15/06/2025
Apurwai Prakashan Pune
Apurwai Prakashan Pune Publishing & Suplier Project Books For 11th & 12th Std. Student & Jr, College in Maharashtra
15/06/2025
27/04/2024
किचन की मनी सेवीग टिप और हेक्स #hacks #food #haircare #recipe #kitchenhacks #cookingvideo #new
14/07/2023
I have reached 800 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
25/04/2023
25/04/2023
*काळोखातील... काजवे..."*
*या प्रा.उदय सुपेकर यांच्या नियोजित 'लघुकथा संग्रहा' मधून....*
*वाचकांच्या आग्रहास्तव...*
*ही खास ' अपूर्व भेट...'*
*साभार सादर.....*
*लघुकथा-36*
*ठेव.... मर्मबंधातली....*
एखादे 'टार्गेट...' पकडलेले काम पूर्ण होते.....
आणि काम करण्यासारखे पुढील काही दिवसांसाठी काहीचं शिल्लकचं उरत नाही.....
तेव्हा मनाची होणारी 'हुरहुर अवस्था', काही 'औरच' असते.....
आता नव्याने कशाची सुरुवात करावी....
याचा मेंदू विचार करू लागतो....
पण
नवनवीन कल्पना देणारा मेंदू सुद्धा 'थिजून' जातो.....
अशावेळी तर ही 'बैचनाअवस्था' आणखी वाढत जाते......
अशाच काही-बाही विचारांच्या ओघात आज त्याचे जीवन 'ओतप्रत' वाहून जात होते....
मिळालेला रिकामा वेळ आणि नवे काही करण्याची आतील उर्मी वर उचंबळून येत होती.....
त्याचा स्वतःच स्वतःशी चाललेला हा आतला संवाद....
जणू काही त्यालाच खायला उठला होता....
तो विचार करू लागला....
आणखी खोल.... खोल....
आणि खोलवर....
जणू काही अलीबाबाच्या गुहेत शिरून त्याचे हे शोध सत्र चालू होते....
पण आज गुहेत भरपूर मोठे 'पेठारे' त्याला दिसले....
पण
अगदी रिकामे.... रिकामे...
मगाशी टीव्ही पाहताना त्याने उगीचच एका मालिकेची जाहिरात पाहिली होती...
तो विचार आता त्याच्या डोक्यात घोळू लागला....
त्यातील अभीनेता म्हणतो की,
'प्रत्येकच वेळी यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री नसते, तर ती त्याला त्याच्या ध्येयापासून 'विचलित' करीत असते....'
या विचारांशी तो अभिनेता अगदी घट्ट राहणार असावा, असेच तो प्रतिबिंबित करीत होता....
किंबहुना
त्याचा सूरच तसा होता.....
तेव्हा
अभिनेत्री चे उत्तरही तितकेच मार्मिक त्याने ऐकले होते...
ती म्हणते,
'ज्याविषयी तुम्हाला एवढा अहंकार वाटतो आहे, त्या स्त्रीच्या एक ना एक दिवस तुम्ही पाया पडाल....'
आणि
त्यालाही त्याच्या भूतकाळातली काही वाक्य आठवली......
कधीतरी त्याने वाचलेली....
मेंदूच्या पटलावर रुतून बसलेली.... त्याची ही काही मत होती,
याच 'स्त्री...: संदर्भातली....
ती हलकेच अशी मेंदूच्या वरच्या प्रतलातून विचारांच्या पातळीवर तरंगत पुढे ओघळू लागली.....
त्यामध्ये असा ही एक विचार होता की....
'स्त्रीला अक्कल फार कमी असते....
पण
पुरुषाच्या बुद्धीचा उपयोग कसा करून घ्यावा हे मात्र तिला फार चांगले कळते...!!'
'म्हणूनच यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री कारणीभूत असते....!!!'
हो.... आता या गोष्टींचा... या विचारांचा त्याच्या मेंदूच्या अंतरंगात संदर्भ जुळू लागले....
त्यातील मर्म बंधनात खोल-खोल शिरून तो पाहू लागला....
आणि त्याला सापडलं....
एक आगळं वेगळं नवीनच मर्म....
स्वतःच्याच विचार कुपीत दडवून ठेवलेलं....
अत्तराचा स्प्रे कुणीतरी मारावा आणि सरकन सगळीकडे 'सुगंध' दरवळत सुटावा.....
अगदी तसंच काही झालं....
'विचार मर्माचे कंगोरे मेंदूच्या पटलावर आता घुमू लागले....'
'अभिनेत्याचा वाक्यही अगदी तंतोतंत खरं होतं ....'
आणि
'अभिनेत्री जे काही म्हणते हे ही अगदी खरे होते...'
पण
'फक्त ही गोष्ट परिस्थितीवर अवलंबून असते....
एक वेगळंच सत्य त्याला आता उमगलं होतं.....
त्याच्या रिकाम्या मेंदूत आता तिसराच विचार फुलू लागला...
की...,
जो त्याच्या साधनेने त्याला दिला होता....
