07/11/2025
विलास तांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सीटीईटी/टीईटी परीक्षेची तयारी विषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
डुंबरवाडी (ता. ओतूर) — श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विलास तांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी (संलग्नित सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) येथे माजी विद्यार्थी संघटना व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “सीटीईटी/टीईटी परीक्षेची तयारी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रमुख संसाधन व्यक्ती (Resource Person) म्हणून मास्टर माइंड अकॅडमी, अहिल्यानगरचे मा. प्रा. मारुती शेळके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (CTET/TET) संदर्भात अभ्यासक्रमाचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेतील बदलते प्रवाह, तयारीसाठी उपयोगी तंत्रे, तसेच वेळ व्यवस्थापन याविषयी सविस्तर विवेचन केले. त्यांनी विद्यार्थिनींना “सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन हे यशाचे मुख्य घटक आहेत,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षक प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख मार्गदर्शन मिळावे आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये त्यांचे यशाचे प्रमाण वाढावे, हेच या उपक्रमाचे ध्येय आहे.”
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. विशाल तांबे, सचिव श्री. वैभव तांबे, खजिनदार श्री. मयूर ढमाले, तसेच उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमाला एम. बी. ए.चे डायरेक्टर डॉ. रमेश काकड व प्रा. सुवर्णा मटाले उपस्थित होते. या सर्वांचा उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
या कार्यशाळेत प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी तसेच माजी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी या उपक्रमामुळे सीटीईटी/टीईटी परीक्षेच्या तयारीबद्दल अधिक स्पष्टता मिळाल्याचे सांगितले.हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला.प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्रा.सारिका शेटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.उमा काळे यांनी मानले.द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन चैताली विधाटे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.कदम सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, प्रा.रामदास कदम ,प्रा. उमा काळे, प्रा .नीलम शिवणे, प्रा.सारिका शेटे ,प्रा .शैला काशिद, प्रा . माया महाले, डॉ.स्नेहल वायकोस, प्रा.प्रतिभा तांबे, ग्रंथपाल.ज्योती बेनके, निलेश बटवाल, संदीप अहिनवे यांनी परिश्रम घेतले .