09/05/2026
*म .ए .सो.भावे प्राथमिक शाळेचे वार्षिक सादरीकरण स्पर्धेत सुयश*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत आयोजित वार्षिक सादरीकरण स्पर्धेत “पंच परिवर्तन” या विषयांतर्गत म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेने (प्राथमिक विभाग) उल्लेखनीय कार्याची नोंद करत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
शाळेने विविध नाविन्यपूर्ण, उपयुक्त व समाजाभिमुख उपक्रम राबवून प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शाळा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे .
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे मोलाचे सहकार्य आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून शाळेला हा सन्मान मिळाला आहे.
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .