11/11/2019
🌅हरितगृह वायू असेच उत्सर्जित होत राहिले, तर देशातील सरासरी तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल.
🌅परिणामी, उष्णतेमध्ये वाढ झाल्याने २१०० सालापर्यंत देशभरात दरवर्षी जवळजवळ १५ लाख लोकांचा मृत्यू होईल, तसेच अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.
🌅उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील ६४ टक्के मृत्यू वाढत्या तापमानामुळे होतील, अशी भीती एका संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.
🌅टाटा सेंटर फॉर डेव्हलपमेंटद्वारे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोत करण्यात आलेल्या संशोधनानंतर ही बाब समोर आली आहे.
🌅या संशोधनात जागतिक तापमानवाढीचा आयुष्य आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?
या अभ्यास करण्यात आला आहे.
🌅जागतिक तापमानवाढीमुळे काही दशकांनी ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत असलेल्या उष्ण दिवसांचा सरासरी आकडा आठ पटीने वाढेल आणि हे प्रमाण ४२.८ टक्के एवढे होईल.
🌅२१०० सालापर्यंत देशातील १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरासरी तापमान ३२ अंशांपेक्षा अधिक असेल.
🌅वाढत्या तापमानाचा फटका साहजिकच नागरिकांच्या आरोग्याला बसेल आणि याचा परिणाम म्हणून मृत्यूच्या दराचे प्रमाण वाढेल.
🌅वाढत्या तापमानामुळे देशभरात वर्षाला १५ लाखांहून अधिक लोकांचा जीव जाईल.
🌅 दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, तापमानात वाढ होतच राहिली, तर २१०० सालापर्यंत समुद्राची पातळी एक मीटरने वाढेल, असे या संशोधनातून समोर आले आहे.
🌅पावसाळ्यातला जुलै महिना सर्वाधिक उष्ण असेल.
🌅जुलै महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे हा महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. 🌅स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद या वर्षी झाली आहे.
🌅एवढा मोठा पाऊस होण्यास जागतिक तापमानवाढ, हवामान बदल कारणीभूत आहेत.
🌅मुंबईही धोकादायक यादीत
जागतिक तापमानवाढीसह वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे प्रशांत, हिंदी आणि अटलांटिक महासागरातील ३५ देश चिंतेत आहेत.
🌅 युनोच्या १९९६च्या अहवालात नमूद केले आहे की, सागरी पातळीतील वाढ सुरू झाली आहे. मुंबई, न्यूयॉर्क, शांघायसारखी शहरे धोक्यात आली आहेत.
संदर्भ : लोकमत