19/05/2026
A heartfelt thanks to Nirupama Mohanty, Nazla Mallahi, Ishrat Ahmad, Swapna Patil, Aasha Jadhav and Ravet womens club ladies for your generous donation of cooler for Masti Ki Pathshala during this scorching summer. Your thoughtful support will bring much-needed comfort and relief to the children and make their learning environment far more pleasant.
We would also like to express our sincere gratitude to Kavita Mhaske, Shash Agarwal , and the NariShakti Group for donating cupboards to the school. Your contribution will help us keep the space organized and functional for the students and teachers.
Your kindness, care, and support truly make a meaningful difference in the lives of these children. We deeply appreciate your continued encouragement and generosity.
-Team Sahgami Foundation
Masti Ki Pathshala
18/05/2026
जखमांचं देणं...
आज आपण कितीही म्हणालो की शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे तरी या मुलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणून आजही अशी अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. आई वडील कामावर गेल्यावर ही लहान मुलं घर सांभाळतात, लहान भावंडांना सांभाळतात, घरचे सर्व काम झाडू फरशी, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, भांडी घासणे सर्व काही करतात. वस्ती पासून दुर असलेल्या नळावरून पाणी सुद्धा आणतात. त्यामुळे आई वडील बिनधास्त कामावर जाऊ शकतात. मग या मुलांना शाळेत पाठवून घरचे काम कसे होईल अशी या पालकांची मानसिकता असते.
पण आमची मुलं या सगळ्यांचा समतोल राखून शिक्षण घेतात हे पाहून आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटते. शाळेत जाण्यापूर्वी आणि आल्यावरही ते घरची सगळी काम करतात, अभ्यास करतात आणि आहे त्या परिस्थितीमध्ये कायम आनंदी असतात हे विशेष कौतुकास्पद आहे. त्यामुळे सकाळी सकाळी हे दृश्य पाहून कुसुमाग्रजांच्या खालील ओळी आठवल्या...
"आकाशपण हटता हटत नाही
मातीपण मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही."
©® प्राजक्ता राहुल रुद्रवार
09/05/2026
बरेचदा काही लोक किंवा विद्यार्थी आम्हाला विचारत असतात की आम्ही मस्ती की पाठशाळेत कसा सहभाग घेऊ शकतो. अनेकांच्या मनात काहीतरी सहकार्य करण्याची इच्छा असत. परंतु कश्यारीतीने किंवा काय स्वरूपात करता येईल यासाठी माहिती मिळत नसते. त्यात आजकाल पारदर्शक काम करणाऱ्या सेवाभावी संस्था फार कमी राहिल्या आहेत. त्यामुळे आपला वेळ आणि पैसा खरंच सत्कर्मी लागेल का असे अनेकांना वाटत असते.
परंतु कुठलीही सामाजिक संस्था ही लोकसहभागाशिवाय चालली जात नसते. त्यामुळे प्रत्येकाचा सहभाग मग तो आर्थिक स्वरूपाचा असो किंवा वेळ देण्याचा असो खूप महत्वाचा ठरतो.
याचेच उत्तम उदाहरणं म्हणजे डॉ.अस्मिता गिते ताई. ताईने विचारलं होतं की मी मस्ती की पाठशाळेत कश्या प्रकारे मदत करू शकते. ताई डॉक्टर म्हणून पहिल्यांदा डोक्यात आलं ते म्हणजे की आमच्या मुलींना विज्ञान जरा कठीण जातं. ताई तु विज्ञान शिकवू शकतेस का? म्हणताच ताईने होकार दिला आणि दहावीच्या विद्यार्थिनींना शेवटचे दोन महिने रोज विज्ञानच नाही तर त्यासोबत इतरही विषय शिकवण्यास सुरुवात केली आणि त्याचा मुलींना खूपच फायदा झाला. आज मुली दहावी मध्ये उत्तम मार्क्स मिळवून पास झाल्या. आपल्या रोजच्या व्यस्त दिनक्रियेमधून वेळ काढून मुलींना शिकविण्यासाठी येणाऱ्या आमच्या डॉ. अस्मिता ताईचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
-टीम सहगामी फाउंडेशन
08/05/2026
नैना व रेश्माचे खूप खूप कौतुक ❤️
आज दहावी एसएससी बोर्डाचा निकाल लागला आणि खरंच डोळे पाणावले. आमच्या पाठशाळेतील दोन विद्यार्थिनी नैना व रेश्मा या खूप उत्तमरीत्या मार्क देऊन दहावी मध्ये यशस्वीरित्या पास झाल्या याचा गर्व वाटत आहे. शिक्षणाची गोडी लावून मुलांना शिक्षण प्रवाहात आणताना त्यांच्या अनेक अडचणी आम्ही पाहत असतो.
सांगायचं तर रेश्मा सारख्या विद्यार्थिनीला आज 63.6% मार्क मिळाले आहेत. पण तिचे पहिली ते आठवी पूर्ण शिक्षण बिहारमध्ये हिंदी माध्यमातून झाले आहे. नववीमध्ये अचानक काही कारणास्तव तिला पिंपरी चिंचवड येथे यावे लागले आणि त्यावेळेस आठवीत 87% मिळाले असले तरी कुठल्याही शाळा तिला हिंदी माध्यमातील विद्यार्थी असल्यामुळे मराठी माध्यमात घेण्यासाठी उत्सुक नव्हत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर ते आयुष्यभरासाठी होईल व नापास झाल्यास शाळेच्या निकालाचा टक्का घसरेल, असे सगळ्या शाळांना वाटत होते. परंतु त्यात हिंदी माध्यमाच्या शाळा कमी असून, असलेल्या शाळेचे अंतर घरापासून दूर असल्यामुळे नवीन मुलीला इतक्या दूर कसे पाठवायचे हा खूप मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर होता. अनेकांशी विचार विनिमय करून शेवटी तिला मराठी माध्यमातच टाकायचे ठरवले. पण त्यावेळेस ही चिंता होती की मुलगी पास तरी होईल ना?
या दोन वर्षात रेश्माने जिद्दीने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. त्यासाठी तिला खूप त्रासही झाला. परंतु यावेळेस नैना सारख्या तिच्या जिवलग मैत्रिणीने तिला मदत केली. आज या दोघींनीही इतके छान मार्क मिळवल्याचा आम्हाला खूप आनंद झाला. अशा मराठीचे अजिबात ज्ञान नसलेल्या विद्यार्थिनीला आपल्या वर्गात सामावून घेतले. यासाठी केशवनगर भाग शाळा रावेतचे प्रिन्सिपल पवार सर आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार🙏🏻🙏🏻
रेश्मा व नैनाचे खूप खूप कौतुक ❤️❤️
-टीम सहगामी फाउंडेशन
01/05/2026
याचसाठी केला अट्टाहास ❤️
आज एक मे, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करताना पहिल्यांदा आठवण येते ते म्हणजे शाळेचा वार्षिक निकाल लागायचा याची. बालपणीचा काळ आठवतो, एक मे ला रिझल्ट लागणार म्हणून आम्ही खूप उत्सुक असायचो. आजकालच्या खाजगी शाळांमध्ये निकाल लागण्याची तारीख वेगळी असल्यामुळे गेले ते दिवस असे म्हणता येईल. पण मस्ती की पाठशाळेतील आमचे विद्यार्थी सरकारी शाळेत जात असल्यामुळे पाठशाळेमध्ये एक मे या तारखेला विशेष महत्त्व असतं. पालकांचे समुपदेशन करून मुलांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना सरकारी शाळेकडे वळवताना ही मुलं किमान वर्षभर शाळेत टिकली पाहिजे असे वाटत रहाते. एकदा का ही मुलं शाळेत रूळली की आपोआप पुढे शिकतात हा अनुभव आलाय. आता मस्ती की पाठशाळेतील बरेचसे विद्यार्थी हे नियमित शाळेत जातात व शाळेतील विविध स्पर्धांमध्येही यशस्वी होत आहेत. त्यामुळे त्यांचा शाळेचा वार्षिक निकाल काय लागतो याची आम्हाला कायम उत्सुकता असते.