*या सर्वांचा सार आपल्या जवळ असलेल्या वाक्यात आहे....*
*आणि*
*त्याची बैचना अवस्था आता गळून पडली...*
*त्याची जागा आता आनंदाने घेतली....*
*जणूकाही ....*
*'अलीबाबाच्या गुहेत पेटाऱ्यांमध्ये त्याला 'मर्म...' विचारांचा 'सुवर्ण ठेवाच' सापडला....'*
(सदरहू माझ्या सर्वच लघुकथा वास्तवाचे दर्शन व भावनात्मकता यांचे चित्रण करतात त्या काल्पनिक असून कोणाचीही भावनिकता दुखावणे हा हेतू या पाठीमागे नाही जर अशा पद्धतीचा संबंध कोणाच्या जीवनात आला असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*- प्रा. उदय सुपेकर*
*वडगाव बुद्रुक पुणे*
*संपर्क- 8087161699*
*25 एप्रिल 2023*
*महत्वाचे- सेन्सॉर:- पूर्व परवानगी शिवाय प्रक्षेपणास प्रतिबंध*
11/09/2022
*काळोखातील... काजवे..."*
*या प्रा.उदय सुपेकर यांच्या नियोजित 'लघुकथा संग्रहा' मधून....*
*वाचकांच्या आग्रहास्तव...*
*साभार सादर.....*
*लघुकथा 32*
*रहस्यपट....*
त्याला खूप प्रश्न पडायचे...
त्या प्रश्नांची उत्तर मात्र कधीच सापडायची नाहीत....
खूपच जिज्ञासूपणा पाळायचा का तो....?
बघ ना... आता तुम्हाला तरी त्या प्रश्नांची उत्तर सहज देता येतात का....?
त्याला पडलेला एक प्रश्न असा असायचा....
दोन भाऊ एकाच घरात जेवतात... आणि तेही एकाच व्यक्तीने केलेला एकच पदार्थ एकसमान खातात... बालपणापासून कित्येक वर्ष....
पण
दोघांचे स्वभाव मात्र वेगवेगळे....
असं का.....?
याचे उत्तर येत नाही म्हणून पुढचा प्रश्न त्याचा लगेच तयार....
एकाच मातीत दोन वेगवेगळ्या बिया आपली वेगवेगळी रूप धारण करतात.....
त्यांना फळ येतात...
फुले येतात....
पण ती वेगवेगळी असतात....
त्यांच्या जनुकीय तंत्रानुसार...
मग मातीत असा नेमका कोणता गुणधर्म आहे....
की वेगवेगळ्या रोपांना वेगवेगळे जीवनसत्व देण्याचा सुद्धा ते गुणधर्म पाळतात.....
जर ते हा गुणधर्म पाळत असतील तर मग या एका फुलाचा सुगंध दुसऱ्या फुलाला आणि या एका फळाचा सुगंध, चव दुसऱ्या फळाला असे कधीच का घडत नाही...?
मातीचे विश्लेषण केले तर त्यातही काही सापडत नाही.....
हाती लागते ती मातीच.....
याचा शोध कोणी लावेल का....?
की लगेच तिसरा प्रश्न त्याचा तयार असायचा.....
सूर्याचा अग्नी कोण तेवत ठेवत असेल....?
आणि तेथे नेमके काय जळत असेल...?
आणि जर काही जळत असेल तर त्याची राख कोठे जात असेल....? हजारो वर्षे झाली म्हणे......
अव्याहतपणे हे कार्य चालू आहे....
पण काय जळतंय सापडत का नाही बरं......?
सूर्याचं ऊन अगदी सहन होणार नाही इतकं गरम.....?
आणि चंद्राची शितलता किती अल्हाददायक.....!!!
अ हा हा....
काय वर्णन करावे या चैतन्याचे....!!!
कोणाचा नियंत्रण आहे यावर.....?
आणि हे सगळे वेडे शहाणे लोक त्याला ग्रह आणि उपग्रह म्हणतात....
निर्जीव असून ही फिरतात सुद्धा स्वतः भोवती अन इतरां भोवती ते नित्य नियमाने.....
पण हा.....
कक्षा मात्र सोडत नाहीत ते आपली....
ही शिस्त त्यांना लावतो कोण.....?
त्याचे तत्व नेमकं काय....?
विज्ञानवाले सांगतात हे सगळं गुरुत्वाकर्षणा न घडतं.....
पण हे गुरुत्वाकर्षण नेमकं कोणी निर्माण केले.... प्रत्येकात वेगवेगळे...
काहीच कल्पना नाही बुवा...?
तर त्यांचे उत्तर ठरलेलं....
काळाच्या ओघात निसर्गात हे आपोआप घडतं....
मग
आपोआप घरात भाकरी तयार नाही होत..... काळाच्या ओघात...?
आपोआप ताट जागा सोडून समोर पुढ्यात येऊन घराच्या मालकाला जेवण नाही देत..... काळाच्या ओघात....?
