MES Bal Vikas Mandir Saswad

MES Bal Vikas Mandir Saswad Official Page of MES Bal Vikas Mandir, Saswad

14/08/2026
हार्दिक अभिनंदन!
11/08/2026

हार्दिक अभिनंदन!

म. ए. सो. बाल विकास मंदिर, सासवड येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरीसासवड : म. ए. सो. बाल विकास मंदिर, सासवड येथे गुरुपौर्ण...
30/07/2026

म. ए. सो. बाल विकास मंदिर, सासवड येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सासवड : म. ए. सो. बाल विकास मंदिर, सासवड येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. शैलेंद्र ठाकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. भाऊसाहेब बडधे होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुपूजनाने झाली. त्यानंतर संगीत शिक्षक व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गुरुवंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते सादर केली. त्यांच्या मनोगतांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रमुख पाहुणे श्री. शैलेंद्र ठाकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित केले. शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि गुरुजनांविषयी आदर बाळगण्याचा संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक मा. भाऊसाहेब बडधे यांनी गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले. गुरु हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी गुरुंचा आदर राखून प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. दिपक कांदळकर यांनी केले, तर सौ. अमृता पवार यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

22/07/2026
म.ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत  बालदिंडी उत्साहातसासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आष...
18/07/2026

म.ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत बालदिंडी उत्साहात

सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले,मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.शाळेच्या परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत शाळेतील सर्व विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, नरेंद्र महाजन , दिपक कांदळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.मंजुषा चोरामले , साधना राऊत व अमृता जगताप यांनी आरतीचे गायन केली.
या दिंडीत विद्यार्थी , शिक्षक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. तसेच सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात टाळ, भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीची रोपे असल्याने दिंडीला खऱ्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले.
या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ' झाडे लावा, झाडे जगवा' , ' पाणी आडवा, पाणी जिरवा' असा संदेश दिला.
"ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा, पालखी तयार करणे, अभंग गायन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वाती बोरावके यांनी आषाढी एकादशी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता जगताप यांनी केले.

म. ए. सो. प्रशालेत 'पावनखिंड दौड'चे उत्साहात आयोजनसासवड : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत वीर बाजीप्रभू देशपां...
18/07/2026

म. ए. सो. प्रशालेत 'पावनखिंड दौड'चे उत्साहात आयोजन

सासवड : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'पावनखिंड दौड' या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य, धैर्य आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शौर्याचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमात नरेंद्र महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख व्याख्याते कुंडलिक पाटोळे यांनी पावनखिंडीच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व, वीर बाजीप्रभूंचे अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य समजून घेऊन त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
यावेळी, बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , पर्यवेक्षिका अर्चना लडकत तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने पावनखिंड दौडीत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खैरनार यांनी प्रभावीपणे केले. आभार भाऊसाहेब बडधे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील शौर्यगाथेची प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

म.ए.सो.प्रशालेत "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" उपक्रमसासवड : १६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट...
13/07/2026

म.ए.सो.प्रशालेत "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" उपक्रम

सासवड : १६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेने यावर्षी "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" या संकल्पनेवर आधारित वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल व म.ए.सो.चे बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील फ्रेंड्स ऑफ रेपटाईल्स अँड एन्व्हारमेंटल सेव्हिंग ट्रस्ट (FOREST) या संस्थेच्या वतीने म.ए.सो.चे माजी विद्यार्थी सागर कुटे, चेतन निगडे आणि सागर पाटील यांच्या हस्ते सुमारे १००० सीडबॉल्सचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सीडबॉल्सचा योग्य वापर करून पावसाळ्यात विविध मोकळ्या जागांमध्ये त्यांचे रुजवणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून अधिकाधिक वृक्षांची निर्मिती होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी पावसाच्या सरींसोबत हरित स्वप्न रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याची प्रेरणा घेतली.

यावेळी , म.ए.सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , मंजुषा चोरामले , माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, भाऊसाहेब येळे, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, निकिता होले, रेश्मा जगताप आदी उपस्थित होते.

*म.ए. सो. बाल विकास मंदिर सासवड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात* सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मं...
30/12/2025

*म.ए. सो. बाल विकास मंदिर सासवड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात*

सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक लोकगीते, मोबाईलचे दुष्परिणाम , शेतकरी नृत्य ,पारंपारिक लावणी, लोककला, कॉमेडी, रिमिक्स गाणी, कोळीगीते, गोंधळ गीतांवर नृत्यकला सादर केली. हिंदी- मराठी गाण्यांवर चिमुरड्यांनी केलेल्या नृत्य कलेला रसिकांनी दाद दिली.
सुमारे पाच तास चाललेल्या कार्यक्रमास पालक रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांपैकी अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रक्कम दिली.
शुक्रवार ( ता. २६ ) बाल विकास मंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून. कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला, तसेच शाळेत पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी अक्षय मांढरे, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी गोविंद लाखे, इंग्लिश मिडियम स्कूलच्या पर्यवेक्षिका सरोज मॅडम, रामदास अभंग, पत्रकार बापू मुळीक, पालक प्रतिनिधी विद्या टकले , शिक्षक प्रतिनिधी शितल चौधरी,
विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस वाघोले, संजीवन, बोरकर, माही बडधे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व परंपरेची जाणीव व्हावी, त्यांच्यातील विविध सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शाळा दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करत असते. शाळेच्या माध्यमातून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यास प्राधान्य दिले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय दिपक कांदळकर यांनी करून दिला. राणी गिरमे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस वाघोले याने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शार्वी धुमाळ, शिवम जगताप, माही बडधे, कस्तुरी निगडे, स्वाती बोरावके यांनी केले. आभार शीतल चौधरी यांनी मानले.

Address

म. ए. सो. बाल विकास मंदिर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
Pune
४१२३०१

Alerts

Be the first to know and let us send you an email when MES Bal Vikas Mandir Saswad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category