आणि आज सांगायला खूप आनंद होत आहे की मस्ती की पाठशाळेतील सर्वच विद्यार्थी उत्तम मार्कांनी पास होऊन पुढील वर्गात गेले आहेत. याचे श्रेय आमच्या पाठशाळेतील सर्व शिक्षकांना जातेच त्याहीपेक्षा जास्त त्यांना शाळेत कायम सांभाळून घेणारे महानगरपालिका शाळा क्रमांक 97 रावेतच्या सर्व शिक्षकांना जाते. शाळाबाह्य मुलांना सामावून घेताना शाळेतील शिक्षकांना बऱ्याच अडचणी येत असते. कारण ही शाळाबाह्य मुलं वयाप्रमाणे कुठल्याही इयत्तेत शाळेत दाखल केली जातात व अनेकदा अशा मुलांना प्राथमिक ज्ञानही नसते. अशा वेळेस या मुलांना टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील शिक्षकांना बरेच प्रयत्न करावे लागतात.
त्यामुळे मस्ती की पाठशाळेतील सर्व शिक्षकांच्या व रावेत शाळेतील सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांनी आज सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या पास झाल्यामुळे सर्व मुलांचे खूप खूप कौतुक व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
-टीम सहगामी फाउंडेशन
27/04/2026
Gratitude..❤️
Once again we want to say thanks to Dr. Krutika and Abhijeet Patil, Vijay Gupta, Swati Dharmadhikari and B Ed college, Dev Patil, Pooja Jadhav, Sanket Vaidya, Sprong hub group, Bhatia Uncle, Sheetal Dehankar, Manjusha Dhote, Sunita, Bhavana Garg, Bindu Rathod, Reeta Arora, Deepali Sonavane, DY Patil college students Akurdi, Prabha Naidu aunty, Shirish Pandhare, Shilpa Damle, Padmavati Banda madam, Dr. Smita Patade, Prashant Lokhande, Varsha Lokhande, Satya Sai Seva Samiti, Jagruti Dharmadhikari
for serving yummy food, donating grains and for gifting bags and stationery.
Your contribution is highly appreciated We anticipate your continued support 🙏🏻🙏🏻
- Masti ki Pathshala, Ravet
By Team Sahgami Foundation
26/04/2026
आचल व काजलचे खूप खूप अभिनंदन ❤️
आम्ही जसे पाठशाळेचे संस्थापक शिक्षक आहोत तसेच मुना चौहानचे मुलं हे पाठशाळेचे संस्थापक विद्यार्थी आहेत असे म्हणता येईल. पाठशाळा सुरु झाली तेव्हापासून मुनाची सहाही मुलं पाठशाळेत यायची. स्वतः शिकलेली नसली तरी आमची ही मुना मुलांनी शिकावं यासाठी खूप धडपड करत असे. सकाळी सकाळी सगळ्या मुलांना तयार करून ती पाठशाळेत घेऊन यायची. आम्ही मुलांना शिकवेपर्यंत इतर मुलांना पाठशाळेत घेऊन येणे, पाठशाळा साफ करणे, सामान आवरून ठेवणे, अशी बरीच काम करत असे. इतकेच नाही तर पत्र्याच्या पाठशाळेमध्ये खूप गरमी होत असे तेव्हा मुना तिचा बेना घेऊन आम्हाला वारं सुद्धा घालत असे. आपल्या मुलांनी आपल्यासारख कामगार न बनता चांगल्या नोकरीला लागावं यासाठी ती कायम मुलांच्या मागे अभ्यासासाठी लागत असे. विशेष म्हणजे तिची सहाही मुलं अभ्यासात खूप हुशार होती.