किती असंख्य प्रश्न.... प्रश्न..... आणि प्रश्न .....??
पण उत्तर नाही मिळत...
त्याच्या मेंदूला हे सगळं प्रश्न अगदी चेवरं करून सोडायचे....
काय नव्हतं त्या प्रश्नात....?
बर्मुडा ट्रँगल मध्ये जाणारी विमाने, जहाजे, वस्तू अचानक नाहीशा कशा होतात....?
पृथ्वीवरचा आठवा अखंड समुद्रा खाली कसा गेला...?
ॲमेझॉनच्या जंगलाचा पूर्ण शोध माणसाला का नाही लागत...?
तिथल्या गरम पाण्याचे रहस्य काय..?
मासा पाण्यात पोहत पोहत झोपतो कसा...?
अरे हे तर सगळेच रहस्य....???
किती किती..... आणि किती किती.....
हे प्रश्न त्यांने जगातल्या माणसांना विचारले....
माणसं त्याला ठार वेडा म्हणू लागली....
पण खरंच तो ठार वेडा होता....
की मनातल्या प्रश्नांचा शोध घेणारा.....?
शहाणा....? जिज्ञासू....? अभ्यासू.....?
काहीजण त्याच्या या प्रश्नांना ऐकून तो खूप अभ्यासू, जिज्ञासू आणि शहाणा आहे असे म्हणायचे....
पण त्यांच्यापाशी देखील वरील प्रश्नांची उत्तरे नसायची....
मग मला सांगा.....
तो वेडा होता...? की शहाणा होता....?
अध्यात्मिक माणूस म्हणतो हे सर्व देव आणि परमेश्वर नियंत्रित करतो म्हणे...
पण तो देव का परमेश्वर देखील आजपर्यंत कुणाला येऊन प्रत्यक्ष सांगू शकला नाही....की....
हो हो.... मीच करतोय सर्व म्हणून....
मग काय....?
तुम्हालाही प्रश्न पडला ना...?
सांगू का ...? याचे उत्तर....
*बघा... याला सरळ भाषेत 'रहस्य...' म्हणतात....*
*आणि 'रहस्याचा' एक गुणधर्म आहे, की त्याचे 'रहस्य' कधीच उलगडत नाही....*
*अगदी तुम्ही येण्यापूर्वी ते होते ...*
*आणि तुम्ही निघून जाल तरीही ते असेल.....*
*यालाच तर 'रहस्य...' म्हणतात..…*
*थोडक्यात रहस्य मानवी जीवनातील न उलगडणारे गणित.....*
*आणि नाकारता न येणारे सत्यदेखील आहे....*
*हे मात्र तितकेच खरे....*
(सदरहू माझ्या सर्वच लघुकथा वास्तवाचे दर्शन व भावनात्मकता यांचे चित्रण करतात त्या काल्पनिक असून कोणाचीही भावनिकता दुखावणे हा हेतू या पाठीमागे नाही जर अशा पद्धतीचा संबंध कोणाच्या जीवनात आला असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*- प्रा. उदय सुपेकर*
*वडगाव बुद्रुक पुणे*
*संपर्क- 8087161699*
*12 सप्टेंबर 2022*
*महत्वाचे- सेन्सॉर:- पूर्व परवानगी शिवाय प्रक्षेपणास प्रतिबंध*
09/09/2022
*काळोखातील... काजवे..."*
*या प्रा.उदय सुपेकर यांच्या नियोजित 'लघुकथा संग्रहा' मधून....*
*वाचकांच्या आग्रहास्तव...*
*ही खास ' अनंत चतुर्दशी भेट...'*
*साभार सादर.....*
*लघुकथा-31*
*धागा.... आनंदाचा....*
आज अनंत चतुर्दशी ...
काय उधान आलं होतं मनाला....
गेल्या दहा दिवसापासून आनंदाच्या सोहळ्याची परिसीमा गाठणारा असा हा दिवस.....
आणि
आजचा
हा शेवटचा दिवस....
अर्थातच...
गणेशाच्या निरोपाचा.....
*'मृतिके पासून बनवलेला गणेशा जलाशी साधर्म्य साधून त्यातच विलीन पावणारा.....'*
*'दरवर्षी बाप्पा येतो...*
*आणि*
*'दरवर्षी असाच विसर्जित होतो....*
*पण*
*येतानाही आनंद घेऊन येतो...*
*आणि*
*जातानाही मागे आनंद सोडून जातो....'*
कलाबुतांच्या सर्वांग सुंदर अवयवांची निर्मिती करणारे हे मूर्तिकार....
कलेला गणेशाचे सगुण रूप देतात तेव्हा कलावंताच्या कलेला आगळी वेगळी सुवर्णमय झळाळी प्राप्त होते....
आणि
साकारतो... तो हा गणेशा....
आज त्याचा असा निर्गुण निराकाराकडे चालणारा प्रवास...
करायला लावणारी मानवी जीवनाची ही अगम्य परंपरा....
आपल्या पूर्वजांनी निर्माण केली....
