Pirangut English School & JR.College

Pirangut English School & JR.College Vision Statement-

Pune District Education Association i.e. PDEA, under the dynamic and result oriented leadership of Hor'ble President Shri.

Ajitdada Pawar (Dy Chief Minister, Maharashtra ), Strives hard to be one of the top educational Institute providing the best infrastructural facilities like buildings, computers with internet, laboratories, libraries and the best good academic environment facilities, etc. for the students of professional and academic education.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वाटचाल-

पुणे जिल्हयातील बहुजन समाजातील व

ग्रामीण भागातील लोक साक्षर व्हावेत, शिकावेत,सुशिक्षित, सुसंस्कृत व्हावेत या हेतुने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्‍थेची स्‍थापना दि. 7 सप्‍टेंबर 1941 रोजी स्‍व. बाबुरावजी घोलपसाहेब यांनी लोकल बोर्डात चीफ ऑफिसरची नोकरी करीत असताना केली. संस्‍था स्‍थापन झाल्‍यानंतर संस्‍थेचे काम पाहण्यासाठी एक हंगामी कार्यकारी समिती स्‍थापन करण्यात आली. समितीमध्ये स्‍व. अण्णासाहेब आवटे - अध्यक्ष, स्‍व. बाबुराव जेधे - उपाध्यक्ष, स्‍व. बाबुराव घोलप - ऑनररी सेक्रेटरी व ट्रेझरर अशी निवड करण्यात येऊन संस्‍था रजिस्‍टर करण्याचे कामही त्‍यांच्यावर सोपविण्यात आले. त्‍यानंतर काही काळाने स्‍व. घोलपसाहेब यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य पाहून त्‍यांना स्‍व. अण्णासाहेब आवटे, स्‍व. शंकरराव भेलके, स्‍व. मामासाहेब मोहोळ, स्‍व. शंकरराव उरसळ, स्‍व. अण्णासाहेब वाघीरे, स्‍व. अण्णासाहेब मगर ही मातब्बर मंडळी येऊन मिळावी व त्‍यांनी संस्‍थेचे कार्य पुढे नेण्यास स्‍व. बाबुरावजी घोलपसाहेब यांना अत्‍यंत मोलाची साथ दिली.

बहुजन हिताय|बहुजन सुखाय||, हे संस्थेचे ब्रीद वाक्य या ध्येय वाक्यास अनुसरून ग्रामीण भागातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी संस्थेने गावठी (व्हॉलंटरी) शाळा सुरू केल्या. सन 1941 ते 1955 सालापर्यंत पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात एकूण 379 व्हॉलंटरी शाळा संस्थेमार्फत चालविल्या जात होत्या. विशेषत: दुर्गम,डोंगरी, पावसाळी व जेथे शिक्षण मिळत नव्हते अशा ठिकाणी या शाळांचे कार्य चालू होते. कोळगांव डोळस ता.शिरूर या ठिकाणी पहिली व्हॉलंटरी शाळा सुरू झाली. यावरून स्व.घोलपसाहेब यांची बहुजन समाजाच्या शिक्षणाबाबतची दूरदृष्टी व चिकाटी, जिद्‌द दिसून येते. पुढे या शाळा लोकल बोर्डाने ताब्यात घेतल्यानंतर संस्थेने सन 1956 साली नसरापूर ता.भोर या ठिकाणी पहिली माध्यमिक शाळा सुरू करून शैक्षणिक कार्य चालू ठेवले.

संस्था पदाधिकारी कार्यकाळ
अध्यक्ष
अ. नं. नाव कार्यकाळ
1 कै. अण्णासाहेब आवटे 07/09/1941 ते 23/05/1959
2 कै. शंकरराव भेलके 24/05/1959 ते 09/10/1965
3 कै. मामासाहेब मोहोळ 10/10/1965 ते 06/12/1982
4 कै. मामासाहेब पिंगळे 07/12/1982 ते 30/12/1983
5 कै. रामकृष्ण मोरे 30/12/1983 ते 02/11/2003
6 मा. अशोकराव मोहोळ 04/12/2003 ते 27/09/2006
7 मा. ना. अजितदादा पवार 28/09/2006 पासून

उपाध्यक्ष
1 कै. मामासाहेब मोहोळ 24/05/1959 ते 09/10/1965
2 कै. शंकरराव भेलेके 10/10/1965 ते 28/09/1973
3 कै. हरीभाऊ वाघीरे 29/09/1973 ते 23/05/1982
4 कै. मामासाहेब पिंगळे 21/06/1982 ते 24/01/1987
5 कै. राजीवशेठ साबळे 07/01/1988 ते 03/03/1995
6 मा. नितीनशेठ साबळे 07/04/1995 ते 28/07/2004
7 मा. नारायणराव तापकीर 29/07/2004 ते 27/09/2006
8 मा. नितीनशेठ साबळे 28/09/2006 पासून

मानद सचिव
1 कै. बाबुरावजी घोलप 07/09/1941 ते 26/05/1982
2 कै. शंकरराव उरसळ 21/06/1982 ते 21/12/1986
3 कै. मामासाहेब पिंगळे 24/01/1987 ते 19/08/1998
4 मा. नारायणराव तापकीर 12/09/1998 ते 28/07/2004
5 मा. सतिशराव उरसळ 29/07/2004 पासून

खजिनदार
1 कै. बाबुरावजी घोलप 07/09/1941 ते 09/10/1965
2 कै. शंकरराव उरसळ 10/10/1965 ते 20/06/1982
3 कै. कृ. वि. बांदल 21/06/1982 ते 06/04/1995
4 मा. स. न. बागडे 07/04/1995 ते 28/02/1998
5 मा. रा. वि. चव्हाण 01/03/1998 ते 01/04/2003
6 मा. सतिशराव उरसळ 03/05/2003 ते 28/07/2004
7 कै. अरविंदराव भेलके 29/07/2004 ते 27/09/2006
8 मा. ऍड. मोहनराव देशमुख 28/09/2006 पासून

उपसचिव
1 कै. शामराव जगताप 01/06/1965 ते 16/05/1996
2 मा. के. के. निकम 20/06/1996 ते 28/07/2004
3 मा. ल. म. पवार 29/07/2004 ते 29/09/2006
4 मा. जे. म. डुंबरे 29/07/2004 ते 29/09/2006
5 मा. के .के .निकम 28/09/2006 ते 23/11/2009
6 मा. ल. म. पवार 05/01/2010 पासून

सहाय्यक उपसचिव
1 मा. के. के. निकम 1993 ते 19/06/1996
2 मा. डी. बी. गाढवे 28/09/2006 पासून

15/08/2012
05/03/2011

Address

Pirangut, Tal-Mulshi , Dist-pune
Pirangut
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pirangut English School & JR.College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pirangut English School & JR.College:

Shortcuts

Share