Swarmayee Sangeet Class.

Swarmayee Sangeet Class. Light & Classical Music school for age group starting from 4 yrs onwards till 70 by Mrs. Rajashree T

स्वरमयीच्या विद्यार्थिनींनी ट्रॅकवर स्वतंत्र गाणे सादर करून त्याचा आनंद लुटला. नेहमीच्या सादरीकरणापेक्षा वेगळे म्हणजे या...
12/05/2026

स्वरमयीच्या विद्यार्थिनींनी ट्रॅकवर स्वतंत्र गाणे सादर करून त्याचा आनंद लुटला. नेहमीच्या सादरीकरणापेक्षा वेगळे म्हणजे यावेळी त्यांनी ट्रॅकवर गाण्यासाठी आवश्यक असलेली स्केल व स्पीड या गोष्टी शिकून गाणे सादर केले.

18 जानेवारी 2026 रोजी आपल्या स्वरमयी क्लासचे 19 वे वार्षिक स्नेहसंमेलन खूप उत्साहात आणि रसिकांच्या प्रचंड गर्दीमध्ये पुण...
06/02/2026

18 जानेवारी 2026 रोजी आपल्या स्वरमयी क्लासचे 19 वे वार्षिक स्नेहसंमेलन खूप उत्साहात आणि रसिकांच्या प्रचंड गर्दीमध्ये पुण्याई सभागृह येथे संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने प्रत्येक गाणी उत्तमरीतीने सादर केली. त्यास सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षी वाद्यवृंदा मध्ये सिंथेसायझर वर श्री केदार परांजपे अद्वैत कुलकर्णी तर हार्मोनियम वर संपदा देशपांडे तबल्यास स्वानंद जवळेकर आणि रोहन करंदीकर तालवाद्य अथर्व केळकर आणि निवेदन वीणा केळकर यांनी केले. गाण्याच्या परीक्षणासाठी श्री अमोल जोशी आणि अमृता जवळेकर यांनी सहकार्य केले.यावर्षी स्फूर्तीगीते ही थीम घेऊन वेगवेगळी गाणी सादर केली. यावर्षी वंदे मातरम हे गीत क्लासच्या जवळ जवळ 100 विद्यार्थिनींनी एकत्रित रित्या सादर केले.

12/09/2025

स्वरमयी क्लासच्या विद्यार्थिनींचा टिपरीच्या ठेक्यावर असलेल्या गाण्यांचा मेडले.

आज स्वरमयी क्लासच्या रिषभ या ऑनलाइन पद्धतीने शिकणाऱ्या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम कर्वेनगर येथे जोगळेकर यांच्या हॉलमध्य...
25/08/2025

आज स्वरमयी क्लासच्या रिषभ या ऑनलाइन पद्धतीने शिकणाऱ्या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम कर्वेनगर येथे जोगळेकर यांच्या हॉलमध्ये उत्तम पद्धतीने पार पडला. सर्व विद्यार्थिनींनी एकेक गाणे तयारीनिशी सादर केले. त्यांना पेटीवर अमोल जोशी यांनी तर तबल्यावर विनय बाळ यांनी उत्तम साथ केली. निवेदनाची जबाबदारी बॅचमधील पद्मजा ताई माधुरी ताई, वेला आणि श्रद्धा यांनी उत्तम रीतीने पार पाडली. एवढ्या जोरदार पावसातही सर्व जणी उपस्थित राहिल्या. सविताताई आणि सहविद्यार्थींनी उत्तम आयोजन आणि नियोजन केले होते. सुरेख आणि देखणा कार्यक्रम झाला.

आज स्वरमयी क्लासच्या आरोही या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम  अजंठा Avenue  सोसायटीच्या हॉलमध्ये मध्ये उत्तम पद्धतीने पार प...
02/08/2025

आज स्वरमयी क्लासच्या आरोही या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम अजंठा Avenue सोसायटीच्या हॉलमध्ये मध्ये उत्तम पद्धतीने पार पडला. सर्व विद्यार्थिनींनी एकेक गाणे तयारीनिशी सादर केले. त्यांना पेटीवर संपदा खरे देशपांडे हिने तर तबल्यावर भावना टिकले यांनी उत्तम साथ केली. निवेदनाची जबाबदारी बॅचमधील अर्चना शेणोलीकर आणि मंजिरी बोरगावकर यांनी उत्तम रीतीने पार पाडली. सुरेख आणि देखणा कार्यक्रम झाला.

आज स्वरमयी क्लासच्या स्वरारमणी या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम  शिप्रा सहवास सोसायटीच्या हॉलमध्ये मध्ये उत्तम पद्धतीने पा...
12/07/2025

आज स्वरमयी क्लासच्या स्वरारमणी या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम शिप्रा सहवास सोसायटीच्या हॉलमध्ये मध्ये उत्तम पद्धतीने पार पडला. सर्व विद्यार्थिनींनी एकेक गाणे तयारीनिशी सादर केले. त्यांना पेटीवर संपदा खरे देशपांडे हिने तर तबल्यावर गोपाळ धुमाळ यांनी उत्तम साथ केली. निवेदनाची जबाबदारी बॅचमधील सुजाता जोशी शिल्पा मुंगळे आणि मनाली उमराणीकर यांनी उत्तम रीतीने पार पाडली. तर कार्यक्रमाचे संयोजन मेधा जोशी आणि इतर विद्यार्थिनींनी उत्तम केले होते. हमीर रागातील कौन बतावे बाट गुरुविण या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर टांगा रिदम च्या गाण्यांनी सांगता झाली.अतिशय सुरेख आणि देखणा कार्यक्रम झाला.

