22/01/2026
“वाचाल तर वाचाल.”
This isn’t a slogan.
It is an uncomfortable truth that has shaped thinkers, creators,
and professionals for centuries.
Graphic Design is built on observation, thinking, and understanding — and reading is where it begins.
Before seeking shortcuts,
learn to read, think, and grow.
Read the full blog to understand our learning approach:
21/01/2026
Graphic Design Unlimited Program
A Versionless, Career-Focused Design Education
Graphic design is not about software versions.
It is about thinking, clarity, and real-world application.
Most learners struggle because they are taught tools, not fundamentals.
Graphic Design Unlimited is designed to remove fear first —
and build confidence step by step.
This program focuses on:
• Design thinking, not shortcuts
• Print + digital understanding
• Versionless learning that adapts with time
• Career-ready skills, not just certificates
If you want to learn graphic design in a way that actually makes sense,
this program is built for you.
Read the full blog to understand the philosophy behind it:
https://artekeducation.com/graphic-design-unlimited-program-post/
Enquiries open | Limited intakes
17/06/2025
ग्राफिक डिझाईन आता कुणीही करू शकतं!
विविध प्रकारच्या ग्राफिक डिझाईन्ससाठी Canva हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सह सर्व प्रकारचे प्रिंट डिझाईन, वेब डिझाईन, सोशल मिडिया डिझाईन, इमेज एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग अशा सर्व प्रकारची ग्राफिक डिझाईन्स कुणीही सहज बनवू शकते. शालेय विद्यार्थ्यांपासून कलेची आवड असणारे विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट्स, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.
माहितीपत्रक डाऊनलोड किक -
https://artekeducation.com/download-course-ebook/
20/05/2025
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, तुमचा मालक कि नोकर?
Man behind the Machine. असं म्हणतात. म्हणजे इथे माणूस महत्वाचा. माणसाचा अंतिम निर्णय महत्वाचा. पण AI आल्यामुळे मनात शंका आली कि आता Machine behind the Man होणार कि काय? म्हणजे कोणत्याही कामामध्ये AI सांगेल तसं. AI चा निर्णय हा अंतिम निर्णय होणार का? नंतर मनात विचार आला कि AI तुमचा मालक कि नोकर? AI च्या आक्रमणात स्वतःचे अस्तित्व आणि नोकरी / व्यवसाय टिकविण्यासाठी, AI चा वापर करताना संबंधित विषयाचे मला किती ज्ञान असायला पाहिजे. मला किती अभ्यास केला पाहिजे. नाहीतर AI तू सारे काम करतोस. तर मला कशाला सारे माहित असायला हवे? मी कशाला अभ्यास करू? असे म्हणून निर्धास्त राहायचे का?
पुढे वाचण्यासाठी ई-बुक डाउनलोड करा.
https://artekeducation.com/download-ai-malak-ki-nokar-e-book/
22/03/2025
Graphic Design in Canva with Artificial Intelligence
ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, इन-डिझाईन अशी प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स असताना नेहमी लागणाऱ्या विविध प्रकारच्या डिझाईन्ससाठी Canva हे अतिशय लोकप्रिय सॉफ्टवेअर ठरले आहे. ज्यामध्ये लोगो डिझाईन, बिझनेस कार्ड, फ्लायर, पोस्टर, इन्व्हिटेशन कार्ड, ग्रिटींग कार्ड, वेब डिझाईन, बॅनर, व्हिडीओ रिल्स, सोशल मिडिया पोस्ट, आणि अशा अनेक प्रकारची डिझाईन्स अगदी सहजपणे करता येतात. वैयक्तिक, सामाजिक विविध गरजांसाठी आणि व्यवसाय प्रमोशनसाठी लागणारी सर्व प्रकारची डिझाईन्स अगदी तयार मिळतात. अनेक डिझाईन्समधून तुमच्या आवडीचे डिझाईन घेऊन, ते एडिट करून तुम्हाला हवे तसे डिझाईन बनवता येतं. वापरायला अतिशय सोपे असलेले हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटर आणि मोबाईलवर सुद्धा वापरता येते. मोबाईल आपल्या नेहमीच जवळ असतो, त्यामुळे केंव्हाही आणि कुठेही बसून तुम्ही ग्राफिक डिझाईन बनवू शकता. आता तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे त्यावर कोणीही अगदी सहजपणे ग्राफिक डिझाईन बनवू शकतो. अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून आम्ही Graphic Design in Canva with AI हा 21 दिवसांचा शॉर्ट कोर्स बनविला आहे. त्याची पहिली बॅच 10 एप्रिल पासून सुरु करीत आहे. कलेची आवड असणारे विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.
ग्राफिक डिझाईन बनवणं इतकं सोपं पूर्वी कधीच नव्हते. ग्राफिक डिझाईनसाठी सुरुवातीला विचार करावा लागतो. तो विचार AI करतं. कल्पना सुचावी लागते. कल्पना AI सुचवतं. हेडलाईन कोणती असावी? मजकूर कसा असावा हे AI सांगतं. डिझाईनसाठी लागणारा फोटो किंवा इलस्ट्रेशन AI करून देतं. एवढंच नाही तर ले-आऊट आणि रंगसंगती हेही AI सांगतं. आपण AI ला फक्त कोणतं डिझाईन पाहिजे तेवढं सांगायचं. आणि त्याने दाखवलेल्या डिझाईन मधून आपण एक निवडायचं. आणि ते थोडं फार एडिट करून फायनल करायचं. AI व्हिडीओ बनवायला मदत करतं, व्हिडिओची स्क्रिप्ट लिहून देतं. दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये थोडा बदल पाहजे असल्यास तो बदलही करून देतं. स्क्रिप्ट वाचून हव्या त्या आवाजात व्हाईस ओव्हर करून देतं. आपण फक्त त्याने रेकॉर्ड केलेली फाईल डाऊनलोड करायची आणि व्हिडिओमध्ये वापरायची. डिझाईन बनविताना आपल्याला शंका असेल तर त्या शंकेचं AI निरसन करतं. आपल्याला हवे ते सारे AI करून देतं. पण त्याने करून दिल्यावर ते योग्य / अयोग्य ठरवायची जबाबदारी आपली असते. म्हणून तुम्हाला ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते परफेक्ट माहित असायलाच हवे. या कोर्समध्ये तुम्ही ते शिकणारच आहात. ग्राफिक डिझाईन बनवायला सर्वोतोपरी मदत करणारी ChatGPT, DeepSeek, Grok, Canva AI, Firefly, Mid Journey अशी एकापेक्षा एक AIs आहेत. पैकी किमान आवश्यक AIs वापरून 21 दिवसात हवं ते ग्राफिक डिझाईन बनविण्यास शिकविणारा हा एकमेव मराठी ऑनलाईन कोर्स आहे.
https://artekeducation.com/courses/graphic-design-in-canva-with-ai/
11/02/2025
पारंपरिक ब्रॅण्ड डिझाईनमधील… भ्रमाचा भोपळा फुटला.
एखादे ग्राफिक डिझाईन करायचे म्हटले तर त्याची एक विशिष्ट प्रोसेस असते. आणि त्या सर्व प्रोसेसमधून आर्टिस्टला जावे लागते. मोठ्या डिझाईन एजन्सीमध्ये प्रत्येक प्रोसेससाठी त्या त्या प्रोसेस संबंधित तज्ज्ञ लोक असतात, आणि शेवटी ते ग्राफिक डिझाईन बनते. उदा. मला चिकन मसाला या प्रोडक्ट्ची जाहिरात बनवायची आहे. तर सुरुवात थिंकिंग पासून होते. त्यासाठी क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर आणि व्हिज्युअलायझर एकत्रपणे थोडी चर्चा करून डिझाईन कसे असायला पाहिजे यावर विचार करायला सुरुवात करतात. उदा. एखादी मध्यवर्ती कल्पना सुचली कि त्यावर आधारित डिझाईनमध्ये कोणता फोटो वापरायला पाहिजे? हेडलाईन कशी असावी, मजकूर काय असावा. हे ठरवले जाते. त्यानुसार फोटोग्राफरला सूचना देऊन त्या कल्पनेनुसार फोटोग्राफी करायला सांगतात. आर्ट डायरेक्टर / व्हिज्युअलायझर यांना लाखो रुपये पगार असतो. कमर्शिअल फोटोग्राफीचे दर अव्वाच्या सव्वा असतात. आणि ते त्यांना मिळतातही. पाच पन्नास फोटो शूट करून त्यातील दोन चार फोटो फायनल होतात. डिझाईनची मध्यवर्ती कल्पना आणि ते फोटो दाखवून कॉपी रायटरला पाचारण करण्यात येते. तो दिवसभर सिगारेट फुकत तीन चार संबंधित हेडलाईन्स आणि त्याखालील मजकून लिहून