12/12/2022
जिल्हास्तरीय 200 मीटर धावणे स्पर्धेत महाविद्यालयाची शेख नाझमीन हिने प्रथम क्रमांक पटकावून औरंगाबाद विभागावर परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाल्या बद्दल हशीप्र चे अध्यक्ष परमेश्वर रावजी कदम साहेब, प्राचार्य डॉ वसंत सातपुते,प्राचार्या डॉ शेख मॅडम, डॉ मुकुंदराज पाटील,डॉ गोविंद वाकणकर, डॉ संतोष रनखांब,मार्गदर्शक प्रा कैलास आरबाड सर्वानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
06/12/2022
विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान
जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी
भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
💐🌸
01/05/2022
आमच्या महाविद्यालयातील कु. प्रगती किंचकराव आचार्य व कु.प्रतिक्षा बालाजीराव घोडके या दोन विद्यार्थिनी चा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित झाल्यामुळे त्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर रावजी कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
11/04/2022
कै रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष मा परमेश्वररावजी कदम साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे प्राचार्या डॉ कुलकर्णी मॅडम प्राचार्या डॉ शेख मॅडम,समन्वयक डॉ मुकुंदराज पाटील व सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.