MPSC Quiz

MPSC Quiz

Share

MPSC, Mumbai Page is for Educational Purpose Only. It is Maintained by Aspirant. Visit Us http://mpsc-mumbai.blogspot.in/ & http://mahaonlin.blogspot.in

आमच्या सर्व सेवा विद्यार्थी केंद्रित असून त्या नेहमीच मोफत होत्या, आहेत आणि राहतील. आम्ही कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यांकडून कसलाही मोबदला आकारात नाहीत.फक्त विद्यार्थी हित ध्यानात घेवून एकत्र आलेल्या काही तज्ञांचा आम्ही समूह आहोत.

तुमच्या अधिकाधिक मित्र-मैत्रिणींना ह्या पेज विषयी सांगा , फेसबुक व इतर सोशल मिडीयाचा आधार घेत त्यांच्या पर्यंत आम्हाला पोहचवण्यासाठी मदत करा. आमच्या पेजवर वाढणारा प्

22/11/2017

गोविंदभाई श्रॉफ - (जुलै २४, १९११ - नोव्हेंबर २१, २००२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात.

22/11/2017

२२ नोव्हेंबर दिनविशेष

# ठळक घटना/घडामोडी:
४९८ : पोप अनास्तासियस दुसर्‍याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.
८४५ : ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रँकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.
१७१८ : रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.
१८३० : चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१८५८ : डेन्व्हर, कॉलोराडो शहराची स्थापना.
१९२२ : हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.
१९३५ : चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.
१९४२ : दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई : जनरल फ्रीडरिश पॉलसने अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.
१९४३ : दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
१९४३ : लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६३ : डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.
१९७५ : फ्रांसिस्को फ्रँकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.
१९७७ : ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
१९८८ : पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ विमानाचे अनावरण.
१९८९ : वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.
१९९८ : आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
२००२ : नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
२००५ : एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.

# जन्म/वाढदिवस:
२७० : रोमन सम्राट मॅक्सिमिनस
१६४३ : रॉबर्ट कॅव्हेलिये दि ला साल, फ्रेंच शोधक.
१७१० : विल्हेल्म फ्रीडमन बाख, जर्मन संगीतकार.
१७२२ : ह्रिहोरी स्कोवोरोदा, युक्रेनियन कवी.
१८०८ : थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.
१८१९ : जॉर्ज इलियट, इंग्लिश लेखक.
१८६८ : जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१८६९ : आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
१८७७ : एंद्रे ऍडी, हंगेरियन कवी.
१८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी, ‘धर्मरहस्य’कार.
१८९० : चार्ल्स दि गॉल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष.
१८९८ : वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.
१८९९ : होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.
१९०१ : होआकिन रोद्रिगो, स्पॅनिश संगीतकार.
१९०४ : लुई युजिन फेलिक्स नेइल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
१९१३ : बेंजामिन ब्रिटन, ब्रिटिश संगीतकार.
१९१४ : पीटर टाउनसेंड, ब्रिटिश वैमानिक.
१९२१ : रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
१९३९ : मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
१९४३ : बिली जीन किंग, अमेरिकन टेनिस खेळाडू.
१९६३ : जॉन एफ. केनेडी, अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष
१९६७ : बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.
१९७० : मार्व्हन अटापट्टू, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९२१ : स्कार्लेट योहान्सन, अमेरिकन अभिनेत्री.
१९८८ : सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.

# मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन:
२००२ : गोविंदभाई श्रॉफ, हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अध्वर्यू.

20/09/2017

२० सप्टेंबर दिनविशेष

* जागतिक दिवस:
राष्ट्रीय युवक दिन : थायलंड

* ठळक घटना/घडामोडी:
११८७ : सलाद्दीनने जेरुसलेमला वेढा घातला.
१६३३ : पृथ्वीसूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवरर खटला चालवण्यात आला.
१६९७ : रीसवीकचा तह.
१७३७ : वॉकिंग परचेस - लेनापे-डेलावेर लोकांची १२ लाख एकर जागा पेनसिल्व्हेनिया वसाहतीला देण्यात आली.
१८५४ : अल्माची लढाई - फ्रांस आणि ब्रिटिश सैन्यांनी रशियाला हरवले.
१८५७ : १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - ब्रिटिश फौजेने दिल्ली परत घेतले.
१८८१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
१९४२ : ज्यूंचे शिरकाण - जर्मन एस.एस.ने ३,००० ज्यूंची कत्तल केली.
१९७० : सिरियाने जॉर्डनवर चाल केली.
१९७६ : टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान तुर्कस्तानच्या टॉरस माउंटनमध्ये कोसळले. १५५ ठार.
१९७७ : व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
१९७९ : मध्य आफ्रिकेच्या साम्राज्यात लश्करी उठाव. सम्राट बोकासा पहिला पदच्युत.
१९८४ : बैरुतच्या अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. २२ ठार.
१९९० : दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
२००१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने दहशतीविरुद्ध युद्ध पुकारले.
२००४ : एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

* जन्म/वाढदिवस:
१८५३ : राम पाचवा तथा चुलालोंगकोर्ण, थायलंडचा राजा.
१८५४ : नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .
१८६१ : वॉल्टर ग्रिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९७ : नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
१९२१ : पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९२२ : द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
१९२५ : राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.
१९३४ : सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री.
१९५१ : स्टीवन ब्रूक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९४४ : रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६३ : अनिल दलपत, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९६८ : इजाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९७३ : नवीद नवाझ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

* मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन:
१३८४ : लुई पहिला, नेपल्सचा राजा.
१९३३ : ऍनी बेझंट, ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका.
१९९६ : दया पवार, मराठी साहित्यिक.
१९७९ : लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.