देतो. थोडक्यात डिझाईनच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित फोटोज, हेडलाईन्स आणि कॉपी मॅटर तयार होतो. मध्येच डिझाईनमध्ये एखादे इलस्ट्रेशन असावे ठरते. मग हातात पेन्सिल, ब्रश आणि कलर घेऊन इलस्ट्रेटर आर्टिस्ट वाटच पाहत असतो. आर्ट डायरेक्टरच्या सूचनेनुसार एक दोन दिवसात तो पाच -सहा इलस्ट्रेशन्स करतो. सर्वानुमते योग्य ते इलस्ट्रेशन फायनल करून वापरायचे ठरते. एका जाहिरातीच्या ग्राफिक डिझाईनसाठी हा सारा लवाजमा पाच-सहा दिवस काम करून डिझाईनसाठी लागणारे हे सर्व रॉ मटेरियल जमा करतात. आता नंबर लागतो लेआऊट / कॉम्पोझिशन आर्टिस्टचा. बिचारा हा कमर्शिअल आर्टिस्टच असतो. ह्या साऱ्यांच्या अपेक्षा आणि दबावाखाली जाहिरातीचा लेआऊट करायला घेतो. एक दोन दिवसात तो चार-पाच लेआऊट तयार करतो. पुन्हा सारी मंडळी एकत्र जमा होऊन डिझाईनची निवड प्रक्रिया सुरु करतात. सर्वानुमते ठीक वाटलेली एक-दोन डिझाईन्सच्या फायनल प्रिंट काढून अप्रूव्हलसाठी कस्टमरला दाखवण्यासाठी नेतात. किंवा आता ई-मेल किंवा व्हाट्सअप करतात. पुन्हा पुन्हा त्यामध्ये करेक्शन्स करून एकदाचे फायनल प्रिंट किंवा वेब रेडी डिझाईन आणि आर्टवर्क तयार होते. एक ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी केवढा हा खटाटोप. मूळ डिझाईनचा चिकन मसाला प्रॉडक्ट, त्याची क्वालिटी, वैशिष्ठे आणि डिझाईनसाठी त्या प्रॉडक्ट विषयी होणाऱ्या चर्चेचा विषय मी इथे घेतला नाही. एखाद्या प्रॉडक्ट किंवा सेवेचे ब्रॅण्डिंग काल होते आणि आजही आहे. पण आज हे काम म्हणजे लहान मुलांचा खेळ झालाय. पण हा पोरखेळ खेळण्यासाठी या विषयाची पूर्ण माहिती असायला हवी, एवढी एकच अट आहे. नाहीतर या पोरखेळाचा कधी कधी खेळ खंडोबा होऊ शकतो ही गोष्ट लक्षात असुद्या.
जाहिरातीच्या टायटल / मजकुरासाठी लागणारे शब्द कौशल्य, लक्ष वेधणारी कल्पना शक्ती, चित्रकारीसाठी लागणारे हस्तकौशल्य, सौंदर्य दृष्टी या गोष्टी संपल्या नाहीत पण आता जुन्या झाल्या, या सर्व कामासाठी वेगवेगळ्या कलाकारांची आता गरज नाही. आता कोणीही हे काम खूपच चांगले आणि कमी वेळेत करू शकतो. डिझाईनसाठी फक्त आर्टिस्टच लागतो या भ्रमात आम्ही आजपर्यंत होतो. पण DeepSeek आणि इतर अनेक आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे पारंपरिक ब्रॅण्ड डिझाईनमधील भ्रमाचा भोपळा फुटून आमचा भ्रमनिरास झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष किंवा त्याला सोडून चालणार नाही हे मात्र खरे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आवडीच्या विषयातील परिपूर्ण ज्ञान घ्या आणि सोबत AI चा स्वीकार करा. ग्राफिक डिझाईनर आणि ज्यांना ग्राफिक डिझाईनमध्ये नव्याने करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मी इथून पुढे लिहीनच. पण ज्यांना वर्षात AI सह ग्राफिक डिझाईन मास्टर व्हायचे आहे त्यांच्यासाठी आमचा ‘Graphic Design with Artificial Intelligence’ हा ऑनलाईन / ऑफलाईन कोर्स आहेच. कोर्स माहितीपत्रकासाठी WhatsApp करा.