काय प्रयोजन असेल त्यामागे...??
विचारांच्या अशाच अनेक आंदोलनाची गती त्याच्या मेंदूत गिरक्या घेत होती.....
विचाराचा तंद्रीतच तो गावच्या बस स्टॉप जवळ असणाऱ्या बाजारपेठेत प्रातःकाळी केव्हा पोहोचला हे त्याची त्यालाही कळले नाही...
समोरच हाराच दुकान दिसलं हार वाला सकाळ सकाळ पान फुलं विकण्यासाठी दुकान सजवत होता....
आणि
त्यानं आवाज टाकला
"अनंत आहे का... भाऊ...."
"हो.. हो... आहे की.... किती हवेत...."
"आणि.... अनंती...."
"ती तर सोबतच असते ना... काका...."
मिश्किल पणे हारवाला म्हणाला...
तारेला अडकवलेल्या अनंतांकडे पहात पहात तो बोलला,
"तो लाल पिवळ्या रंगाचा....!! आणि चौदा गाठी वाला आहे ना....!!!
ते दोन अनंत आणि दोन अनंती दे मला...."
वर्तमानपत्राच्या कागदाच्या तुकड्यावर दोन अनंत आणि दोन अनंती ठेवून हारवाल्याने अलगदपणे पुडी बांधली....
"किती झाले?" तो
"21 रुपये... आणखी काही पूजेचं हवं का......" हारवाला बोलला....
"हा... थोडी फुले.. आणि पत्री दे.... एक हार दे... दूर्वा मात्र थोड्या जास्त टाक हं... आणि तुळशीच्या मंजुळा 108 मोजून घाल बरं...." तो हारवाल्याला म्हणाला ,
"आणि आता या सर्वांची किती झाले ते सांग बरं..."
"151 रुपये झाले.... " हारवाला बोलला.
त्याने खिशात हात घालून एक 100 ची... अन एक 50 ची नोट... आणि एक रुपयाचा ठोकळा बाहेर काढून दुकानदाराला दिला....
सर्व घेतलेलं पूजेचे साहित्य काकांच्या हातात देत हारवाला म्हणाला,
"काका, तुम्ही खूपच धार्मिक आणि परंपरा जपणारे वाटतात... अलीकडे यातलं काही लोक करत नाहीत... नुसता धांगडधिंगाणा घालतात...."
आणि
पलीकडे त्याच्या ही मेंदूत जुन्या दिवसांच्या आठवणींचा धांगडधिंगाणा सुरू झाला....
पुन्हा आपल्या विचारांच्या तंद्रीत तो गेला...
गेल्या पंचवीस-तीस वर्षा पाठीमागे दरवर्षी वडिलांनी आणि त्याने केलेल्या अनंत चतुर्दशीचं पूजन...
आता त्याला आठवू लागलं....
सकाळी सकाळी लवकर उठावं... घराशेजारच्या वाहत्या कॅनॉल वर जावं... थंड पाण्याची आंघोळ करावी....
धूत वस्त्र घालून... वडिलांचे बोट पकडून, गावच्या चावडीपाशी यावं... तिथे विविध रंगाचे अनंत पाहावेत... त्यातला कोणता घ्यायचा ते ठरवावे.... त्यासाठी हट्ट करावा...
ते अनंत घेऊन गावच्या विठ्ठल मंदिरात तसेच पोहोचावे.....
तर तिथे सत्यनारायणाची पूजा घालून बसलेला ब्राह्मण लगबगीने सर्व पूजेची तयार करीत असताना पाहावे...
आपण घेतलेले अनंत आणि अनंती अगदी हळुवारपणे अलगद काकांच्या चौरंगावर ठेवाव्यात....
साधारणपणे गावातल्या अनेक लोकांचे सगळे अनंत आणि अनंत्या त्या सत्यनारायणाच्या पूजेला एकत्रित गोळ्या झालेल्या असायच्या
विठ्ठल मंदिरातली ती ब्राह्मण काकांची पूजा म्हणजे जणू काही गावची सत्यनारायणाची महापूजाच असायची....
मग काकांचे मंत्र उच्चारण सुरू व्हायचे
सकाळच्या कोवळ्या उन्हात माधुर्याने भरलेली प्रसन्नता रंग भरू लागायची...
"अनंता मधुसूदना l पद्मनाभा नारायणा ll
तुमचा अनुग्रह लाभला l पावन झालो चराचरी ll
काका अनंताचे पूजन अगदी शास्त्रोक्त अभिमंत्रित करून प्रत्येकाला त्याचे त्याचे अनंत देऊ करायचे...
प्रसाद म्हणून हातावर पंचामृत आणि गोड शिरा ठेवायचे तो प्रसाद तिथेच भक्षण करण्याचा त्यांचा शिरस्ता असायचा...
"दिलेला अनंत घरातल्या बाप्पा पुढे ठेवून, घरातले महाप्रसाद झाल्यावर, गणेशाच्या पाया पडून, आपल्या उजव्या हातात अनंत पुरुषांनी बांधावा व स्त्रियांनी अनंती बांधावी" असे ते आवर्जून सांगायचे
पुढे हे ही सांगावयास विसरावयाचे नाही...
