31/12/2025
✨ वर्गाबाहेरची शाळा: शिक्षण दूत सहल ✨
"वेल्हे आणि पानशेत हीच आमची रोजची ठिकाणं.. मुलांचे तास घेण्यासाठी शाळेत जातो.. मी शिकते आणि तास घेते.. ही शेती करते आणि तास घेते.. आणि त्या दोघी घर, शेती सांभाळून तास घेतात." असा हा आमचा शिक्षणदूत ताईंचा गट...
वेगळ्या जागी पहायला, फिरायला आणि अभ्यास करायला म्हणून
आम्ही कोल्हापूरला गेलो... म्हणजे मोठ्या ताई दादांनी आम्हाला नेलं..
वेगळ्या ढंगाच्या भागातील ही दोन दिवसांची शैक्षणिक सहल कायम लक्षात राहील... 🚌🚩
🏰 दिवस १: ऐतिहासिक पन्हाळगडापासून सुरुवात..तटबंदी, दरवाजे, धान्य कोठारे आणि त्या काळातील पाणी व्यवस्थापन पाहताना 'निरीक्षणाची एक नवीन दृष्टी' मिळाली. पुस्तकात वाचलेला शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर जिवंत झाला. त्यानंतर ज्योतिबा आणि महालक्ष्मीच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा मिळाली. दिवसभराच्या प्रवासात गटभावना आणि परस्पर सहकार्याचा एक सुंदर धागा विणला गेला. 🤝
🏫 दिवस २: सहलीच्या दुसऱ्या दिवशी शिक्षणातील सृजनशीलता आणि कोल्हापूरचा वारसा अनुभवता आला. दिवसाची सुरूवात रंकाळ्याच्या काठावर उपासनेने झाली. न्यू शाहू पॅलेसमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा वारसा, शस्त्रे आणि चित्रे पाहून आम्ही थक्क झालो. पण या सहलीचा खरा 'टर्निंग पॉईंट' ठरला 'सृजन आनंद' शाळेला दिलेली भेट. सुचिता पडळकर ताईंशी झालेला संवाद आणि शाळेतील नावीन्यपूर्ण प्रयोग पाहून शिक्षणाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ झाला. कोल्हापुरातील सन्माननीय सदस्य श्री. ऋषीकेश जाधव यांनी सांगितलेल्या स्वामी विवेकानंदांच्या कथांनी एकाग्रता आणि प्रगल्भ विचार या मूल्यांचे महत्त्व समजले. 🧠✨
या दोन दिवसांत आम्ही फक्त फिरलो नाही, तर "अनुभवातून शिक्षण" (Experiential Learning) म्हणजे काय असते, हे प्रत्यक्ष जगलो. वेळापत्रकाच्या पलीकडे जाऊन संवाद, चिंतन आणि गटबांधणीतून आम्ही स्वतःला अधिक समृद्ध केले.
अनुभव, संस्कृती आणि शिक्षणाचा हा अनोखा संगम आमच्या स्मरणात कायम राहील! 💫
#ज्ञानप्रबोधिनी #विकासमित्र #शिक्षणदूत #कोल्हापूरडायरी #अनुभवातूनशिक्षण #पन्हाळा #सृजनआनंद #इतिहास #शिक्षण