RJSPM's ACS College

RJSPM's ACS College

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RJSPM's ACS College, Education Website, Landewadi, Bhosari, Pune.

08/05/2026

शनिवार दिनांक २मे २०२६ रोजी इ१२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल आँनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २५-२६चा निकाल शाखा निहाय पुढीलप्रमाणे
१२ वी कला शाखेचा निकाल ९०.५६%
१२ वी वाणिज्य ( मराठी माध्यम) शाखेचा निकाल ८०.६९%, इ.१२ वी वाणिज्य (इंग्रजी माध्यम). ९३.०५%, इ १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.९०% इतका लागला आहे परीक्षेत यश संपादन करणारे शाखानिहाय विद्यार्थी खालीलप्रमाणे
इ१२ वी कला शाखा प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी
१) कु. काटे आर्या ७२.१७%
२) कु जागृत रविराज ७१.३३%
३)कु पंडित पल्लवी. ७१.३३%
४) कु. विधाते ऋतुजा ७०.६७%
इ१२ वी वाणिज्य ( मराठी माध्यम) प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी
१)) कु वाकुडे जना ७९.१७ %
२))कु मुजमुले दीक्षा ७०.८३ %
३) कु पवार योगेश ६९.१७%
इ१२ वी वाणिज्य (इंग्रजी माध्यम)
१) कु. मुलाणी नूरजहाँ ९२.५०%
२)कु. दरवटेकर शर्वरी ८९..५०%
३) शर्मा सक्षम. ८६.८३%
इ १२ वी विज्ञान शाखा प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी
१) कु.वाडेकर ओम ८७.६७%
२ ) जगताप ईश्वरी८४.८३.%
३) कु अमृतकर प्रांजल ८१.३३%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ,संस्थेचे अध्यक्ष भोसरी चे प्रथम आमदार मा श्री विलास लांडे यांनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सचिव मा श्री सुधीर मुंगसे , खजिनदार मा श्री अजितभाऊ गव्हाणे विश्वस्त मा श्री विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के जी कानडे,उपप्राचार्य प्रा किरण चौधरी, उपप्राचार्या डॉ नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण , सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Photos from RJSPM's ACS College's post 01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा .....
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे 39 येथे आज शुक्रवार दिनांक 1 .5 .2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला .
त्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .जी . कानडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले .
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली .हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो . हा दिवस 106 हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा आणि मराठी अस्मितेचा सोहळा आहे .
जगभरात 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो .कामगारांच्या हक्कांना योग्य तो न्याय मिळावा हा त्यामधील खरा उद्देश आहे .
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .जी. कानडे प्राध्यापक वृंद व कार्यालयीन सहकारी उपस्थित होते .
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

Photos from RJSPM's ACS College's post 11/04/2026

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे ३९ येथे आज शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विलास लांडेसाहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जि. कानडे, उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, महात्मा फुले संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. रासकर, श्री. प्रकाश सोमवंशी, श्री. सुनील भोपळे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नेहा बोरसे यांनी केले. त्यानंतर S.Y.B.Sc Computer Science ची विद्यार्थिनी कु. प्रणिता कोळेकर हिने तिचे मनोगत व्यक्त केले. डॉ सुग्रीव आडाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी संस्थेबद्दल माहिती देत त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे संथपक अध्यक्ष मा. श्री. विलास लांडे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा प्रकारचे कार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. दिपाली वाघुळदे यांनी केले.

Photos from RJSPM's ACS College's post 07/04/2026

Rajmata Jijau Shikshan Prasarak Mandal,
Arts, Commerce and Science College,
Landewadi Bhosari
Department of BBA
The Parent-Teacher Meeting (PTM) of the BBA Department was successfully conducted on 7th April 2026 in the college premises. The meeting aimed to strengthen communication between parents and faculty members and to discuss the academic progress, attendance, and overall development of students.
The program was graced by the presence of Hon. Vikrant Lande Sir, Trustee of RJSPM College, as the Chief Guest. The event was also attended by Principal Dr. K. G. Kanade Sir, IQAC Coordinator Sachin Chavan Sir, and Physical Director Ganesh Chavan Sir.
The program commenced with a warm welcome to all parents by the Asst. Prof Sujata Phadtare. The HOD Asst. Prof. Sarika V. Jagtap provided an overview of the department, its vision, academic activities, and achievements. Asst. Prof Swamini Raut present the details of placement. Faculty member Asst. Prof. Kranti Gavhane interacted individually with parents and shared detailed insights regarding students’ academic performance, behaviour, and participation in co-curricular activities.
Parents actively participated in the discussion and expressed their views, concerns, and suggestions for the improvement of students’ performance and the overall teaching-learning process. The faculty addressed their queries and assured continuous support for students’ academic growth.
The program concluded on a positive note with a vote of thanks by Asst Prof Sakshi Bhandwalkar, expressing gratitude to all parents, faculty members, and organizers for their presence and cooperation.

