14/08/2025
🌿🌧️ *वर्षा सहल -2025* 🌧️🌿
*6वी ते10 वी फाउंडेशन विभागाची वर्षा सहल यशस्वीपणे संपन्न.* 🌧️🪴🍀☘️🌿🍃🌧️🌨️💧💦🫧 🎉
*ज्ञानसाधना प्रतिष्ठान, धर्मापुरी* अंतर्गत 6वी ते 10वी फाउंडेशन विभागाची *वर्षा सहल-2025* चे आयोजन आज दिनांक *14 ऑगस्ट 2025* वार गुरुवार रोजी माननीय अध्यक्ष *प्रा. किरण सोनटक्के सर* व माननीय सचिव *सौ. शितल सोनटक्के मॅडम* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या सहलीमध्ये वर्ग सहावी ते दहावी फाउंडेशन विभागाचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी येथून सकाळी ठीक साडेसहा वाजता सहलीचे इंद्रायणी देवी माळ मांडाखळीकडे प्रस्थान झाले.
सहलीसाठी एकूण पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी गाण्याच्या भेंड्या, डान्स, गीत गायन अशा पद्धतीने विविध प्रकारे मनसोक्त आनंद घेतला .
इंद्रायणी देवीच्या पायथ्यापासून डोंगरकडा सर करत निसर्गरम्य वातावरणातून इंद्रायणी देवीच्या मंदिर परिसरात सर्वांनी प्रवेश केला.
सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी इंद्रायणी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत मक्याचे कणीस, तसेच मसाला खिचडी व चहा इत्यादींची छान व्यवस्था करण्यात आली होती.
सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. नंतर विद्यार्थ्यांनी ग्रुप नुसार आपापल्या मार्गदर्शक शिक्षकासोबत संपूर्ण इंद्रायणी माळ परिसर प्रत्यक्ष क्षेत्रभेट म्हणून अनुभवला.तसेच या परिसरात हरीण, मोर, काळवीट यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सर्व विद्यार्थ्यांचे ग्रुप फोटो व व्हिडिओ घेण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के सर व संस्थेच्या सचिव प्रा. सौ. शितल सोनटक्के मॅडम यांनी आगमन करताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला.
संस्थेच्या सचिव प्राचार्य सौ. शितल सोनटक्के मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सहल का आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात जसं सणांचे महत्त्व असतं तसं शालेय जीवनामध्ये क्षेत्र भेटीला महत्त्व असते व ती क्षेत्रभेट घडवून आणण्याकरता सहल महत्त्वाची असते. व सहलीतून आपल्याला आनंद प्राप्त होते याबद्दल मार्गदर्शन केले. प्राध्यापक किरण सोनटक्के सरांनी इंद्रायणी माळ इंद्रायणी देवी बद्दल ऐतिहासिक माहिती दिली व नैसर्गिक घटक जसे हवा,पाणी, जमीन, पशुपक्षी, प्राणी मानवी जीवनात किती महत्त्वाचे आहेत याबद्दल मार्गदर्शन केले व निसर्गावर प्रेम करण्यास प्रोत्साहन केले.
यानंतर येताना मांडाखळी येथील आपल्या इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच संताई कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. श्री. डाढाळे सर यांनी मुलांना या शैक्षणिक संकुलाची संपूर्ण माहिती व ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा परिसर पाहिला.
वर्षा सहलीत सर्व शिक्षक ,अधीक्षक, अधीक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहलीत आपला सहभाग नोंदवला.
या सहलीसाठी समन्वयक श्री. आर. जी. पोले सर, श्री. परडे सर,श्री. कनकापुरे सर, श्री. विजयकुमार पवार सर तसेच मांडाखळीचे श्री. अर्जुन कणे भाऊ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
सहलीतून विद्यार्थ्यांना एक वेगळा अविस्मरणीय अनुभव मिळाला.
वर्षा सहल यशस्वी करण्यासाठी वर्ग 6 वी ते 10 वी फाउंडेशन विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व सहल आनंदमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.
🌲🌱🌿☘️🌳🌷🌴🌳🌵🌧️🌺