"जोपर्यंत अनंत हातात बांधणार नाही, तोपर्यंत काहीही भक्षण करावयाचे नाही, अनंत बांधल्यावर गणेशाची आरती करावयाची.. महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावयाचा.... आणि नंतर आपण स्वतः महाप्रसाद भक्षण करावयाचा...
आणि सांजवेळी गणेशाचे विसर्जन करावयाचे...."
असे आणखी काही सल्ले ब्राह्मण काका देत असायचे
मग ती अनंत आणि मंत्र फुलांनी अभिमंत्रित केलेली 'अनंत पुडी' घेऊन घरी यायचे...
बाप्पा पुढे ठेवून द्यायची.....
मग मध्यान्ही बाप्पाची आरती करायची....
महाप्रसाद भक्षण करायचा...
सायंकाळी बाप्पाला विसर्जित करून पाच खडे माघारी येताना घरी आणावयाचे .....
जिथे बाप्पा विराजमान झाला होता तिथे ते ठेवावयाचे...
तेव्हा तो वडिलांना विचारायचा,
"नाना... आपण हे कॅनॉलमधील पाच दगड का आणतो...?"
वडील म्हणायचे,
"अरे तो बाप्पा गेला...
त्या जागेवर ठेवलं की सुनं-सुनं वाटत नाही..."
केवढा तरी मोठा संदेश ते खडे द्यायचे....
प्राप्त आनंदानंतर पुन्हा नवीन जीवनाला अगदी स्थितप्रज्ञान सुरुवात कशी करावी.... असाच जणू तो संस्कार असायचा....
बाप्पा गेला तरी अनंत मात्र तसाच हातात बांधलेला असायचा...
त्याच्या बालमनाला पडलेला प्रश्न तो विचारायचा, "केव्हा सोडायचा हा अनंत....नाना...?"
ते म्हणायचे,
"तो सोडायचा नाही, त्याला पकडून ठेवायचा... कारण तो अनंत आहे... "
"म्हणजे....." त्याचं कुतूहल आणखी जागृत झालेले
"अरे मोजता येणार नाही एवढं अनंत आहे ते.... म्हणून तर त्याला अनंत म्हणतात...." स्पष्टीकरण देण्यासाठी वडिलांचे बोल....
"मग तसाच ठेवायचा...."
"हो....जेव्हा बाप्पाला वाटेल.... तेव्हा तो आपोआप सुटेल.... तो मोकळा करतो पहिल्या घेतलेला आनंदातून.... दुसऱ्या आनंदासाठी....."
त्याच्या बालमनालाही ही नवकल्पना आणखी सुखद आनंद देऊन जायची....
....आणि आता...गेल्या वर्षी पासून....
त्याला वडिलांनी दिलेलं हे व्रत...
तो आता एकटाच करतो आहे.....
पण
पूर्वीच्या बालपणीच्या अनंत चतुर्दशीचा आनंदातला आनंद आता त्याला मिळत नाही....
आणि त्याच्या अचानक लक्षात येत... आता नानांची जागा आपल्याला घ्यायची आहे....
ते गेलेल्या दिवसांना दोन वर्ष होत आली....
उद्या तर त्यांचे पितृपंधरावड्याचे महाळ आहे.....
आठवणींनी त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या....
हे व्रत पुढे द्यायचं.... त्याच्या रेशीम धाग्यात लपलेला आनंद आपल्या पुढच्या पिढीला वाटायला शिकवायचा.....
स्वतः स्वतःच्या मनाशीच तो बोलत होता....
जसा बाप्पा विसर्जित होतो तसेच ही मानवी रूप देखील कालांतराने विसर्जित होतात....
वडिलांच्या जाण्याचे दुःख झाले पण त्यांच्या या क्षणी आलेल्या आठवणीचा मात्र आनंद झाला....
त्याला वाटले आनंदाचा हा धागा मात्र आठवणींच्या झुल्यावर आपल्या सतत काळजात हिंदकळतो आहे...
या विचारांच्या खोल गर्तेतच यावर्षीचा 'अनंत' त्यानं हातात बांधला....
