श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. कला व वाणिज्य शाखा

  • Home
  • India
  • Osmanabad
  • श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. कला व वाणिज्य शाखा

श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. कला व वाणिज्य शाखा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. कला व वाणिज्य शाखा, Education, तांबरी विभाग, धाराशिव https://maps. app. goo. gl/mcPhCwq2H218RXoq8?g_st=ac, Osmanabad.

जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीपतराव भोसले विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या यशाच्या प्रकाशित बातम्या.सर्व...
26/08/2026

जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीपतराव भोसले विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या यशाच्या प्रकाशित बातम्या.
सर्व वृत्तपत्र समूहांचे मनापासून आभार.🙏

जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीपतराव भोसले विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यशधाराशिव : स्वर्गीय माजी मुख्य...
26/08/2026

जलसंधारण दिनानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीपतराव भोसले विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

धाराशिव : स्वर्गीय माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे "पाणी अडवा, पाणी जिरवा" या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. अनुजा काकासाहेब मस्के हिने तीन किलोमीटर चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, तर सानिया फुलारी हिने याच स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, कला विभाग प्रमुख कैलास कोरके आणि पर्यवेक्षक कुमार निकम यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, सीईओ आदित्य पाटील, उपप्राचार्य संतोष घार्गे, पर्यवेक्षक मोहनराव शिंदे यांनी कौतुक केले.

गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनधाराशिव : आदर्श श...
26/08/2026

गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

धाराशिव : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक प्रेरणास्थान गुरुवर्य कै. के. टी. पाटील (बप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता, तर अंतिम फेरी शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (जुनी इमारत), धाराशिव येथे होणार आहे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९.३० वाजेपर्यंत उपस्थित राहून नावनोंदणी निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता ११ वी व १२ वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. यावर्षी स्पर्धेसाठी "धाराशिवच्या शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार आणि त्यांचे योगदान : कै. गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा)", "सोशल मीडिया : जोडलेलं जग व हरवलेली नाती", "पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास : आजची गरज, उद्याची जबाबदारी", "डिजिटल युग आणि सायबर सुरक्षेचे आव्हान" तसेच "नैतिक मूल्ये, संस्कार आणि आजचा आधुनिक समाज" हे विषय निश्चित करण्यात आले असून, स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर आपले प्रभावी वक्तृत्व सादर करावयाचे आहे. या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, अभिव्यक्ती कौशल्य आणि सामाजिक जाणीवा अधिक समृद्ध करण्याचा उद्देश आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रु. १५,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ११,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. ७,००० अशी रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी रु. २,००० व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. डी. व्ही. जाधव (८६६८५८९१६१), प्रा. डी. वाय. घोडके (९८५००००७९२), प्रा. सचिन तेली (९१७५८०४१५०), प्रा. प्रसाद माशाळकर (७५८८९३६६३७), प्रा. सौ. एल. टी. भोसले (७०२८३५८२९९) तसेच प्रा. सौ. ए. बी. तुंगीकर (७३५०९५७४४५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

17/08/2026

#वंदे_मातरम..
स्वातंत्र्यदिनी श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात संगीत शिक्षक महेश पाटील सर यांनी संपूर्ण वंदे मातरम गीताचे अत्यंत सुरेख गायन केले.

माझी शाळा.. माझा अभिमान..

श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे 'राष्ट्रीय सेवा योजना' युनिटचे उद्घाटन.. प्रकाशित बातम्या.सर्व वृत्तपत्र समूहांचे मनाप...
16/08/2026

श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे 'राष्ट्रीय सेवा योजना' युनिटचे उद्घाटन.. प्रकाशित बातम्या.
सर्व वृत्तपत्र समूहांचे मनापासून आभार.🙏

श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे उद्घाटन उत्साहात संपन्नआदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श...
16/08/2026

श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे उद्घाटन उत्साहात संपन्न

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, कला-वाणिज्य विभागप्रमुख कैलास कोरके, कार्यक्रमाधिकारी डी. वाय. घोडके, सहकार्यक्रमाधिकारी शरद पाटील, प्रा. दत्तात्रय जाधव व सौ. एम. एस. वाडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका गाडे रूपाली व शेख रुबीना यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डी. वाय. घोडके यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

यानंतर प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मौलिक विचार मांडत सामाजिक बांधिलकी, शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कला-वाणिज्य विभागप्रमुख कैलास कोरके यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील इतिहास विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर उभा करत देशभक्ती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. उपप्राचार्य संतोष घार्गे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील आपल्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांसमोर सांगत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विज्ञान पर्यवेक्षक मोहन शिंदे यांनी रासेयोच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. दत्तात्रय जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या समारंभासाठी सर्व शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

या समारंभासाठी संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, सीईओ आदित्य पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुळाताई पाटील यांचे सहकार्य लाभले.

🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान… तिरंग्याला सलाम आणि राष्ट्रप्रेमाची नवी ऊर्जा!आज धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे स...
16/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान… तिरंग्याला सलाम आणि राष्ट्रप्रेमाची नवी ऊर्जा!

आज धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिमानाने ध्वजारोहण केले.

तिरंग्याला सलाम करताना आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण झाले. त्यांच्या त्यागामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य जपणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे.

यावेळी शाळेच्या प्रांगणातील गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या कार्याला नमन केले. आपल्या संस्कारांची आणि मूल्यांची ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, देशभक्तीने भारलेले वातावरण आणि तिरंग्याच्या साक्षीने घुमणारा राष्ट्रगीताचा स्वर यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारून गेला.

हा तिरंगा आपल्या स्वाभिमानाचा…
हे स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या त्यागाचा…
आणि देशाची प्रगती ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी! 🇮🇳

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन #ध्वजारोहण #धाराशिव #देशभक्ती

भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायु होवो..!!स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कोटी - कोटी शुभेच्छा...!!!                         *!...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायु होवो..!!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कोटी - कोटी शुभेच्छा...!!!

*!!..जय हिंद..!!*

Address

तांबरी विभाग, धाराशिव Https://maps. App. Goo. Gl/mcPhCwq2H218RXoq8?g_st=ac
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 7:15am - 5:30pm
Tuesday 7:15am - 5:30pm
Wednesday 7:15am - 5:30pm
Thursday 7:15am - 5:30pm
Friday 7:15am - 5:30pm
Saturday 7:15am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. कला व वाणिज्य शाखा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category