EduVarta

EduVarta शैक्षणिक बातम्यांचे पहिले न्यूज पोर्टल. KG to PG आणि स्पर्धा परीक्षांपासून भरतीपर्यंतच्या सर्व घडामोडींची माहिती, बातम्यांचे अपडेट्स देणारे एकमेव पोर्टल.

विद्यार्थी 👩‍🎓 शिक्षक 👨‍🏫 पालक 👨‍👩‍👧 आणि बेरोजगारांच्या ❓प्रश्नांना वाचा 💬 फोडणारे, शिक्षण 🎓 क्षेत्रातील पहिले स्वतंत्र व्यासपीठ 'Eduvarta'🖋️. सर्व शैक्षणिक, नोकरी विषयक आणि स्पर्धा परिक्षा विषयक बातम्यांसाठी आत्ताच फॉलो ✅ करा👇

21/08/2026

🚨 गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षा; सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू?

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका खासगी शाळेतील धक्कादायक घटना सोशल मीडियावर चर्चेत आहे. गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून शिक्षिकेने सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला मारल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा रडत विनवणी करताना दिसत असून, त्यानंतर तो अचानक कोसळल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.

पालकांनी शिक्षिकेच्या कथित असंवेदनशील वर्तनावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Teacher EducationNews BreakingNews ViralNews CCTVFootage StudentDeath SchoolIncident ChildSafety IndiaNews LatestNews शाळा विद्यार्थीसुरक्षा शिक्षण विशाखापट्टणम आंध्रप्रदेश धक्कादायकघटना मराठीबातम्या

21/08/2026

🎓 BBA किंवा BCA प्रवेशासाठी शोध सुरू आहे? तुमची संधी अजूनही आहे!

पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये BBA आणि BCA अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना CAP Round अंतर्गत प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.

अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक सुविधा आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी! ✨

मर्यादित जागा उपलब्ध — आजच कॉलेजचा पसंतीक्रम नोंदवा आणि आपला प्रवेश निश्चित करा!

🎓📚💻 Your Future Begins Here!

ModernCollege Shivajinagar Pune PuneCollege ProgressiveEducationSociety BBAAdmission BCAAdmission Career HigherEducation StudentLife Admission2026 PuneStudents Education FutureReady StudyInPune उच्चशिक्षण प्रवेशप्रक्रिया पुणे मॉडर्नकॉलेज

21/08/2026

🚨 विद्यार्थ्यांचे उत्तर ऐकून दिपकेंनी लावला डोक्याला हात! 🤦‍♂️

‘स्कूल ठीक करो’ मोहिमेअंतर्गत CJP चे अभिजीत दिपके शाळांना भेटी देत आहेत. एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला.

व्हिडिओतील विद्यार्थ्यांनी आपण दुसऱ्या शाळेतील असल्याचे सांगितल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शाळा टिकवण्यासाठी किंवा उपस्थिती दाखवण्यासाठी डमी विद्यार्थी वर्गात बसवण्यात आले होते का? असा सवाल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित केला जात आहे. 🤔

या प्रकरणामागचं नेमकं सत्य काय? चौकशीची मागणी होणार का?

StudentIssues EducationSystem MaharashtraNews ViralVideo BreakingNews मराठीबातम्या शिक्षण विद्यार्थी शाळा पुणे Maharashtra

20/08/2026

🚨 Admissions Open for First Year Engineering! 🚨

Take the first step towards a successful engineering career at MES's Mukunddas Lohiya College of Engineering! 🎓✨

Only a limited number of seats are left. Don't wait—secure your spot today and build a bright future! 🛠️💻

📢 “Secure your admission at the earliest and shape your career,” - Principal Makarand Jadhav.