19/09/2017

१९ सप्टेंबर दिनविशेष

* जागतिक दिवस:
सेना दिन : चिली.
स्त्री मतदान हक्क दिन : न्यू झीलँड.
स्वातंत्र्य दिन : सेंट किट्स आणि नेव्हिस.

* ठळक घटना/घडामोडी:
१८९३ : न्यू झीलँडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९४४ : सोवियेत संघ आणि फिनलंडमध्ये संधी.
१९५२ : इंग्लंडला गेलेल्या चार्ली चॅप्लिनला अमेरिकेने परतण्यास मुभा नाकारली.
१९५७ : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९५९ : अमेरिकेने निकिता ख्रुश्चेव्हला डिस्नीलँड बघण्यास मनाई केली.
१९७६ : तुर्कस्तानचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान देशाच्या दक्षिण भागात डोंगरांत कोसळले. १३५ ठार.
१९८३ : सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य.
१९८५ : मेक्सिको सिटीमध्ये भूकंप. ४०० इमारती कोसळल्या, हजारो मृत्युमुखी.
१९८९ : यु.टी.ए. फ्लाइट ७७२ या विमानात दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा विमान नायजरवर असताना स्फोट. १७१ ठार.
२००७ : ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

* जन्म/वाढदिवस:
८६ : अँटोनियस पायस, रोमन सम्राट.
८६६ : लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट.
१५५१ : तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
१८६७ : पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
१९११ : सर विल्यम गोल्डिंग, नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश लेखक.
१९२७ : डिक वेस्टकॉट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९५३ : वेन क्लार्क, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७४ : नईमुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

* मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन:
१३३९ : गो-दाइगो, जपानी सम्राट.
१७१० : ओले र्‍यॉमर (Ole Rømer), डॅनिश खगोलशास्त्रज्ञ.
१८८१ : जेम्स गारफील्ड, अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष.
१९३५ : कॉन्स्टान्टीन त्सियाल्कोव्स्की, रशियन रॉकेटशास्त्रज्ञ.
१९३६ : पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.
१९८७ : आयनार गेर्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
२००१ : अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
२००२ : प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
२००७ : दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.

12/09/2017

सवाई गंधर्व -

रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व) हे हिदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर होते.

रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊंनी एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली.

* ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक:
व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते, त्यांना कसा वाव देते व मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांच्या शिष्यपरंपरेतील गायक/गायिकाच नव्हे तर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हानगल वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

12/09/2017

१२ सप्टेंबर दिनविशेष -

* जागतिक दिवस:
राष्ट्रीय दिन : केप व्हर्दे.
राष्ट्रीय क्रांती दिन : इथियोपिया.

* ठळक घटना/घडामोडी:
४९० : मॅरेथॉनची लढाई - अथेन्सने पर्शियाला हरवले.
१६८३ : व्हियेनाची लढाई - ऑस्ट्रिया व इतर युरोपीय देशांनी ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव केला.
१८४७ : मेक्सिकन अमेरिकन युद्ध - दल बदलून मेक्सिकोतर्फे लढणार्‍या अमेरिकन सैनिकांना जनरल विनफील्ड स्कॉटने फाशी दिली.
१८५७ : कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेउन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज केप हॅट्टेरास पासून १६० मैलावर बुडाले. सोन्यासह ४२६ प्रवाशांना जलसमाधी.
१८९० : सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
१९३० : विल्फ्रेड र्‍होड्सने आपल्या १,११०व्या व शेवटच्या प्रथमवर्गीय क्रिकेट सामन्यात ९५ धावा देऊन ५ बळी घेतले.
१९३८ : एडोल्फ हिटलरने चेकोस्लोव्हेकियाच्या सुडेटेनलँडमधील जर्मन व्यक्तींना स्वतंत्र करण्याची मागणी केली.
१९४० : केनव्हिल, न्यू जर्सी येथे कारखान्यातील स्फोटात ५१ ठार, २०० जखमी.
१९४२ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुड्यांनी दोस्त राष्ट्रांचे सैनिक, नागरिक व इटालियन युद्धबंद्यांना घेउन जाणाऱ्या आर.एम.एस. लॅकोनिया जहाजाला बुडवले.
१९४३ : ऍब्रुझी येथे पकडून ठेवलेल्या इटलीच्या हुकुमशहा बेनितो मुसोलिनीला जर्मनीच्या कमांडोंनी सोडवून नेले.
१९४८ : आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले.
१९७४ : इथियोपियाच्या सम्राट हेल सिलासीची लश्करी उठावात उचलबांगडी.
१९७९ : इंडोनेशियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेचा भूकंप.
१९८० : तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
१९८३ : लोस मशेतेरोस या टोळीने हार्टफर्ड, कनेक्टिकटमधील बँकेतून ७० लाख अमेरिकन डॉलर पळवले.
१९९२ : शायनिंग पाथचा म्होरक्या ऍबिमेल गुझमान पकडला गेला.
१९९४ : फ्रँक युजीन कॉर्डरने सेसना १५० प्रकारचे विमान व्हाइट हाउसवर घातले.
२००२ : 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
२००३ : पॅन ऍम फ्लाइट १०३वर केलेल्या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने लिब्यावरचे आर्थिक निर्बंध संयुक्त राष्ट्रांनी काढले.
२००५ : डिझनीलँड हाँगकाँग खुले.
२०१२ : दहशतवाद्यांनी लिब्यातील बेंगाझी आणि इजिप्तमधील कैरो शहरांतील अमेरिकन वकीलातींवर हल्ला चढवून वकीलाती नष्ट केल्या लिब्यातील अमेरिकन राजदूत जॉन क्रिस्टोफर स्टीवन्ससह तीन मृत्युमुखी.
२०१२ : पाकिस्तानच्या कराची शहरातील कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २८९ ठार.