Photos from RJSPM's ACS College's post 02/04/2026

*खांदेरी किल्ला सहल*
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे 39 येथे मंगळवार दिनांक 31.3 .2026 रोजी संस्थेचे विश्वस्त व मा. नगरसेवक मा. श्री. विक्रांतदादा लांडे यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी .कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार सौ . अश्विनी भोसले यांच्या संयोजनातून जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या गड किल्ल्यांच्या सहलीच्या आयोजनामध्ये आज किल्ले खांदेरी (अलिबाग) या ठिकाणी एक दिवसीय ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते .या किल्ल्याच्या सहलीमध्ये 19 विद्यार्थी व 10 प्राध्यापक एकूण 29 जण सहभागी झाले होते .
खांदेरी हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण जलदुर्ग आहे . सन 1679 च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भंडाऱ्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास सांगितला .
किल्ल्यावर काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू आहेत . त्यांचा आढावा खालीलप्रमाणे
1 . *वेताळाचे मंदिर* : धक्काच्या बाजूलाच उजवीकडे वेताळाचे लाकडी मंदिर आहे . आत एक मोठी पांढऱ्या रंगाने रंगविलेली शिळा आहे .ही शिळा म्हणजेच वेताळ होय . ही शिळा दरवर्षी आकाराने मोठी होत जाते, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे . होळीच्या दिवशी येथे जत्रा भरते .
2 . *भांड्याच्या आवाज येणारा खडक* :डावीकडे असणाऱ्या या धक्क्यावरून उतरून आपण दीपगृहाकडे निघालो की, आपल्याला बाजूलाच झाडांमध्ये एक मध्यम आकाराचा खडक दिसतो . छोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता, अक्षरशः भांड्यावर ठोकल्यासारखा आवाज येतो .
3 . *गाड्यावरील असणाऱ्या* *तोफा* : धक्क्यावरून दीपगृहाकडे जाताना दीपगृहाला लागूनच असणारे एक तळे आहे . ते मागे टाकून दीपगृहाच्या बाजूने पुढे जाताना बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या केलेले आहेत .वर पोहोचल्यावर आपल्याला दिसते की,गाड्यांवर ठेवलेली तोफ . ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थितीत आहे . अशाच दोन तोफा लहान टेकडीच्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर आहेत .
4 . *दीपगृह* : 1867 मध्ये बांधण्यात आलेली दीपगृह 25 मीटर उंचीच्या असून षट्कोनी आकाराचे आहे . दीपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दीपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची लागते . दीपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो .
5 . *मजबूत तटबंदी* :
दीपगृहाच्या बाजूला तटबंदीवर जिथे हेलीपॅड आहे, तिथेच खाली एक दरवाजा आहे. हा दरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो . येथून बाहेर पडल्यावर कडेकडेने चालताना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांची कल्पना येते . याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे जुने मंदिर असून गणपती मारुतीचे अलीकडे बांधलेले मंदिर पण आहे .किल्ल्यावर पाण्याचे टाके सुद्धा आहे .वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीमध्ये एक द्वार आहे तेथेच एक छोटी खोली आहे .अशा प्रकारे जलदुर्ग खांदेरी अजूनही दिमाखात उभा आहे .
इतिहास विभागाअंतर्गत डॉ . श्रेया दाणी व प्रा .सविता वीर यांनी या सहलीच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली .

Photos from RJSPM's ACS College's post 12/03/2026

यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे ३९ येथे आज गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जि. कानडे, डॉ. नेहा बोरसे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते .
यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे ५ वे उपपंतप्रधान होते. सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे जन्मलेले चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, थोर साहित्यिक आणि उत्तम प्रशासक होते. त्यांनी संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र यांसारखी महत्त्वाची केंद्रीय मंत्रिपदे भूषविली. महाराष्ट्र राज्याची स्थापना, पंचायत राज व्यवस्था लागू करणे, सहकारी चळवळीला बळकट करणे आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र लिहिले आहे.
त्यांच्या निधनानंतर, महाराष्ट्रात अनेक संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे, जसे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.

त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Photos from RJSPM's ACS College's post 18/02/2026

“Beyond the Classroom: Community Engagement, Internship & Research in Commerce” 17th February 2026.

The Department of Commerce successfully organized a workshop titled “Beyond the Classroom: Community Engagement, Internship & Research in Commerce” on 17th February 2026 for the students of Commerce. The objective of the workshop was to provide students with practical exposure and insights beyond academic learning, focusing on community engagement, research, and internship opportunities.
The inaugural session commenced at 9:30 a.m. in the gracious presence of distinguished dignitaries: Dr. K. G. Kanade,Principal of the college, Dr. Mahalinga Dongre, Principal, Sangavi Kesari Arts and Commerce College, Chinchwad, Pune, Dr. Vijay Nikam, Annasaheb Awate Arts and Commerce College, Manchar, BOS Member in Business Administration, SPPU and Prof. Sonali Walse, Director of ICMR, Dudulgaon. Dr. K. G. Kanade, Prof. Sonali Walse, and Dr. Mahalinga Dongre addressed the gathering and provided valuable guidance to the students. Their presence added great value and inspiration to the event.

