27/08/2026
शाहूमहाराज औरंगजेबाच्या ताब्यातून बाहेर येण्याअगोदर स्वराज्यात हंबीरराव मोहिते यांची लाडकी तडफदार कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी ताराबाई हिने औरंगजेबास जेरीस आणून सोडले होते.आपण दिल्लीचा ऐशोआराम सोडून कुठे ह्या दक्षिणेतील दऱ्या खोऱ्यात येऊन पडलो अशी त्याची भावना होत होती.औरंगजेब पुढे किल्ले जिंकत जाई मागून ताराबाई पुन्हा ते किल्ले हस्तगत करत जाई. आता हे किल्ले जिंकून औरंगजेब नक्की काय करणार होता हा मोठा प्रश्नच आहे.हे किल्ले कमरेला बांधून दिल्लीला तर नक्कीच घेऊन जाणार नव्हता,यातच त्याचा लष्करी मठ्ठपणा दिसून येतो.बुद्धी आणि चातुर्याच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या तोडीस असणाऱ्या ताराबाईंनी औरंगजेबाची संताजी आणि धनाजीच्या साहाय्याने दुर्दशा केली होती.मराठ्यांच्या छुप्या हल्ल्यांनी तो त्रासून गेला होता.मराठ्यांची मजल त्याच्या छावणीचे कळस कापून नेण्यापर्यंत गेली होती.
औरंगजेब आता इतका कावला होता की हातात असलेल्या शाहूचा काय उपयोग करून घेता येईल असा त्याचा विचार चालला होता.बादशहाने जाणूनबुजून शाहुवर मुसलमानी संस्कार केले उद्देश हाच की दक्षिणेत त्याने बादशहाचा मांडलिक असलेला 'मराठ्यांचा राजा' म्हणून राज्य करावे.
औरंगजेब मेल्यानंतर मुघल परंपरेला साजेसे वर्तन त्याच्या पुत्रांकडून घडले.मुअज्जम,अज्जम आणि कामबक्ष आपापसात लढले आणि मुअज्जम दिल्लीचा बादशहा झाला.दिल्लीच्या परतीच्या प्रवासात शाहूची सुटका झाली.
ताराबाईला शाहूंचा 'जन्मसिद्ध' अधिकार मान्य नव्हता म्हणून तिने गादीवर 'कर्मसिद्ध' अधिकार सांगितला.शाहू सुटून येण्याअगोदर तिने आपला मुलगा शिवाजी याचे मंचकारोहन केले आणि राज्याभिषेकही उरकला.
शाहू हा संभाजीपुत्र असल्याने हुकूमतपन्हा रामचंद्रपंत यांच्यासकट इतर कारभारी मंडळी शाहूच्या बाजूने गेली.पेशवे हे ताराबाईची माणसे फोडण्यात यशस्वी झाले.जी माणसे संभाजीपुत्र म्हणून शाहूकडे गेली ती वतनाच्या लोभानेच गेली होती.
शेवटी शाहू आणि ताराबाईची निकराची लढाई झाली आणि त्यात ताराबाई पराभूत झाली.शाहूने आपापसात भांडण नको म्हणून कोल्हापूरची दुसरी गादी निर्माण करून ती ताराबाईच्या मुलाला दिली.या ठिकाणी शाहू समंजसपणे वागला हेच दृष्टीस येते.
संघर्षाला सुरुवात होण्याअगोदर शाहूने ताराबाईसमोर एक सुंदर प्रस्ताव ठेवला होता तो असा की शाहू राजे जरी छत्रपती झाले तरी राज्याचा संपूर्ण कारभार ताराबाईंनी सांभाळावा.इथे ताराबाईंच्या कर्तुत्वाला, पराक्रमाला वाव मिळाला असता आणि घरातले वैरही राहिले नसते.कदाचित पराक्रमी बाजीरावांना दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांच्या छत्रपतींची स्थापना करता आली असती आणि शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार तर झालेच असते आणि संपूर्ण भारताचे चित्रच वेगळे दिसले असते.
पण असे झाले नाही.ताराबाईच्या कडक स्वभावामुळे पेशव्यांनी तिला तिच्या मुलासह कैदेत टाकले आणि त्या गादीवर ताराबाईंचा सावत्र मुलगा संभाजीची नेमणूक केली.ताराबाईला सातारच्या किल्ल्यावर आणून ठेवले गेले,पुढे तिचा मुलगा शिवाजी याचे निधन झाले पण तिने शिवाजीचा एकुलता एक मुलगा म्हणजेच तिचा नातू राजाराम (दुसरा)रामचंद्रपंत्यांच्या मुलाच्या घरात लपवून ठेवला होता.
साताऱ्याला आल्यावर शाहू आणि ताराबाईंनी आपले भांडण मिटविले.शाहू महाराज ताराबाईंच्या नातवाला दत्तक घ्यायला तयार झाले.हा दत्तक पुत्रही पुढे पेशव्यांना अधिक मान द्यायला लागला.तेव्हा ताराबाईंनी त्यालाही तुरुंगात टाकले.
पुढे पेशवे ताराबाईंना मान देऊ लागले,ताराबाईंनीही मनातून पेशव्यांबाबतची अढी काढून टाकली.
शाहू महाराज परतल्यावर ताराबाईंचे कर्तृत्व झाकोळून गेले.त्यांचे स्वारस्य फक्त मुलाच्या गादीपुरते उरले. शाहूमहाराजांच्या प्रस्तावावर ताराबाईंनी विचार करायला हवा होता पण मराठी माणसाला आपापसातील दुहीचा जो शाप मिळलेला आहे तोच आडवा आला आणि सगळे कर्तबदार असूनही कुणालाच एकमेकांचा फायदा घेता आला नाही किंवा एकमेकांच्या पराक्रमाला वाव देता आला नाही.
संदर्भ:Rani Tarabai: Most celebrated woman in Indian History – Afternoon Voice :शिवशाहीचा शोध(वसंत कानेटकर)
Golden History of Marathas | Maratha History | Maratha Empire | History of Marathas | Maratha History in Marathi | Chhatrapati Shivaji Maharaj | Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj in Marathi | Maratha Warriors | Maratha Forts | Maratha Kings | Maratha Samrajya | मराठ्यांचा इतिहास | मराठा इतिहास | मराठा साम्राज्य | छत्रपती शिवाजी महाराज | शिवाजी महाराजांचा इतिहास | शिवकालीन इतिहास | हिंदवी स्वराज्य | महाराष्ट्राचा इतिहास | मराठा योद्धे | मराठा सरदार | मराठा किल्ले | शिवकालीन किल्ले | छत्रपती संभाजी महाराज | राजाराम महाराज | महाराणी ताराबाई | पेशवा इतिहास | Medieval Indian History | Indian History | Maharashtra History | Maratha Culture | Maratha Heritage | Maratha History Documentary