स्वरमयी क्लासच्या वयोगट 7 ते 27 मधील विद्यार्थिनींचा 26 april रोजी स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम झाला.अतिशय तयारीने सगळ्यां...
02/05/2025

स्वरमयी क्लासच्या वयोगट 7 ते 27 मधील विद्यार्थिनींचा 26 april रोजी स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम झाला.अतिशय तयारीने सगळ्यांनी एक एक गाणे सादर केले.स्वानंद जवळेकर यांनी तबल्यावर तर संपदा देशपांडे यांनी पेटीची उत्तम साथ केली. त्याची काही क्षणचित्रे..

स्वरमयी क्लासच्या पंचम बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम स्मिता पटवर्धन यांच्या घरी अतिशय उत्साहाने साजरा झाला. आमची ही बॅच जर...
26/04/2025

स्वरमयी क्लासच्या पंचम बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम स्मिता पटवर्धन यांच्या घरी अतिशय उत्साहाने साजरा झाला. आमची ही बॅच जरी ऑनलाईन असली तरी सुद्धा बाहेरगावाहून आणि पुण्यातही इतर लांब लांबच्या ठिकाणाहून सगळ्याजणी एकत्र येऊन कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे निवेदन प्रज्ञा देशपांडे यांनी केले. पेटीवर श्री अमोल जोशी तर तबल्यावर प्रणव जोशी यांनी साथ दिली.

आज स्वरमयी क्लासच्या सुरश्री या या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम अजंठा अवेन्यू येथील क्लब हाऊस मध्ये उत्तम पद्धतीने पार पड...
23/04/2025

आज स्वरमयी क्लासच्या सुरश्री या या बॅचचा एकल गायनाचा कार्यक्रम अजंठा अवेन्यू येथील क्लब हाऊस मध्ये उत्तम पद्धतीने पार पडला. सर्व विद्यार्थिनींनी एकेक गाणे तयारीनिशी सादर केले. त्यांना पेटीवर प्रार्थना साठे तर तबल्यावर गोपाळ धुमाळ यांनी उत्तम साथ केली. निवेदनाची जबाबदारी स्वाती पानसे हिने उत्तम रीतीने पार पाडली. तर तालवाद्यांची साथ संध्या वैद्य हिने केली. कार्यक्रमाचे संयोजन वैशाली मोघे आणि इतर विद्यार्थिनींनी उत्तम केले होते. नटरंग उभा हे नांदी सर्वांनी एकत्र म्हणली तर कार्यक्रमाच्या शेवटी शिव भोला भंडारी या गाण्याने सांगता केली.

आज आपल्या स्वरमयी क्लासच्या सूर साधक या बॅच चा एकल गायनाचा कार्यक्रम सौ . रूपाली वाडीकर हिच्या घरी उत्तम रीतीने संपन्न झ...
15/04/2025

आज आपल्या स्वरमयी क्लासच्या सूर साधक या बॅच चा एकल गायनाचा कार्यक्रम सौ . रूपाली वाडीकर हिच्या घरी उत्तम रीतीने संपन्न झाला.त्यांना पेटीवर सौ धनश्री गिजरे आणि तबल्यावर श्री प्रणव जोशी यांनी उत्तम साथ केली. क्लासची विद्यार्थिनी मंजिरी मांडके हिने निवेदनाची जबाबदारी सांभाळली. तर प्रीती बेटावडकर हिने तालवाद्य वाजवली.

आपल्या स्वरमयी क्लासच्या गंधार बॅच आणि सारंग या दोन्ही बॅच चा एकल गायनाचा कार्यक्रम अजंठा avenue येथील हॉल मध्ये उत्तम र...
12/04/2025

आपल्या स्वरमयी क्लासच्या गंधार बॅच आणि सारंग या दोन्ही बॅच चा एकल गायनाचा कार्यक्रम अजंठा avenue येथील हॉल मध्ये उत्तम रीतीने संपन्न झाला. माईक तबला पेटी या बरोबर एकटीने गायनाचा अनुभव प्रत्येकीला घेता यावा यासाठी हे आयोजित केले होते.त्यांना श्री बाळ आणि श्री सलगरकर यांनी तबला आणि पेटीची साथ केली.तर दिप्ती आपटे या विद्यार्थिनीने निवेदनाची जबाबदारी छान पेलली.त्यातील काही फोटो...

Address

1, Vishwalaxmi Housing Society, Near Mayur Colony, Kothrud.
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarmayee Sangeet Class. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swarmayee Sangeet Class.:

Shortcuts

Share

Category