04/12/2025
“वेलनेस कोच” पहिल्या दिवशी लोकांना घाम काढून, पाणी कमी करून वजन हलकं दाखवतात—लोकांना वाटतं की फॅट कमी झालं, पण प्रत्यक्षात ते फक्त डिहायड्रेशन असतं. दुसऱ्या दिवशी गाण्यांवर उड्या-झडपा लावून तमाशा करतात; तंत्र, फॉर्म काहीच नसल्याने गुडघे-बॅक बिघडतात आणि शरीर थकून हार मानतं. तिसऱ्या दिवशी “हा शेक घ्या, ही पावडर घ्या, हा कोर्स घ्या” म्हणून महागडी प्रॉडक्ट्स घशात कोंबतात—हे कोचिंग नसून पूर्णपणे सेल्स स्कीम असते. पाणी कमी केल्यामुळे दिसणारा तात्पुरता बदल लोकांना कोचिंग वाटतो, पण प्रत्यक्षात त्यांना फॅट, मसल, हॉर्मोन्स, झोप, रिकव्हरी काहीच माहिती नसतं. खरं कोचिंग म्हणजे विज्ञान, पिरिऑडायझेशन, फॉर्म, ताकद वाढवणे, मसल टिकवणे आणि डायट-ट्रेनिंग-रिकव्हरीचं संतुलन—पण हे शिकवलं जात नसल्याने ते लोकांना नाचवतात आणि प्रॉडक्ट विकतात.