पण कायम हसतमुख असलेला हा चौहान परिवार लॉकडाऊन मध्ये उत्तर प्रदेशात राहायला गेला. मुनाचे म्हणणे होते की तिथे जमिनीचा थोडा तुकडा आहे त्यावर स्वतःपुरती शेती करून जगणे सोपे जाईल. काही महिन्यांनी मुनाचा नवरा मजुरीसाठी इथे पुन्हा वापस आला पण मुनाने स्वतः शेती करून मुलांना तिथेच शिकवले. त्यासाठी तिला खूप अडचणी येत गेल्या पण तिने मुलांना शिकवणे थांबविले नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण दीड महिना हे सगळे मस्ती की पाठशाळेत येतात आणि काही तरी नवीन शिकून जातात. सगळ्याच मुलांना शिकण्याची खूप जिद्द आहे. इथून मस्ती की पाठशाला मधून त्यांचा जो शिकण्याचा प्रवास सुरू झाला तो थांबला नाही याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि आज या परिवारातील आचल व काजल या दोघी उत्तम मार्कांनी यशस्वीरित्या दहावी व बारावीच्या परीक्षेत पास झाल्या ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मस्ती की पाठशाळेत शिकणाऱ्या पुढील पिढीसाठी या मुली नक्कीच आदर्श निर्माण करत आहेत. आचल व काजलला पुढील शैक्षणिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ❤️
-टीम सहगामी फाउंडेशन
09/04/2026
एक हात मदतीचा...
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा मुलं शिक्षणापासून वंचित राहतात आणि अशा वेळेस सगळ्यात जास्त वाईट वाटतं ते म्हणजे हुशारी असली तरी अशा मुलांना शिक्षण घेता येत नाही. सध्या शिक्षणाच्या अधिकाराखाली अश्या आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश दिला जातो. परंतु शाळेची फी भरावी लागली नाही तरी ज्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागते. सध्याच्या घडीला हा खर्चही सामान्य माणसाला परवडण्यासारखा राहिला नाही.त्यामुळे अश्या राईट टू एज्युकेशन मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही शालेय साहित्यासाठी मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.नंदिनी देसाई व सौरभ देसाई यांनी आज अश्याच एका आठवीच्या हुशार विद्यार्थिनीस शालेय पाठ्यपुस्तके व इतर शालेय साहित्य भेट दिली. तसेच या विद्यार्थिनीच्या पुढील शैक्षणिक प्रवासातही नक्कीच सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.🙏🏻
-टीम सहगामी फाउंडेशन
04/04/2026
उपमहापौर सौ शर्मिलाताई बाबर यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वांना ताईंतर्फे आवाहन करण्यात आले होते की पुष्पगुच्छ किंवा कुठलीही भेट न आणता शालेय साहित्य आणावे.
याप्रसंगी जमलेले सर्व शैक्षणिक साहित्य मा.आमदार श्री अमित गोरखे यांच्या उपस्थितीत ताईंनी अतिशय आनंदपूर्वक मस्ती की पाठशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुपूर्द केले. यासाठी ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
-टीम सहगामी फाउंडेशन
18/03/2026
Solar Energy Impact 🌞
Solar energy plays a vital role in strengthening the work of NGOs like Masti ki Pathshala. It significantly reduces electricity expenses at zero fund organizations like us. Which helps enabling greater allocation of resources toward education and welfare. Additionally, it ensures uninterrupted power supply for essential facilities and promotes environmental responsibility among children.
We extend our sincere gratitude to Mr. Vikram Jadhav and Tata motors Purchase, supply chain and Quality department for their generous support. The solar system upgrade and donation of hygiene kits have had a meaningful impact on our children’s lives. Your commitment to sustainability and community welfare is truly commendable. Once again thank you so much 🙏🏻
- Team Sahgami Foundation
(Masti ki pathshala)