10/05/2025
"आर्टीफिशीयल इंटीलीजन्स "
अर्थात "आंबेडकराईट्स इंटिलीजन्स "
✨💐
✨✨
AI संबंधित विविध कोर्सेस ची माहिती देणारे #पाचवे #सेमिनार #नवीन_पनवेल येथे संपन्न झाले...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" यामुळे आपल्या समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवले आहे. शिक्षण हाच प्रगतीचा राजमार्ग आहे, आणि आजच्या तंत्रयुगात इंडस्ट्रिमध्ये मोठे बदल झाल्यामुळे , #जेन_ए_आइ, #डिझाईन_थिंकींग , #मशीन_लर्निंग, #साईबर_सेक्युरिटी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये उपयोगात येणारे तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे आवश्यक झाले आहे. मात्र, अनेक हुशार आणि गरजु विद्यार्थी , आर्थिक अडचणीमुळे या संधीपासून दूर राहतात. #मेत्ता_ग्लोबल_फाउंडेशन या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण घेऊन येत आहे.
बाबासाहेबांचे समतेच्या तत्वावर आधारलेले हे अभियान, आर्थिक अडचणीमुळे मागे राहणाऱ्या विद्यार्थीयांना तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी म्हणजेच ए आय : "आर्टीफिशीयल इंटीलीजन्स " च्या शिक्षणासाठी कमी खर्चात वा स्कॅालरशिपच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
गरजू पण इच्छाशक्ती असलेल्या विद्यार्थीयांना
आर्थिक पाठबळ, मार्गदर्शन आणि आवश्यक
संसाधने पुरवून त्यांचे स्वप्न साकार करण्याचा हा प्रयत्नआहे. हे अभियान केवळ शिक्षण देण्यासाठीच नाही, तर ही एक जबाबदारी, एक सामाजिक चळवळ आहे. आम्हाला बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या करूणेच्या तत्वावर आधारित शिक्षण द्यायचे आहे – जेथे ज्ञान केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजाच्या उन्नतीसाठी वापरले जाईल.
तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या भविष्याची , चांगल्या समाजाची उभारणी करूया !! तरूणांना ज्ञान, कौशल्य आणि संधी देऊन देशाच्या प्रगतीसाठी उभे करूया..
#चला_एकत्र_येऊन_आपल्या_समाजाचा_विकास_घडवूया_आणि_भविष्यातील_तंत्रज्ञान_क्रांतीत_तरूणांचे_योगदानवाढवूया... ✨✨
म्हणजेच #आंबेडकराइट्स_इंटीलिजन्स ✨✨
विशेष आभार :
ॉ_हर्षदीप_कांबळे_सर IAS [ प्रधान सचिव- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य ]
िखिल_मेश्राम_सर IRS [ जी एस टी, कमिशनर, दमण ]
#मेत्ता_ग्लोबल_फाउंडेशन