Session I: Community Engagement
The first session was delivered by Prof. Dr. Vijay Nikam and he spoke on the topic “Community Engagement.” He elaborated on the significance of community involvement in holistic education and guided students on planning and executing community engagement projects effectively. The session was both informative and motivational. Dr. Deepak Pawade was the Chair Person for the session. In the end of the session he guided the students. Vote of thanks was delivered by Prof. Shravani Kadane.

Session II: Research in Commerce
In the second session, Dr. Sugriv Adal, Assistant Professor of the college, addressed the students on “Research in Commerce.” He emphasized the growing importance of research in the commerce stream and explained the fundamentals of research methodology, encouraging students to develop analytical and investigative skills. The session was chaired by Dr. Pragati Gore, and the vote of thanks was proposed by Prof. Minakshi Mandhare.

Session III: Internship Opportunities
The third session was conducted by Dr. Pragati Gore, Assistant Professor of the college, on the topic “Internship.” She provided practical guidance regarding internship opportunities, industry expectations, and skill development necessary for professional growth. The session was chaired by Prof. Jayshree Armani, and the vote of thanks was delivered by Prof. Priyanka Shinde.

Session IV: Valedictory Function and Certificate Distribution
The workshop concluded with the valedictory function and certificate distribution ceremony. The session was chaired by Dr. K. G. Kanade, Principal, The keynote address was delivered by Prof. Sachin Chavan, IQAC Coordinator of the college, who motivated students to integrate academic knowledge with real-world experiences.
The workshop was conducted successfully with the kind support and cooperation of Hon. President Dr. Vilas Lande, Principal Dr. K. G. Kanade, and Registrar Ashwini Bhosale-Chavan.
The programme was effectively anchored by Prof. Sunil Dandekar, and the final vote of thanks was delivered by Prof. Dhiraj Kadu.
The workshop witnessed enthusiastic participation from students and staff of the Department of Commerce. It proved to be an enriching and highly interactive event, equipping students with valuable insights beyond the classroom and preparing them for future academic and professional endeavours.

Photos from RJSPM's ACS College's post 07/02/2026

Rajmata jijau shikshan prasarak mandal's Arts, Commerce and Science College's, Department of BBA has organized Industrial visit of SYBBA(Finance) & TYBBA class on 6 February 2026 at RBI Monetary Museum Mumbai the objective of the Industrial visit is to understand the evolution of money and banking in India. The industrial visit to the RBI Monetary Museum was informative and enriching. It provided valuable insights into India’s monetary heritage and the functioning of the financial system. The visit successfully fulfilled its educational purpose by bridging theoretical knowledge with practical exposure and enhancing students’ understanding of banking and economics.
Industrial visit has conducted under the guidance of Principal Dr. K.G. Kanade sir and Vice Principal Prof. Kiran Chaudhari sir, Registrar Mrs.Ashwini Bhosale- Chavan.

Photos from RJSPM's ACS College's post 07/02/2026

राजमाता महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानाचे यशस्वी आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी (भोसरी), पुणे येथे विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत निर्भय कन्या अभियान-शुक्रवार दि. 06 फेब्रुवारी 2026, रोजी दोन सत्रांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी विद्यार्थिनींनी आजच्या बदलत्या जीवनशैलीत व पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार करताना अभ्यासासोबतच आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित व पोषक आहार तसेच चांगल्या सवयी यांचा योग्य समन्वय राखावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसरीचे प्रथम आमदार व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. विलास लांडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन काळापासूनच निर्भय व स्वावलंबी बनले पाहिजे, यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून सर्व विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिल गंभीरे यांच्या प्रस्तावनाने पहिल्या सत्राची सुरुवात केली. त्यांनी विद्यार्थी विकास मंडळ हे पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य,उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आलेले आहे. आजच्या बदलत्या काळानुसार स्व-संरक्षण व आरोग्य अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आजची कार्यशाळा आयोजित केलेली आहे तरी सर्व विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
मार्शल आर्ट प्रशिक्षक व राष्ट्रीय बॉक्सिंग व तायक्वांदो खेळाडू सौ. मेघा गावडे व श्री. इक्बाल शेख यांनी स्वसंरक्षणावरील कार्यशाळा घेतली. आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणत्याही क्षणी संकट उद्भवू शकते, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे तंत्र विद्यार्थिनींना शिकवले.
दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रगती गोरे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर फिजिओथेरपिस्ट डॉ. दीक्षा बावणे (डायरेक्टर, डॉक्टर दीक्षा साई किरण स्पेशलिस्ट क्लिनिक, महाळुंगे, पुणे) यांनी आरोग्य विषयक संवाद साधला. यांनी मोबाईल टॉवर रेडिएशनमुळे होणारे डोकेदुखी, झोपेचा अभाव, थकवा व एकाग्रतेवर होणारे परिणाम याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. तसेच मोबाईलचा मर्यादित वापर, रात्री मोबाईल दूर ठेवणे व आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास या परिणामांपासून बचाव करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार अश्विनी भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ नेहा बोरसे ,महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली वाघुळदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सविता वीर यांनी केले.
या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिल गंभीरे तसेच विद्यार्थी विकास मंडळाच सर्व सदस्य व विद्यार्थी यांनी केले.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Landewadi, Bhosari
Pune
411039