भागवत पवार, मो. 093711 02678
05/02/2025
ग्राफिक डिझाईन म्हणजे
आता पोरखेळ झालाय?
ग्राफिक डिझाईनर हा गेल्या 30 वर्षांपूर्वीपासून टेक्नॉंलॉजीची एकामागून एक आक्रमणे आणि आघात झेलत आला आहे. कधी फायद्याची कधी तोट्याची, पण जमेल तशी ती टेक्नॉलॉजी स्वीकारत आला आहे. लढत आला आहे. अजूनपर्यंत सृजनशीलतेच्या जोरावर थोड्या फार प्रमाणात तग धरून होता. परंतु दोन वर्षांपूर्वी Open AI चे Chat GPT आले. Google चे Gemini आले. Facebook चे Meta AI आले, Microsoft चे Copilot आले. त्यामुळे ग्राफिक डिझाईनमधील नवनवीन कल्पना, कॉपी रायटिंग, हेड लाईन / कॅप्शन्स सुचण्यासाठी तासन तास डोक्याला हात लावून बसण्याची गरज राहिली नाही. विषय दिला कि चुटकी सरशी मजकूर, टायटल किंवा हव्या तेवढ्या शब्दांचे आर्टिकल बनू लागले. डिझाईनसाठी लागणाऱ्या इलस्ट्रेशन्ससाठी अत्यावश्यक असणाऱ्या आर्टिस्टची जागा Firefly, Mid Journey आणि Artistly सारख्या AI नी घेतली. नुसते वर्णन करून डिझाईनसाठी इलस्ट्रेशन्स तयार होऊ लागली. क्रिएटिव्ह फोटो मिळू लागले. दहाच दिवसापूर्वी लॉन्च झालेल्या चायनीज DeepSeek AI ने तर ChatGPT, Gemini, Meta सारख्या दिग्गज अमेरिकन AI कंपन्यांची झोप उडवली आहे. ग्राफिक डिझाईनसाठी लागणारं सारं रॉ मटेरियल असे अगदी सहज मिळू लागल्याने डिझाईनरचे जवळ जवळ 90 टक्के काम सोपं झालं आहे. तरीपण AI कडून काम करून घेण्यासाठी ग्राफिक डिझाईनचे परफेक्ट बेसिक नॉलेज असणेही तेवढेच गरजेचे बनले आहे. किंबहुना ग्राफिक डिझाईन अधिक खोलवर जाऊन शिकण्याची गरज निर्माण झालीय. ज्याला ग्राफिक डिझाईन परफेक्ट माहित आहे तोच AI कडून चांगले काम करून घेऊ शकतो हे कोणी नाकारू शकणार नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रामधील करिअरसाठी त्या त्या क्षेत्रातील परफेक्ट ज्ञान घेतलेच पाहिजे. ही आजची खरी गरज आहे. AI मुळे वेब डिझाईनसाठी HTML, CSS आणि JAVAScript कोडिंग करत बसण्याची आता गरज राहिली नाही. इथेही वेब डिझाईन जरी कोडिंग शिवाय अगदी सहज बनवता येत असले तरी कोडिंगसह वेब होस्टिंग आणि सर्वर मॅनेजमेंटची बेसिक संकल्पना माहित असणे गरजेचे आहे. थोडक्यात तुम्हाला तुमच्या करिअर क्षेत्रातील परफेक्ट नॉलेज असेल तरच तुम्ही AI सह तुमच्या क्षेत्रात करिअर करू शकता. शेवटी AI हा एक हुशार आणि तत्पर नोकर आहे. पण त्याच्या कडून काम करून घेणाऱ्या मालकाला संबंधित क्षेत्रातील किमान आवश्यक ज्ञान असायलाच पाहिजे. म्हणूनच काळाबरोबर किंबहुना एक पाऊल पुढे राहण्यासाठी अधिक बारकाव्यांसह ग्राफिक डिझाईनमधील परिपूर्ण ज्ञानाचा 100 टक्के प्रॅक्टिकल कोर्स आम्ही सुरु केला आहे.
