Nirvikalpa

Nirvikalpa Indian Classical Vocal Classes... That is what 'NIRVIKALPA' is all about...

Classical music is that journey, which takes 'Sadhak', from duality to oneness, from misery to happiness and ofcourse, gives an experience which is beyond senses.

'संगीत साधना गुरुकुल आश्रम' प्रस्तुत अनुभूती संगीत सभेचे सर्वांना सस्नेह निमंत्रण... 🙏🙏🙏
02/03/2026

'संगीत साधना गुरुकुल आश्रम' प्रस्तुत अनुभूती संगीत सभेचे सर्वांना सस्नेह निमंत्रण...
🙏🙏🙏

संगीत साधना गुरुकुल आश्रम
प्रस्तुत
अनुभूती संगीत सभा

येत्या ९ मार्चला उस्तादजींचा (म्हणजेच आपल्या लाडक्या व आदरणीय - झाकीरभाईंचा) ७५वा वाढदिवस आहे.
त्याचे औचित्य साधून अनुभूती संगीत सभेचे आयोजन - येत्या रविवारी संध्याकाळी - करावयाचे ठरविले आहे.

ह्या एकल तबला वादनाच्या मैफिलीचे हे तिसरे वर्ष आहे.
त्यासाठी सर्वांना सस्नेह आमंत्रण !!

०८ मार्च २०२६ । रविवार । सायंकाळी ५:३० वाजता
स्थळ: एम. ई. एस. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे ३८

एकल तबलावादन:
चि. अनुराग अलूरकर.
श्री. अजिंक्य जोशी.
पं. रामदास पळसुले.

संवादिनी साथ:
चि. कल्पतरु ठाकरे.
श्री. यश खडके.

सूत्रसंचालन:
श्री. प्रद्युम्न ढवळीकर.

प्रवेश विनामूल्य. काही जागा राखीव.

आपले,
'Tabla and Beyond' व Nirvikalpa परिवार

गणेशोत्सव २०२५
23/01/2026

गणेशोत्सव २०२५

गुरुपौर्णिमा - २७ जुलै २०२५दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये भांडारकर ...
28/11/2025

गुरुपौर्णिमा - २७ जुलै २०२५

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये भांडारकर संस्थेच्या सभागृहात पार पडला.

यंदाचे गुरुपौर्णिमेचे दहावे वर्ष होते. उस्तादजींना देवाज्ञा झाल्यानंतरचे हे गुरुपौर्णिमेचे पहिलेच वर्ष. आम्ही सर्वांनी आमच्या गायनातून त्यांना व आमच्या सर्व गुरुजनांना स्वरपुष्पांजली वाहिली.

सकाळच्या सत्रात सानिकाने सूत्रसंचालन करताना जयपूर अत्रौली घराण्याच्या इतिहासाबद्दल संवाद साधला.

आदरणीय अश्विनी ताईंना 'पद्मश्री' हा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात प्रद्युम्नने त्यांचा सांगीतिक प्रवास दृकश्राव्य स्वरूपात उलगडला.

गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांची ध्वनीफीत ऐकून दोन्ही सत्रांची सांगता झाली.

फोटो सौजन्य : अथर्व वाटवे, मयुरेश पुरंदरे, अदिती आपटे

आज बरोब्बर एक महिन्यापूर्वी याच दिवशी आदरणीय विदुषी अश्विनीताई भिडे-देशपांडे ‘निर्विकल्प’ व ‘Tabla and Beyond’ च्या विद्...
18/11/2024

आज बरोब्बर एक महिन्यापूर्वी याच दिवशी आदरणीय विदुषी अश्विनीताई भिडे-देशपांडे ‘निर्विकल्प’ व ‘Tabla and Beyond’ च्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी घरी आल्या होत्या.

तेव्हा त्यांनी काही ठराविक विद्यार्थ्यांचे गायन / वादन ऐकले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ताईंच्याच काही बंदिशी व माणिकताईंचे काही अभंग गायचा प्रयत्न केला.

आपले विद्यार्थी आपल्या गुरूंसमोर पहिल्यांदाच गाणार याची मनात धाकधूक होती. पण सर्वकाही व्यवस्थित पार पडले...

खरंतर ह्यामध्ये सिहांचा वाटा आहे तो अनुपचा. मुलांची लय-तालाची तयारी, बंदिशींची पकड तसेच तबल्याबरोबर अभंगाचा रियाझ गेले काही महिने अनुपने आवर्जून करून घेतला.

विद्यार्थ्यांचं गायन, वादन झाल्यानंतर ताईंनी आणलेला खाऊ (म्हणजे खरंतर प्रसादच) सर्वांना दिला व या आनंदोत्सवाची सांगता झाली.

आम्हा सर्वांना ताईंचा आशीर्वाद मिळणं ही आमच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व अविस्मरणीय अशी घटना आहे. ताईंचं 'निर्विकल्प'ला येणं ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट होती व त्यामुळे हा दिवस माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे.

त्यादिवशी पूर्वतयारीसाठी मुक्ता आणि अनुज यांनी मदत केली, तसेच मयुरेशने फोटो काढले - त्यांना मनापासून धन्यवाद...

ह्या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन केल्याबद्दल अनुपचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!!

आदरणीय अश्विनीताईंना विनम्र प्रणाम🙏🙏🙏

10/10/2024
गुरुपौर्णिमा - ४ ऑगस्ट २०२४दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम भारती निवास सोसायटीच्या हॉल मध्ये दोन सत्रांमध...
21/09/2024

गुरुपौर्णिमा - ४ ऑगस्ट २०२४

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम भारती निवास सोसायटीच्या हॉल मध्ये दोन सत्रांमध्ये पार पडला.

