Gunvant Sonawane

Gunvant Sonawane

Share

Be the Change that you wish to see in the World !!

28/01/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, आक्रमक आणि जनसामान्यांशी जोडलेले ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या शात्म्यास चिरशांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!*💐💐

28/01/2026

खानदेशातील चाळीसगाव नगरीची कन्या… समाजपरिवर्तनाची तेजस्वी प्रेरणा!
खान्देश रत्न मिनाक्षी निकम 🌟

खानदेशातील चाळीसगाव नगरीचा अभिमान असलेल्या, स्वयंदीप फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग भगिनींच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पेरणाऱ्या, त्यांच्या पंखात बळ भरणाऱ्या आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या सेवाव्रती भगिनी मिनाक्षी निकम ताई यांना
खान्देश मराठा संघ, पुणे यांच्या वतीने “खानदेश रत्न पुरस्कार”
प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

मिनाक्षी ताई सातत्याने सांगतात –
“दिव्यांग व्यक्तीने कोणावर अवलंबून राहू नये. समाजाने आमच्याकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून न पाहता, समानतेच्या नजरेने पाहावे. आम्हाला स्वावलंबी होण्यासाठी, स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी व हाताला काम मिळण्यासाठी संधी द्यावी.”

हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, संपूर्ण खानदेश आणि चाळीसगाव नगरीच्या सामाजिक जाणिवांचा गौरव आहे.
ताईंचे कार्य असंख्य भगिनींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.

🌺 मिनाक्षी ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🌺
तुमची सेवा अखंड अशीच समाजाला दिशा देत राहो, हीच सदिच्छा. 🙏

गुणवंत सोनवणे
















Photos from Gunvant Sonawane's post 24/01/2026

शेतीत नवचैतन्य आणणारी शेतीशाळा – पळासरे गाव 🌾

भारत अ‍ॅग्रोइकॉलॉजी रिसोर्स सेंटर यांच्या फील्ड प्रात्यक्षिके प्रकल्पाअंतर्गत,
सेवा सहयोग ग्रामोदय यांच्या सहकार्याने
पळासरे गावात शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.

या शेतीशाळेमध्ये शाश्वत शेती, नैसर्गिक शेती पद्धती, माती आरोग्य सुधारणा, खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजना तसेच प्रत्यक्ष शेतातील प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला.
ही शेतीशाळा शेतकऱ्यांना स्वावलंबी, शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीकडे नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. 🌱🚜

🤝 आपणही ग्रामीण विकास, शाश्वत शेती व शेतकरी सशक्तीकरणासाठी कार्य करण्यास इच्छुक असाल तर सेवा सहयोग ग्रामोदय सोबत जुळा, स्वयंसेवक (Volunteer) म्हणून सहभागी व्हा आणि सकारात्मक बदलाचा भाग बना.9100582626





#शेतीशाळा
#पळासरे
#शाश्वतशेती
#नैसर्गिकशेती
#शेतकरीसशक्तीकरण





23/01/2026

साहित्यिकांची ऊरभेट ही केवळ भेट नसते,
ती काळाच्या प्रवाहात अचानक उमललेली एक भावफूल असते… 🌿

आजचा दिवस तसाच काहीसा.
फर्ग्युसन रोडवरील वाडेश्वरसमोर, शहराच्या धावपळीत, शब्दांना जणू थोडा विसावा मिळालेला हा क्षण—अचानक समोर आला आणि मनाच्या कोऱ्या पानावर स्वतःची सही करून गेला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तानसेन काका जगताप,
सतत कार्यरत असलेले साहित्यसेवक गणेशदादा आढाव,म्हसदी (धुळे) महाविद्यालयाचे प्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीवजी गिरासे आणि पाचोरा येथील महाविद्यालयाचे उपप्राचार्य, मराठीचे अभ्यासू प्राध्यापक डॉ. वासुदेवजी वले— खानदेशाच्या मातीतून उगवलेली विचारांची वेल,जिच्या पानोपानी साहित्य, संस्कार आणि सामाजिक जाणिवा फुललेल्या.

पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत खानदेशातील ही व्यासंगी, अभ्यासू व्यक्तिमत्व
एकत्र भेटली आणि क्षणभर वाटले—शब्दांनी शब्दांना मिठी मारली आहे.

८२ वर्षांचा तरुण उत्साह घेऊन,
ओठांवर अखंड सरस्वतीचे स्मित,डोळ्यांत अजूनही समाजबदलाचे स्वप्न जपणारे आबासाहेब प्रत्यक्ष भेटले आणि आनंदाचा झरा अधिकच वाहू लागला.वय हे केवळ आकडं असतं,आणि कार्यकर्तृत्व हीच खरी तरुणाई—हे त्यांच्या बोलण्यातून, चालण्यातून,
अगदी शांत उपस्थितीतूनही उमगत होतं.कार्यकर्ता कसा असावा,साहित्य समाजाशी कसं जोडलेलं असावं,आणि विचारांमध्ये माणुसकी कशी जिवंत ठेवावी—हे सगळं कुठल्याही भाषणाविना
फक्त त्यांच्या सहवासातून शिकायला मिळालं.गणेश दादामुळे—हा योग जुळून आला,
या क्षणाला साक्षीदार होता आलं,याबद्दल मनापासून कृतज्ञता.अशा भेटी आयुष्याला दिशा देतात,मनाला संस्कार देतात आणि शब्दांना अर्थ… 📖✨

गुणवंत सोनवणे.

Photos from Gunvant Sonawane's post 22/01/2026

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे अंतर्गत पिंपळवाडी येथे “शेळी लसीकरण शिबिर” यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश शेळीपालन करणाऱ्या शेतकरी कुटुंबांमध्ये जनावरांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच PPR (पेस्ट दे पेतित्स रुमिनंट्स) या घातक आजारापासून शेळ्यांचे संरक्षण करणे हा होता.

या शिबिरात एकूण 18 कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, 95 शेळ्यांना PPR लस देण्यात आली. लसीकरणामुळे शेळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून, आजारामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येणार आहे. यामुळे शेळीपालन व्यवसाय अधिक सुरक्षित व उत्पन्नवाढीस सहाय्यक ठरणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. शुभम पाटील यांचे मौल्यवान सहकार्य लाभले. त्यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्यासोबतच उपस्थित शेतकऱ्यांना शेळीपालन, रोगप्रतिबंधक उपाययोजना व लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुधन आरोग्य सुधारण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जात असून, याचा थेट लाभ शेतकरी व ग्रामीण कुटुंबांना होत आहे. या उपक्रमाबद्दल सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व भविष्यात अशा उपक्रमांची मागणी केली.

सर्व सहभागी कुटुंबे, सहकार्य करणारे तज्ञ व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

Join us in the movement of rural development - Gramoday.

#सेवा सहयोग फाउंडेशन
#ग्रामोदय_प्रकल्प
#भूजल अभियान
#भूजल दिंडी प्रमुख
#शेळी_लसीकरण
PPR_लस
पशुधन_आरोग्य
ग्रामीण_विकास
पिंपळवाडी
शेळीपालन
शेतकरी_सशक्तीकरण

03/01/2026

🌸 सावित्रीबाई फुले : स्त्रीशिक्षणाची पहिली मशाल 🌸
भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे नाव केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक विचार, एक चळवळ आणि एक क्रांती म्हणून अजरामर झाले आहे. ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, त्या अंधकारमय समाजात सावित्रीबाईंनी शिक्षणाची पहिली मशाल पेटवली. त्यांनी सहन केलेला अपमान, झालेला छळ आणि समाजाकडून मिळालेला विरोध — या सगळ्यांवर मात करून त्यांनी स्त्रीशिक्षणाचा मार्ग रुंद केला.

सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या; त्या मानवतेच्या आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या होत्या. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. मुली शिकल्या तर कुटुंब घडते, कुटुंब घडले तर समाज प्रगल्भ होतो — हा विचार त्यांनी समाजमनात रुजवला.