आणि
*त्या 'अनंताकडे' बालक होऊन तो पाहू लागला....*
*'किती अनंत आठवणी... त्या अनंता सोबत.... आनंदाने त्याच्याकडे झेपावत होत्या....*
*तो लाल- पिवळा- रेशीम धागा मनाशी खुणगाट बांधलेल्या गाठीसह....* *आपल्या मनगटाच्या रगीत आणि मनाच्या खंबीरतेत घट्ट रुतला आहे....'*
*'आता त्यांना फुलवलं पाहिजे... त्यांना हलवलं पाहिजे... त्यांना सजवलं पाहिजे.... आणि आनंदाने गाजवलेही पाहिजे....'*
*'अनंत.. फक्त एक रेशमी धागा...*
*पण विचारांचे अनंत कंगोरे त्या भोवती फिरवत नेणारी....'*
*अशी ही अनंत चतुर्दशी...*
*धागा धागा भरजरी वस्त्र विणायला शिकवणारी...'*
*बाप्पाच्या पितांबराची सुवर्णमय सोनेरी झळाळी आता त्याच्या अंतरंगात दाटून आली होती....*
(सदरहू माझ्या चित्रण करतात त्या काल्पनिक असून कोणाचीही भावनिकता दुखावणे हा हेतू या पाठीमागे नाही जर अशा पद्धतीचा संबंध कोणाच्या जीवनात आला असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*- प्रा. उदय सुपेकर*
*वडगाव बुद्रुक पुणे*
*संपर्क- 8087161699*
*09 सप्टेंबर 2022*
*महत्वाचे- सेन्सॉर:- पूर्व परवानगी शिवाय प्रक्षेपणास प्रतिबंध*
26/12/2021
🙏🙏
*सुप्रभात...*
*आजच्या 'आधुनिक केसरी' या औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रात माझ्या नियोजित कथासंग्रह "काळोखातील काजवे.." या 'कथासंग्रहातील' कथा 'चुटकी...' काळोखातील काजवे या नावाखाली प्रसिद्ध झाली आहे... 'आधुनिक केसरीचे' संपादक वाचक सर्वांचे मनःपूर्वक आभार...!!!*
*ही कथा वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा...*
*https://epaper.adhunikkesari.com/news/5708/61c73d620361d*
18/12/2021
आज दिनांक 18.12.2021 रोजी 'आधुनिक केसरी' या औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये माझ्या 'काळोखातील काजवे' या नियोजित 'लघु कथासंग्रहातील' लघुकथा 'एक गुलाबी शर्यत' आज प्रसिद्ध झाली आहे....
ही सर्व आपल्या सार्या रसिक वाचकांची माझ्यासाठी पावती आहे....!!!
आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद...!!!
लघुकथा वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा-
https://epaper.adhunikkesari.com/news/5418/61bcb757cbcca
16/12/2021
*काळोखातील... काजवे..."*
*या प्रा.उदय सुपेकर यांच्या नियोजित 'लघुकथा संग्रहा' मधून.....*
*बैलगाडा शर्यतीच्या नुकत्याच लागलेल्या निकालाच्या अनुषंगाने... खास आपल्या भेटीसाठी....*
*साभार सादर.....*
*लघुकथा-24*
*एक गुलाबी शर्यत....*
'आज मार्गशीर्षाचा गुरुवार....
ऋतूचक्राने नियम बदलल्यामुळे थंडीचे दिवस असूनही, आज भरदुपारी गोड गुलाबी थंडीचं वारं सुटले होतं...'
'दुपारच्या साडे बाराच्या दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाची बातमी बघता-बघता सगळ्याच शेतकऱ्यांच्या कानावर येऊन थडकली...'
अन
आसमंतात चौफेर गुलालाची उधळण सुरू झाली....
'गुलाबी रंगाचा माहोल' अक्षरशा पांढऱ्या धुक्या सारखचं पण 'गुलाबी' रंगाने वातावरणाला 'न्हाहू माखू 'घालू लागलं....
'गेल्या सात वर्षापासून प्रेमानं वाढवलेल्या आपल्या जित्राबा वरच्या प्रेमापोटी वाट पाहणाऱ्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या आनंदाला आता पारावार उरला नाही...'
टीव्ही चॅनल वर हाय कोर्टाच्या निर्णयाची आणि त्याला कव्हरेज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांच्या बातम्या दाखवण्याची जणू काही शर्यतच सुरू झाली होती.....
सगळ्याच पक्षांचे 'पुढारी..' 'आपल्यामुळेच शर्यत सुरू करण्याचा निकाल लागला....'
म्हणून
'श्रेय वादाच्या' 'बाईटचा चावा' चवी-ढवीने चघळत जनतेचा पुढ्यात सोडत होते.....
सगळ्या वार्तांकन करणाऱ्यांची एकच लगबग उडाली....
टीव्हीचा पडदा देखील, आज अशा 'गुलाबी बातम्यांनी' चांगलाच रंगू लागला होता.....
'हौसेने बैल पाळणारे 'गाडामालक' खुपचं अत्यानंदित झाले होते....'
आता
पुन्हा एकदा नव्या दिमाखात 'गाडा-मालकाची' पदवी रुबाबदार पणे धारण करून समाजात आपलं वजन कायम राखण्याचं त्यांचे 'स्वप्न...' पुन्हा 'नव्याने सुरू झालं...'
आपण स्वतः गाडामालक असल्याचा 'रुबाब काही औरच होता...'
आता पुन्हा त्याला पंख फुटणार होते....'
'काही अटी व शर्तींच्या अधीन राहून हायकोर्टाने बैलगाडा शर्यत सुरू करायला आज मान्यता दिली होती...'