20/08/2026

CET निकालातील गोंधळावर पालकांचा संताप! 🎓📢
CET-Cellच्या निकाल प्रक्रियेवर आमदार रोहित पवार आणि पालकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न. CET-Cell कार्यालयात जाऊन आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे मागितला जाब. मात्र, निकालाची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविल्याचा CET-Cellचा दावा.
नेमकं सत्य काय? 🤔

CETNews RohitPawar DilipSardesai ExamResult EducationNews StudentIssues Parents EducationUpdate MaharashtraNews PuneNews BreakingNews LatestNews मराठीबातम्या शिक्षण विद्यार्थी पालक सीईटी सीईटीनिकाल

19/08/2026

कॉमन उमेदवारांचा गोंधळ! 🔥

MPSC महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त सेवा परीक्षा २०२५ च्या निकालावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. ‘Opting Out’ रद्द केल्यामुळे Sub Registrar आणि STI या दोन्ही पदांच्या अंतिम यादीत तब्बल ७६ उमेदवार कॉमन आल्याचा मुद्दा चर्चेत आहे.

निकालावर याचा नेमका काय परिणाम होणार? उमेदवारांना न्याय मिळणार का? 🤔

MPSCStudents STI SubRegistrar MPSCResult MPSCNews CompetitiveExams StudentVoice EducationNews MaharashtraJobs GovernmentJobs ExamResult OptingOut JusticeForStudents स्पर्धापरीक्षा एमपीएससी

18/08/2026

**विद्यापीठातील भ्रष्टाचाराची चौकशी करा! 🚨**

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध उपकरण खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. निनावी पत्रातील दाव्यांमध्ये तथ्य असल्याचा दावा सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर यांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणार का? 🎙️
‘एज्युवार्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत कृष्णा भंडलकर यांनी मांडली आपली भूमिका.

Investigation KrishnaBhandalkar SenateMember EduVarta Ajyuvarta PuneNews EducationNews MaharashtraNews BreakingNews विद्यापीठ भ्रष्टाचार चौकशी पुणे शिक्षण

18/08/2026

🚨 UGC-NET 2026 अपडेट!

इंग्रजी, कॉमर्स आणि सोशियोलॉजी या 3 विषयांची परीक्षा पुन्हा होणार!
उत्तरपत्रिकांमधील गोंधळ आणि तांत्रिक चुकांनंतर NTA चा मोठा निर्णय. 📚⚠️

तुमचा विषय यात आहे का? कमेंटमध्ये सांगा! 👇

BreakingNews EducationNews NETExam UGC Students English Commerce Sociology ExamNews StudentUpdate MarathiNews EducationUpdate स्पर्धापरीक्षा परीक्षाअपडेट विद्यार्थी

17/08/2026

🔥 SBI मध्ये क्लर्क भरतीची मोठी संधी! 🏦

भारतीय स्टेट बँकेने Junior Associate (Customer Support & Sales) या क्लर्क पदासाठी तब्बल 9,766 जागांची भरती जाहीर केली आहे! 🎯

📌 7,680 नियमित पदे
📌 2,086 बॅकलॉग पदे
📌 सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी! 💼✨

तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा आणि अर्जाची संधी चुकवू नका! 📲

BankingJobs GovernmentJobs GovtJobs BankJob ClerkBharti SarkariNaukri JobAlert Recruitment CompetitiveExam BankingExam MaharashtraJobs MarathiJobUpdate नोकरीचीसंधी सरकारीनोकरी SBIभरती

17/08/2026

🚨 कोर्ट परीक्षा गोंधळावर अभिजीत दिपके मैदानात!

मुंबई हायकोर्ट Clerk Typing Exam मधील तांत्रिक अडचणींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिजीत दिपके यांनी पुनर्परीक्षा, दोषी परीक्षा केंद्रांवर कारवाई आणि स्वतंत्र Technical Auditची मागणी केली आहे.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच परीक्षेचे काम दिलेल्या संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करून कारवाई करण्याची मागणीही केली.

🎯 विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच!

ExamScam ExamIssue ReTest TechnicalIssue TechnicalAudit StudentsJustice StudentVoice Maharashtra CompetitiveExam ExamUpdate JusticeForStudents विद्यार्थीन्याय परीक्षागोंधळ अभिजीतदिपके

Address

Lohgaon
Pune
411047

Alerts

Be the first to know and let us send you an email when EduVarta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to EduVarta:

Shortcuts

Share