मनस्वी आनंद वाटतो आहे की,रविवार,दि.८ सप्टेंब...
09/09/2024

आपली शाळा-आपला अभिमान!

सन्मान कर्तुत्वाचा! सन्मान दातृत्वाचा!

आपणास कळविण्यास मनस्वी आनंद वाटतो आहे की,रविवार,दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी आणि सांदिपनी अकॅडमी,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात स्व.अप्पासाहेब धनवटे मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टचे लिट्ल एंजल्स स्कूल व ज्युनिअर कॉलेज,पुणतांबा महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.सुरेश पटारे आणि सहशिक्षिका सौ.अश्विनी घाडगे यांचा अनुक्रमे आदर्श विद्यालय आणि विद्याविभूषण पुरस्काराने श्रीमती.मीनाताई जगधने-चेअरमन रयत संकुल, श्रीरामपूर तसेच मा.श्री.अक्षयदादा कर्डिले-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री.अशोक कडूस-शिक्षणाधिकारी (माध्यमिक),श्री.भास्कर पाटील-शिक्षणाधिकारी (प्राथमिक),श्री.बाळासाहेब बुगे-शिक्षणाधिकारी (योजना),श्री.दिनकर टेमकर-माजी शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्ह्यातील एकूण शंभर पेक्षाही जास्त पुरस्कारप्राप्त शाळांचा सहभाग होता.तसेच राहता तालुक्यातून फक्त दोनच शाळांची निवड करण्यात आली होती.ही उल्लेखनीय बाब आहे.

स्व.आप्पासाहेब धनवटे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा आदरणीय डॉ.श्री.धनंजय धनवटे, व्हा.चेअरमन मा.श्री राहुल धनवटे, संचालिका सौ.वैजयंती धनवटे आणि इतर सर्व पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून आणि योग्य मार्गदर्शनातून विद्यालयाला मिळालेला हा बहुमान निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार.

धन्यवाद !

29/03/2024

GRADUATION DAY CEREMONY-2023-24 !

Start Where You Are.
Use What You Have.
DO What You Can.

Congratulations to all the UKG tiny-tots!

दर्जेदार शिक्षणाची सर्वोत्तम हमी ,परिपूर्ण मार्गदर्शनासह !=======================इथं मिळतं संस्कारच लेनं, अन् संस्कृतीचं...
26/03/2024

दर्जेदार शिक्षणाची सर्वोत्तम हमी ,परिपूर्ण मार्गदर्शनासह !
=======================

इथं मिळतं संस्कारच लेनं,
अन् संस्कृतीचं देणं !

'आप्पासाहेब धनवटे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट' चे लिट्ल एंजल्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,पुणतांबा.

जिद्द विद्यार्थी घडविण्याची !!
ज्ञान-संस्कारक्षम बनविण्याची!!

आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भावी उज्वल भविष्यासाठी !

प्रवेश देणे चालू आहे !!!

📚 इंग्रजी माध्यम प्रि-प्रायमरी आणि इयत्ता पहिली ते बारावी विज्ञान.

अधिक माहितीसाठी संपर्क:

👇🏻

लिट्ल एंजल्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,पुणतांबा.
एचपी पेट्रोल पंपाच्या मागे, श्रीरामपूर रोड, पुणतांबा-४१३७०७.
ता. राहाता,
जि. अहिल्यानगर.

20/02/2024

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

आज लिटल एंजल्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा येथे
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लिटल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा येथे ७५ वा गणतंत्र  दिवस उत्साहात साजरा...लिटल इंग्लिश स्कूल अँड जूनियर ...
27/01/2024

लिटल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा येथे ७५ वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा...

लिटल इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेजमध्ये आज ७५ वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कृषी भूषण पुरस्कार प्राप्त माननीय श्री. प्रताप दादा धोर्डे पाटील, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,वैजापूर हे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री.अण्णासाहेब मोरे पाटील, संस्थापक , बजरंग दूध उत्पादक संस्था, बाबतरा, ता.वैजापूर , डॉ.श्री.धनंजय धनवटे, चेअरमन,स्व.अप्पासाहेब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वस्त डॉ.सौ.धनश्री धनवटे,
श्री.बापूसाहेब बोराडे,सौ.सरिताताई बोराडे, विश्वस्त श्री.मनोज धनवटे,
श्री.दीपक नाईक आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत व ध्वजगीत गायनाने परिसर देशभक्तीमय झाला होता.चिमुकल्यांनी केलेली देशभक्तीपर भाषणे,सांस्कृतिक कार्यक्रम व पथ संचलन यांनी उपस्थितांची मने जिंकली.

संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री.राहुल धनवटे,संचालिका सौ.वैजयंती धनवटे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रंगोत्सव स्पर्धेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेच्या संचालिका सौ. वैजयंती धनवटे, उप-मुख्याध्यापक श्री.सुरेश पटारे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

सस्नेह नमस्कार !आपणास कळविण्यास आनंद होतो आहे की,दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लिटिल एंजल्स स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पुणतांब...
21/12/2023

सस्नेह नमस्कार !

आपणास कळविण्यास आनंद होतो आहे की,दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लिटिल एंजल्स स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पुणतांबा मध्ये शनिवार, दि.२३ डिसेंबर,२०२३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन- कलाविष्कार -२०२३ आयोजित केलेले आहे.

सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे,ही विनंती.

धन्यवाद !

15/06/2023

आनंदोत्सव !

शाळेतील पहिला दिवस विद्यार्थ्यांचा "औत्सुक्याचा" आणि "औक्षणाचा !"

Reach for the stars, our little superstars.

With a heart full of🤩 hope,
Mind full of 🥳happiness,
With bright 🎊shiny eyes,💫
Our little angels stepped into the school for their first day of 📚schooling. It was a day filled with excitement, 🎉amusement, enthusiasm🥳 and hope.

We at LAS made it exceptional with our🎊 little efforts to make “Their Big Day a Bigger one!”.

04/06/2023
02/06/2023

स्व.अप्पासाहेब धनवटे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित,लिटिल एंजल्स स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,पुणतांबा शाळेचा सलग चौथ्या वर्षीही १०० % निकालाची परंपरा कायम...

💐💐-आमचे गुणवंत विद्यार्थी-💐💐

१.कु.समीक्षा अनंत लावर -९४.२० %-प्रथम
२.कु.साईशा राहुल धनवटे- ९२.४० %-द्वितीय
३.कु.श्रावणी प्रेमनाथ बाभुळके-८९.८०-तृतीय

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन !💐💐💐💐

Address

Shrirampur Road
Puntamba
413707

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919822393925

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Little Angels School & Jr College, Puntamba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Little Angels School & Jr College, Puntamba:

Shortcuts

Share

Category