'भैरुला जेव्हा ही बातमी कानावर पडली तेव्हा त्याला देखील कोण आनंद झाला होता....!!
जणू काही, आनंदाचा पाऊस आज आपल्या मनाच्या गाभाऱ्यात येऊन फेर धरतो आहे...!!
भैरू देखील आपल्या 'अंतरंगात' आनंदाने 'पुरता चिंब भिजला' होता....'
लहानपणापासूनच शिक्षणात मन रमत नसलेला भैरू...
शेतीत मात्र चांगलाच रमला होता....
शेतात हिरवाई फुलून आली की भैरूच्या राकट काळ्या चेहऱ्यावर देखील तजेलदार पणाची 'साय...' उमटू लागायची....
मातीत राबून राबून राकट अन कणखर देहावरच्या, त्याच्या मुखावर, जमा झालेली, ही साय पाहिली, की पंढरीचा पांडुरंग भव्य-दिव्य तेजाने आपली काया नितळ तेजाने भैरूच्या रापलेल्या काळ्या देहावरच जणू फुलवीत आहे असेच भैरुला पाहिले की वाटायचे....
सरकन भैरूच्या गत जीवनाची अनेक वर्ष काळाच्या पडद्यावरून सर सर सरकून गेली होती...
जसं त्याचं शेत-शिवारावर प्रेम होतं.... तसंच त्याच्या जित्राबांवर देखील....
त्याच्या अनेक जित्राबां मधला 'खंडू ...' नावाचं एक तरणाबांड खोंड....
ज्यावर भैरूचा प्रचंड जीव गुंतलेला....
कारणही तसंच होतं
'खंडू...' होताच, तितका देखना आणि उमदा देखील...
भैरूच्या प्रेमळ हातानं खाऊ घातलेलं अन्न त्याच्या देहाच्या तजेलदार क्रांतीतून नवतेजाने जणू अवतीर्ण होत होते...
आपल्या मोठमोठाल्या काळ्याभोर आणि पाणीदार डोळ्यातून तो भैरू कडे पाहायचा....
तेव्हा खंडू सोबत जुळलेली आपली नाळ आपल्या अनेक पूर्वजन्माची काहीतरी 'पुण्याई...' असल्याचा भास...
भैरुला उगीचच व्हायचा.....
आपल्या मालकाशी इमान राखणारा खंडू....
दर वर्षीच्या बैलगाडा शर्यतीत गेल्या चार वर्षापासून सलग पहिला क्रमांक पटकावित आला होता...
आणि
अचानकच 'प्राणीमित्र...' मित्रांनी दाखल केलेल्या 'बैलगाडा शर्यत बंदीच्या याचिकेने' बैलगाड्यांची शर्यत...
'अचानक बंद पाडली होती....'
आणि
'गेल्या सात वर्षात खंडूला आपली चुणूक दाखवण्याची संधी काही प्राप्त झाली नाही....'
'मालकाची असणारी इमानी त्याला दाखवता आली नाही...'
भैरू च्या कानावर ही बातमी आल्याबरोबर त्यानं देवघरातला गुलाल आपल्या दोन्ही हातात घेतला आणि गोठ्यात येऊन खंडू च्या समोर उधळत तो मोठ्याने ओरडू लागला...
"ए..खंडू लेका... तुला लय मोठी आनंदाची बातमी हाय...
अरे शर्यत पुन्हा सुरू झाली....
तू थकलास वाट पाहून...
पण
आता नाही तुला धावायला मिळणार...
पण,
लेका, तू जन्माला घातलेलं, तुझं 'बाजींद पोर...'
'सोन्या...'
आता पंचक्रोशीत धुमाकूळ गाजवणार अगदी तुझ्यासारखा....."
गुलालाची ती हवेतली 'गुलाबी पखरण' खंडूच्या नाकातोंडात शिरली...
तो गुलालाचा वास खंडूला पूर्वीच्या दिवसाची जणू आठवण करून गेला... त्या गुलाबी सुगंधाने त्याच्या नाकपुड्या फुर-फुरल्या....
त्याच्या डोळ्यात पाण्याचा जलतरंग दाटून आला....
भैरुला त्याच्या अंतरंगात चाललेली घालमेल समजली....
आपल्या दोन्ही हातांनी त्याने खंडूच्या गळ्याला आवेगाने मिठी मारली... आणि
त्याच्या गळ्यातल्या घंटे खालच्या भागावर असलेल्या पोळीवर प्रेमानं आपल्या हातानं मायेचा कुस्कारा सुरू केला...
खंडू गळ्यातल्या गळ्यात फुत्काराचा आवाज काढू लागला.....
खंडूच्या डोळ्याच्या जलतरंगाचे पाणी भैरूच्या अंगावर 'अभिषेक' घालत होतं....
भैरुला कृतकृत्य वाटलं...
त्यालाही आता आपला कंठ दाटून आला असेच वाटू लागले....
तरीदेखील ....
भैरुने दाटल्या कंठाने, पण तितक्याच मोठ्या आवाजात नारबाला... हाक दिली...