यंदाचे गुरुपौर्णिमेचे नववे वर्ष होते. माझ्या गुरु स्वर्गीय माणिकताई भिडे यांना देवाज्ञा झाल्यानंतरचे हे पहिलेच वर्ष. आम्ही सर्वांनी आमच्या गायनातून त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.

स्वर्गीय माणिकताईंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन ...🙏🙏🙏

संगीत साधना गुरुकुल आश्रमप्रस्तुतअनुभूती संगीत सभा(एकल तबलावादन मैफिल)२३ मार्च २०२४ । शनिवार । सायंकाळी ६ वाजताअनुराग अल...
16/03/2024

संगीत साधना गुरुकुल आश्रम
प्रस्तुत
अनुभूती संगीत सभा
(एकल तबलावादन मैफिल)

२३ मार्च २०२४ । शनिवार । सायंकाळी ६ वाजता
अनुराग अलूरकर । ओजस अढीया

२४ मार्च २०२४ । रविवार । सकाळी १० वाजता
अनुव्रत चॅटर्जी । यशवंत वैष्णव
संवादिनी साथ: कल्पतरु ठाकरे । मिलिंद कुलकर्णी

सूत्रसंचालन: मंगेश वाघमारे

स्थळ: शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह (कर्नाटक हायस्कूल, गणेशनगर, पुणे)
प्रवेश विनामूल्य. काही जागा राखीव.

सस्नेह निमंत्रण!!

आपले,
'Tabla and Beyond' व Nirvikalpa परिवार

अनुभूती परिसंवाद  - फेब्रुवारी २०२४अनुभूती परिसंवाद हा कार्यक्रम आता दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात - भट कुटुंबीयांकडे कराय...
04/03/2024

अनुभूती परिसंवाद - फेब्रुवारी २०२४

अनुभूती परिसंवाद हा कार्यक्रम आता दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात - भट कुटुंबीयांकडे करायचे ठरवले आहे. ह्यावर्षी अनुभूती परिसंवादाचा १९ वा कार्यक्रम नुकताच (म्हणजे २५ फेब्रुवारीला) पार पडला.

या कार्यक्रमाच्या पुर्वार्धात मोजक्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होते व उत्तरार्धात अतिथी कलाकार आपल्या वाद्याविषयी सप्रात्यक्षिक माहिती देतात.

ह्यावर्षी आमचे मित्र श्री. अमित वेणु ह्यांनी बासरी ह्या वाद्याविषयी तसेच त्यांच्या सांगितिक प्रवासाविषयी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांना तबल्याची साथ चि. अनुराग अलूरकरने केली.

सर्व कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने व उत्तमरित्या पार पडला त्याबद्दल अमोल व स्वप्नजाचे मनःपूर्वक आभार!

धन्यवाद..

फोटो सौजन्यः मयुरेश पुरंदरे, अदिती आपटे.

03 April – 10 AprilGanasaraswati Kishori tai’s Punyatithi Diwas and Jayanti Diwas are a week apart. Every year we celebr...
04/05/2023

03 April – 10 April

Ganasaraswati Kishori tai’s Punyatithi Diwas and Jayanti Diwas are a week apart. Every year we celebrate this week by listening, singing, and watching documentaries to celebrate her life.
‘Ganasaraswati Smruti Saptah’ is a weeklong celebration to learn and understand the nuances of Jaipur (Atrauli) Gharana.

This year, we began by learning more about Raag – Bahar, Bhoop, Pratiksha and Khambavati – at Nirvikalpa. The celebration continued weekend at Jaipur Gunijankhana. Thanks to Radhika Joshi Ray for featuring two rare documentaries – one on Kishori tai and another one on Mogubai (Maai).

The concluding day session is conducted by Anup Joshi at Nirvikalpa…

जाणे अज मी अजर । अक्षय मी अक्षर ।
अपूर्व मी अपार । आनंद मी ।।
🙏🙏🙏

२५ मार्च २०२३, शनिवार 'मंदिर कसे पहावे' या डॉ. गो. बं. देगलूरकर लिखित मूळ पुस्तकाचा शेफाली ताई वैद्य यांनी इंग्रजी मधे अ...
25/04/2023

२५ मार्च २०२३, शनिवार

'मंदिर कसे पहावे' या डॉ. गो. बं. देगलूरकर लिखित मूळ पुस्तकाचा शेफाली ताई वैद्य यांनी इंग्रजी मधे अनुवाद केला आहे. तसेच 'बिम्बब्रह्म आणि वास्तूब्रह्म' व 'सुरसुंदरी' या पुस्तकांचा विनिता ताई देशपांडे यांनी हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. या अनुवादित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या प्रसंगी आशिर्वाद देण्यासाठी डॅा. शां. ब. मुजूमदार देखील उपस्थित होते.
या सर्व गुणीजनांसमोर गाण्याचा योग आला त्याबद्दल मी आदरणीय देगलूरकर काकांची अत्यंत ऋणी आहे. 🙏

Address

102/Triveni, 41 Mayur Colony, Kothrud, Karve Road
Pune
411038

Opening Hours

Monday 6pm - 8pm
Tuesday 6pm - 8pm
Wednesday 6pm - 8pm
Saturday 10am - 12pm
Sunday 10am - 12pm

Telephone

+918805985665

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirvikalpa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nirvikalpa:

Shortcuts

Share