12/01/2022
*नाव-अक्षय चिमाजी बांबळे*
*शिक्षण-BA History*
*संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे ता.मुळशी जि.पुणे*
*क्षण आठवणींच्या कुपीतले*
*असतात शाळेतील दिवसांचे..*
*प्रत्येकालाच सोनेरी वाटतात*
*दिवस आपल्या शाळेचे..*
इयत्ता १० वी नंतर सन २०१६ साली संपर्क ही संस्था माझ्या संपर्कात आली.पाहता पाहता दोन वर्षात संपर्क ही माझी संस्था झाली आणि मी संपर्क संस्थेचा होऊन गेलो.सन २०१६-१८ या दोन वर्षाच्या काळात मी या संस्थेत इ.११ वी आणि इ.१२ वी या वर्गांत वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले.१० वी नंतर इ.११ वी १२ वी करण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो परंतु मी ११ वी उत्तीर्ण होऊ शकलो नाही त्यामुळे मला पुन्हा ११ वी मध्ये प्रवेश घ्यायचा होता परंतु काही कारणास्तव मला इ.११ वी साठी लवकर प्रवेश घेता आला नाही.घरापासुन नजिकच्या अंतरावर असलेल्या कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया ही पुर्ण झाली होती त्यामुळे सदर वर्ष गॅप होणार अशी परिस्थिती माझ्यापुढे उभी राहिली होती.अशावेळी माझ्या मामांनी मला संपर्क संस्थेबद्दल माहिती दिली.मी क्षणाचाही विलंब न करता शाळेचे मुख्याध्यापक श्री.चाळक सरांशी संपर्क साधला आणि चाळक सरांनी मला संपर्क शाळेमध्ये प्रवेश दिला आणि माझे एक वर्ष गॅप होण्यापासुन वाचवले त्याबद्दल मी संपर्क संस्था आणि चाळक सरांचा खुप आभारी आहे.प्रवेश घेतल्यानंतर मी शाळेच्या वस्तिगृहात राहु लागलो आणि कॉलेज करु लागलो.सह्याद्रीसारख्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात मला शिक्षण घेता आले म्हणुन मी स्वताला खुप नशिबवान समजतो.लहानपणापासुन घर आणि शाळा असे शिक्षण घेतल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस मला अवघडल्यासारखं वाटलं परंतु संस्थेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचा-यांचा मनमिळाऊ स्वभाव यामुळे मला नंतर सर्वच आपलंसं वाटु लागलं.आदरणीय अमितकुमार बॅनर्जी म्हणजेच आमचे अंकल यांनी स्थापण केलेली संपर्क संस्था या संस्थेचे कार्य Social action for manpower creation 'SAMPARC' याच शब्दात दडलेलं आहे.
या संस्थेत मला इ.११ वी ला प्रवेश मिळाला.मी नियमितपणे कॉलेज करु लागलो.वसतिगृहात असताना वस्तिगृहाचे अधिक्षक श्री.ढावरे सर यांनी लावलेली नियमितपणे सकाळी लवकर उठण्याची आणि व्यायाम करण्याची सवय अजुनही मला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यास फायदेशीर ठरते.व्यायाम करुन आल्यानंतर अंघोळ वगैरे करुन नाष्ता करणे आणि त्यानंतर शाळेच्या पटांगणावर जाऊन कोवळ्या उन्हात अभ्यास करणे त्यानंतर कॉलेजला जाणे अशी दिवसाची सुरुवातच खुप छान होत असायची.माझ्या कॉलेजची वेळ स.११ ते दु.२ असायची.११ ते २ कॉलेजमध्ये आमच्या श्री.देशमुख सर,श्री.भंडे सर आणि श्री.बुरकुले सर अशा उत्तम प्राध्यापकांच्या अध्यापनाखाली अध्ययन केल्यानंतर २ वाजता कॉलेज सुटत असे.कॉलेज सुटल्यानंतर दुपारी फावल्या वेळेत काय करायचं?असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहायचा.मग दुपारी कॉलेजवरुन आलं की सर्व शिक्षक आणि मित्रांसोबत वसतिगृहाचे आचारी पाटील मामा आणि मावशी यांनी बनवलेल्या खमंग जेवनावर ताव मारण्याचा आनंद काही निराळाच असायचा.मग शाळेच्या ग्रंथालयातुन एखादं पुस्तक आणुन वाचने आणि त्यातच हरवुन जाणारा मी खरतंर मला अवांतर वाचणाची सवय लागली ती तेव्हापासुनच.अशाप्रकारे शाळेने आम्हाला भरपुर साहित्य असणारं एक सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध करुन दिलं होतं.काही वेळ वाचनात घालवल्यानंतर थोडी वामकुक्षी ही ठरलेलीच असायची.मग संध्याकाळच्या ५ ते ६ च्या दरम्यान मित्रांसोबत आणि शिक्षकांसोबत विविध खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद लुटुन जिवनातील दुख:,चिंता,समस्या विसरुन जगण्याची कला मी येथेच शिकलो.मग संध्याकाळी ६ वाजले की अर्धा तास संध्याकाळची प्रार्थणा,मनाचे श्लोक,अध्यात्माने मन प्रसन्नता,शांती आणि नवचैतन्याने भरुन जाई.प्रार्थणा झाली की काही वेळ मित्रांसमवेत अभ्यास करायचो त्यानंतर मग आतुरता असायची ती शिक्षक आणि मित्रांसोबत खमंग जेवनावर ताव मारण्याची.मग सर्वांचं जेवण झाल्यानंतर शाळेतील शिक्षक होस्टेलची स्थिती,मुलांच्या समस्या जाणुन घेण्याच्या निमित्ताने आमची भेट घेण्यासाठी होस्टेल मध्ये येत असत.सर्वच शिक्षकांची मुलांबद्दल असलेली आपुलकी,काळजी,मुलांच्या समस्या सोडवण्यात मदत एकंदरीत या सर्वच गोष्टींमुळे घरची आठवण कधी आलीच नाही.चुक झाल्यास ओरडणारे,समजुन सांगणारे,समजुन घेणारे,फणसासारखे बाहेरुन टनक आणि आतुन गोड असलेले चाळक सर आणि सोमवंशी सर अशी वडिलधा-या माणसांसम असणा-या व्यक्ति त्याचबरोबर इतर शिक्षक यांनी इतर गोष्टींप्रमाणेच शिस्त या गोष्टीला दिेलेल्या प्राधान्यामुळे आणि आम्हाला लावलेल्या शिस्तीमुळे एक चांगला माणुस घडण्यात खुप मदत झाली आणि होत आहे.खरात सर आणि सोमवंशी सरांसारख्या व्यक्तिंची फिटनेस,वॉलीबॉल तसेच क्रिकेट मधील खेळी पाहिली तर 'वयाला जर हरवायचं असेल तर छंद हे जिवंत ठेवले पाहिजेत या वाक्याची प्रत्यक्ष अनुभुती यायची.कोकणे सर,राहुल सर,रवी सर,कल्पेश सर,अमोल सर,संतोष सर,विद्या ताई तसेच eclerx चे अनेक सर अशा भावासारख्या वाटणा-या सरांशी संवाद साधताना कधी संकोच वाटला नाही.अशा निसर्गरम्य वातावरणात राहत असल्यामुळे कधी आजारी तर पडलो नाही परंतु कधी पडलोच तर संस्थेचे स्थायीक डॉक्टर म्हणजेच डॉक्टर काका यांनी कधी आमच्या आरोग्याची हेळसांड होऊ दिली नाही.या सर्वच गोष्टींमुळे संपर्क शाळा हे माझे एक कुटुंबचं बनली होती.या आणि या सर्व गोष्टींव्यतिरिक्त शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन,विविध स्पर्धांचं आयोजन,प्रदर्शने,सहल,वनभोजन अशा अनेक गोष्टींचं आयोजन करुन आमच्या कलागुणांना वाव दिला जायचा आणि आम्हीही या सर्वच गोष्टींमध्ये आनंदाने सहभागी व्हायचो.अनेक गरजु,शिक्षणापासुन वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षण देणारी ही संस्था आणि माझ्या शाळेच्या अनेक कौतुकास्पद,अतुलनीय कार्यांचा मला खुप अभिमान वाटतो.अशा माझ्यासारख्या अनेक मुलांचा सर्वांगीण विकास आणि उत्तम भवितव्य घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणा-या माझ्या संपर्क संस्थेचा आणि शाळेचा मी कायमच ऋणी राहील.🙏