25/02/2022
𝑷𝒂𝒓𝒆𝒏𝒕𝒊𝒏𝒈 𝒕𝒊𝒑𝒔 𝒇𝒓𝒐𝒎 𝒉𝒐𝒏𝒐𝒓𝒂𝒃𝒍𝒆 𝑴𝒓𝒔. 𝑺𝒖𝒅𝒉𝒂 𝑴𝒖𝒓𝒕𝒚:
1. It is very important to be able to combine modernity and tradition in raising children.
2. Don't force your decisions or sayings on children, leave them free to make their own decisions, preferences. Of course, it is your job to discover what that is and to bring it about.
3. Letting children make some decisions is very important for their development. But since they are small, we are afraid to let them decide. Allowing children to make decisions and the consequences of those decisions will help them to develop thinking skills and improve their decision-making ability gradually.
4. Children learn many things from observation. So it doesn't happen by telling them to do something or by following them. For that, we have to do the same in front of them. For example, children are quick to say anything.
5. No matter how much money you have, your living, home, food and drink should always be simple. So, parents, keep it simple and make it a habit for your children.
6. If you want to develop children's imagination, ask them to share their ideas.
--------------------------------------------------------------------------
१. मुलांना वाढवताना आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा मेळ साधता येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
२. आपले निर्णय किंवा म्हणणे मुलांवर लादू नका, तर त्यांना त्यांचे निर्णय, आवडी-निवडी याबाबत थोडे मोकळे सोडा. त्यातील फायदे-तोटे समजावून सांगणे पालक म्हणून नक्कीच आपले काम आहे, पण एखादी गोष्ट त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे.
३. काही निर्णय मुलांचे मुलांना घेऊ देणे ही त्यांचा विकास होण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पण ते लहान आहेत म्हणून आपण त्यांना निर्णय घेऊ द्यायला घाबरतो. मुलांना निर्णय घेऊ दिल्याने आणि त्या निर्णयाच्या परिणामांमुळे त्यांची विचारशक्ती वाढते आणि निर्णयक्षमता हळूहळू सुधारते.
४. मुले निरीक्षणातून अनेक गोष्टी शिकत असतात. तेव्हा एखादी गोष्ट त्यांना कराच असे सांगून किंवा मागे लागून ती होत नाही. त्यासाठी आपल्यालाही त्यांच्यासमोर तसे वागावे लागते. उदाहरण समोर ठेवले तर मुलांना कोणतेही म्हणणे लवकर पटते.
५. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी आपली राहणी, घर, खाणे-पिणे हे कायम साधे असायला हवे. त्यामुळे पालकांनो तुम्हीही साधे राहा आणि मुलांनाही तशाच सवयी लावा.
६. मुलांची कल्पनाशक्ती डेव्हलप करायची असेल तर त्यांना त्यांच्या डोक्यात असलेल्या आयडीया शेअर करायला सांगा.