"ये नारब्बा.... जरा बाहेर ये बघू..."
नारबा हा भैरूचा धाकटा पोरगा
'खंडू इतकाच भैरूचा 'नारबावर' पण 'जीव' होता....'
त्यातच वेळ न दवडता नारबा बापाच्या पुढ्यात हजर झाला
आणि भैरूने नारबाला फर्मान सोडलं....
"नारबा... उद्यापासून 'सोन्याच्या...' कसरतीची जिम्मेदारी तुझ्यावर हाय.. खंडू सारखाच पराक्रम 'सोन्या...' पण करणार...
कारण
सोन्या खंडूचच बीज हाय...
अन
आता फक्त दोनच दिस उरल्यात शर्यतीला ...
सोन्या खंडू होऊन उधळला पाहिजे बघ...
आपल्या खंडूच 'रूप' पुन्हा 'सोन्यात' बघायचं हाय...."
'फुकाची प्राणिमात्राची भूतदया जागवणाऱ्यांची आज हार झाली होती . अन
आपल्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम आपल्या जित्राबांनवर करणाऱ्या, शेतकऱ्याची जीत हायकोर्टाच्या निकालाने आज आणली होती...'
उद्यापासून कामाला लागणारा नारबा आज लगेचच सोन्याची गोठ्यातली दोरी सोडून कसरतीच्या सरावासाठी सोन्याला घेऊन निघाला होता....
भैरुला आठवत होतं ....
सोन्याचा जन्म आपण किती हट्टाने घातला.....
अगदी खंडूचे दुसर रूपं आपल्याला निर्माण करायचं होतं...
म्हणूनच मुद्दामहून तितक्याच देखण्या आणि कणखर 'कपिला' गायीच्या पोटी, आपण 'खंडूचा' आणि 'कपिलेचा' संयोग घडवून आणला होता....
आपण घेतलेल्या कष्टाला यश आलं...
आणि
त्यातूनच निर्माण झाला तो हा सोन्या....
अगदी 'खंडूच' दुसर 'रूपं' सोन्यात उतरलं होतं....
तोच सतत सळसळणारा तारुण्य जोश...
तोच खळाळणारा उत्साह...
तिच बलदंड ताकद...
तिच जिगर....
अगदी खंडू सारखी...
सोन्यात उतरली होती....
भैरू आपल्या पहात असलेल्या शर्यतीच्या स्वप्नातून जागा झाला
आणि समोर पाहू लागला तर....
'नारबा सोबत 'सोन्या...' समोरच्या पटांगणात 'चौखूर धूळ उधळत...' सुसाट सुटला होता....
त्याच्यामागून नारबा पळत होता.... '
'त्याच्यापासून दूर जाणाऱ्या सोन्या आणि नारबाच्या पाठीमागून उधळलेल्या धुळीत त्याला शर्यतीचा 'गुलाबी गुलाल' उधळत असल्याचा भास होत होता...
आणि
त्या गुलाबी रंगात 'सोन्या' आणि 'नारबा' एकरूप होऊन दूर दूर जात होते....'
'पूर्वीच 'सोन्याचं दिवस...' सोन्या आता जणूकाही 'जागवणारं अन गाजवणार' होता...
*सहजच भैरूच लक्ष शेजारच्या निंबाकडं गेलं.... *
*निंबाच्या झाडावर मधमाशांनी केलेल्या मोहळाच्या पोळ्यातून आज मध गळू लागला होता...*
*प्रेमाच्या आनंदाच मोहोळ चहूबाजूला घोंगावू लागलं.....*
*जणू काही*
*'शर्यती आधीच सोन्याने शर्यत जिंकली होती....'*
(सदरहू माझ्या सर्वच लघुकथा वास्तवाचे दर्शन व भावनात्मकता यांचे चित्रण करतात त्या काल्पनिक असून कोणाचीही भावनिकता दुखावणे हा हेतू या पाठीमागे नाही जर अशा पद्धतीचा संबंध कोणाच्या जीवनात आला असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*- प्रा. उदय सुपेकर*
*वडगाव बुद्रुक पुणे*
*संपर्क- 8087161699*
*16 डिसेंबर 2021*
*महत्वाचे- सेन्सॉर:- पूर्व परवानगी शिवाय प्रक्षेपणास प्रतिबंध*
22/10/2021
अल्पावधीतच आपल्या भेटी साठी अपूर्वाई प्रकाशन पुणे घेऊन येत आहे...
काळोखातील काजवे या प्रा. उदय सुपेकर यांच्या 'लघु कथासंग्रहातील' 'चुटकी' ही कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://docs.google.com/document/d/1QdmIn1E9xqA0atayIv3ZhbCP2Fl_gzHDaXhu3lVeVu0/edit?usp=drivesdk
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411041
Opening Hours
| Monday | 10am - 5pm |
| Tuesday | 10am - 5pm |
| Wednesday | 10am - 5pm |
| Thursday | 10am - 5pm |
| Friday | 10am - 5pm |
| Saturday | 10am - 5pm |