आज त्यांच्या विचारांची फळे समाजात ठळकपणे दिसत आहेत.
सेवा सहयोग फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी विकास योजना व शिक्षण सहाय्य योजना यांच्या माध्यमातून शेकडो सावित्रीच्या लेकी आज उच्च शिक्षण घेत आहेत. याच योजनांच्या बळावर अनेक विद्यार्थिनींनी आपले शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांत स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी करत आहेत. ग्रामीण, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतून आलेल्या या मुली आज आत्मविश्वासाने समाजात आपले स्थान निर्माण करत आहेत.

ही प्रत्येक शिकलेली, सक्षम आणि स्वावलंबी मुलगी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नांची साकार झालेली प्रतिमा आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीला सक्षम करणे, तिला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार देणे — हीच सावित्री माई फुले यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे.

आजही समाजाला दिशा देणाऱ्या त्यांच्या विचारांना वंदन करताना एवढेच म्हणावेसे वाटते,सावित्रीबाई फुले गेल्या नाहीत, त्या प्रत्येक शिकणाऱ्या मुलीच्या स्वप्नांत आजही जिवंत आहेत.

25/12/2025

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत लोंढे येथे किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी व्यापक जनजागृती उपक्रम !
उर्मी प्रकल्पांतर्गत ११० विद्यार्थिनींना वर्षभरासाठी सॅनिटरी किट वाटप..*

सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे यांच्या सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उर्मी प्रकल्पाच्या माध्यमातून लोंढे येथील स्व. सै. कै. रावसाहेब निकम उच्च माध्यमिक विद्यालय व ज. मा. विद्यालय येथे किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक व्यापक जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमात परिसरातील विविध गावांतून शिक्षणासाठी येणाऱ्या ११० किशोरवयीन विद्यार्थिनींना किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, हार्मोनल बदलांचे परिणाम, भावनिक अस्थिरता, आत्मविश्वास वाढविण्याचे उपाय, मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची योग्य स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व, संतुलित व पोषक आहार, नियमित व्यायाम तसेच वैयक्तिक आरोग्याची काळजी याबाबत सखोल, शास्त्रीय व समुपदेशनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास होणारे संसर्ग, रक्तक्षय (अ‍ॅनिमिया), त्वचारोग, गर्भाशयाशी संबंधित आजार व त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम याविषयी उदाहरणांसह माहिती देण्यात आली. यासोबतच मासिक पाळीविषयी समाजात असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज व संकोच दूर करून या विषयावर उघडपणे व आत्मविश्वासाने बोलण्याची गरज मार्गदर्शकांनी अधोरेखित केली.

मुलींचे आरोग्य म्हणजे कुटुंबाचे आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य म्हणजे समाजाचे भविष्य” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कोणतीही मुलगी केवळ आर्थिक, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे आरोग्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ११० विद्यार्थिनींना वर्षभरासाठी ‘उर्मी’ सॅनिटरी किटचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली असून स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडतील, तसेच शिक्षणात खंड न पडता त्या आत्मविश्वासाने पुढे जातील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात सौ. गोरीताई पेंडसे, सौ. दीप्तीताई बोगम, सौ. मनीषा निकम व सौ. वैशाली राठोड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिंडी प्रमुख श्री. दयाराम सोनवणे, श्री. सोमनाथ माळी व श्री. प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाचे लोंढे गावातील ग्रामस्थ, पालक, शिक्षकवर्ग व शालेय व्यवस्थापनाने मनःपूर्वक स्वागत करत सेवा सहयोग फाउंडेशनच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार व पर्यावरण क्षेत्रातील सातत्यपूर्ण सामाजिक कार्याबद्दल विशेष समाधान व आभार व्यक्त केले.




Sahayog


सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, खान्देश

Photos from Gunvant Sonawane's post 24/12/2025

आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंद चि अंग आनंदाचें ।।

तलावांचा अनुभव सांगत असताना मनस्वी आनंद येतो, कारण तुम्हाला यामुळे शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गावकऱ्यांचा आनंद मांडता येतो आणि आनंद वाटता येतो.

स्वतःहून एखादी टीम कामाचे अनुभव शूट करण्यासाठी येते हा अजून वेगळा अनुभव.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Pune