‘All in One Graphic Design with Artificial Intelligence ’
Prospectus Download Link - https://artekeducation.com/download-course-ebook/
संपर्क: भागवत पवार, मो. 9371102678
17/01/2025
1993-94 पर्यंतचा काळ आर्टिस्टसाठी सुगीचा होता. कारण ग्राफिक डिझाईन करण्यासाठी कमर्शिअल आर्टिस्टच लागायचा. स्केचिंग, इलस्ट्रेशन, फोटोग्राफी, कॅलिग्राफी, टायपोग्राफी असे विषय आणि बरेचशे कटिंग-पेस्टींग चे काम असायचे. त्यामध्ये कला आणि कौशल्य असायचे. त्यामुळे जाहिरात, प्रिंटिंग क्षेत्रात आर्टिस्टचे एक स्वतंत्र स्थान होते. त्यानंतर कॉम्प्युटर आल्यावर हे चित्र थोडे पालटले. आर्टिस्टला नकळत थोडी धास्ती वाटली खरी. पण सृजनशीलतेच्या जोरावर ग्राफिक डिझाईनवर त्याने प्रभुत्व ठेवले. 1998-99 नंतर इंटरनेट आले, ई-मेल आला. वेब डिझाईन सुरु झाले, तसे जाहिरात, मार्केटिंगमध्ये कम्युनिकेशन सोपे झाले. प्रिंट टेक्नॉलॉजीमध्ये डिजिटल प्रिंटिंग सुरु झाले, त्याचा परिणाम स्क्रीन / ऑफसेट प्रिंटर्स तसेच साईन बोर्ड आणि पायाडावर उभे राहून मोठमोठी होर्डिंग रंगविणाऱ्या पेंटरच्या व्यवसायावर झाला. अशा काळातही क्रिएटिव्ह डिझाईन बनविण्यासाठी आर्ट डायरेक्टर, व्हिज्युअलायझर, कॉपी रायटर, कमर्शिअल आर्टिस्ट यांचे महत्व होते. कंपनी किंवा प्रोडक्ट्च्या ब्रॅण्डिंगसाठी त्यांची गरज होती. त्यानंतर Facebook, Youtube, Instagram, LinkedIn, X असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले, सोशल मिडिया मार्केटिंग सुरु झाले, मेसेजिंग मध्ये WhatsApp ने बाजी मारली. WhatsApp मार्केटिंग सुरु झाले, टेक्स्ट, इमेज आणि व्यावसायिक व्हिडिओ पाठवणे अगदी सुलभ झाले. सोशल मिडियामुळे सर्वच क्षेत्रात गेली दहा - पंधरा वर्षे प्रचंड उलतापालथ झाली. Canva सारख्या ऍपमुळे डिझाईन करणे कुणालाही सोपे झाले. ऑटोमेशनमुळे व्यवसायात बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. डिझाईनरवर अवलंबून राहणे कमी झाले. ज्यासाठी पूर्वी ग्राफिक डिझाईनरच लागायचा अशी बरीच कॉमन डिझाईन्स लोक स्वतःच बनवू लागली. आर्टिस्ट कोम्यात गेल्यासारखा झाला. तरीही जिवंत होता. गेल्या 25 - 30 वर्षात नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, एक नवीन आलेली टेक्नॉलॉजी शिकेपर्यंत दुसरी टेक्नॉलॉजी यायची, त्यामुळे आमच्या बरोबरीच्या ग्राफिक डिझाईनर्सचे सारे आयुष्य शिकण्यातच गेले. शिकले ते थोडे टिकले. ग्राफिक डिझाईनचा हा खडतर इतिहास खरोखर मनोरंजक आहे. आणि हो आता तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने ग्राफिक डिझाईनमध्ये धुमाकूळच घातलाय. जे डिझाईन बनवण्यासाठी पूर्वी आम्ही दिवस दिवसभर राबायचो ते डिझाईन AI मुळे आता चुटकीसरशी बनते. डिझाईनसाठी क्रिएटिव्ह आयडिया सुचविण्याबरोबरच ग्राफिक डिझाईनरने करायच्या कामांपैकी जवळजवळ 90 टक्के काम आता AI करू लागलंय. त्यामुळे आता कमर्शिअल आर्टिस्ट / ग्राफिक डिझाईनरला ह्या AI टेक्नॉलॉजीचा स्वीकार करायलाच हवा. आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांनी ग्राफिक डिझाईनमध्ये AI चा वापर करायला शिकल्याशिवाय गत्यंतर नाही.
म्हणूनच AI सह ग्राफिक डिझाईनचा 3 महिन्याचा फुल-टाईम ऑफलाईन कोर्स 10 फेब्रुवारीपासून सुरु करीत आहे. संपर्क: 9371102678