* जन्म/वाढदिवस:
१४९२ : लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.
१४९४ : फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
१५७५ : हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
१९१३ : जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू.
१९३२ : वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९३७ : वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९४८ : मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७७ : नेथन ब्रॅकेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

* मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन:
१२१३ : पीटर दुसरा, अरागॉनचा राजा.
१३६२ : पोप इनोसंट सहावा.
१६१२ : व्हासिली चौथा, रशियाचा झार.
१६८३ : अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
१९१८ : जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
१९५२ : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
१९८० : सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
१९९२ : पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
१९९३ : रेमंड बर, अमेरिकन अभिनेता.
१९९६ : श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
२००३ : जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार, गायक.

04/09/2017

वि.स. खांडेकर

* पूर्वायुष्य:
वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता खांडेकरांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.

त्यांच्या कथा-कादंबर्‍यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

* व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य
इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

* खांडेकरलिखित पुस्तके
अजून येतो वासफुलांना
अमृतवेल
अविनाश
अश्रू
अश्रू आणि हास्य
आगरकर : व्यकी आणि विचार
उल्का (१९३४)
उःशाप
कल्पलता
कांचनमृग ( १९३१ )
कालची स्वप्ने
कालिका
क्रौंचवध ( १९४२ )
घरटे
घरट्याबाहेर
चंदेरी स्वप्ने
चांदण्यात
जळलेला मोहर ( १९४७ )
जीवनशिल्पी
झिमझिम
तिसरा प्रहर
तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३
ते दिवस, ती माणसे
दंवबिंदू
दोन ध्रुव ( १९३४ )
दोन मने ( १९३८ )
धुके
नवा प्रातःकाल
पहिली लाट
पहिले पान
पहिले प्रेम (१९४०)
पाकळ्या
पांढरे ढग (१९४९)
पारिजात भाग १, २
पाषाणपूजा
पूजन
फुले आणि काटे
फुले आणि दगड
मंजिर्‍या
मंझधार
मंदाकिनी
मध्यरात्र
मृगजळातील कळ्या
ययाति
रंग आणि गंध
रिकामा देव्हारा (१९३९)
रेखा आणि रंग
वामन मल्हार जोशी: व्यक्ति-विचार
वायुलहरी
वासंतिका
विद्युत्‌ प्रकाश
वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८ )
समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
समाधीवरील फुले
सहा भाषणे
सांजवात
साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
सुखाचा शोध
सुवर्णकण
सूर्यकमळे
सोनेरी स्वप्ने भंगलेली
स्त्री आणि पुरुष
हिरवळ
हिरवा चाफा ( १९३८ )
हृदयाची हाक ( १९३०)
क्षितिजस्पर्श

* पुरस्कार आणि सन्मान
वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)
पद्मभूषण पुरस्कार (१९६८)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली.

04/09/2017

२ सप्टेंबर दिनविशेष:

* जन्म/वाढदिवस:
१७७८ : लुई बोनापार्टे, हॉलंडचा राजा.
१८३८ : लिलिउओकलानी, हवाईची राणी.
१८५३ : विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
१८७७ : फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
१८८६ : श्रीपाद महादेव माटे, मराठी साहित्यिक.
१९२४ : डॅनियेल अराप मुआ, केन्याचा राष्ट्राध्यक्ष.
१९४८ : क्रिस्टा मॅकऑलिफ, अमेरिकेची अंतराळवीर.
१९५२ : जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
१९५३ : अहमद शाह मसूद, अफगाणिस्तानचा म्होरक्या.
१९६४ : किआनू रीव्ह्स, कॅनडाचा अभिनेता.
१९६६ : सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
१९८१ : क्रिस ट्रेमलेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९८८ : इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

* मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन:
४९० : फेइडिप्पाइड्स, पर्शियाविरुद्ध ग्रीसच्या विजयाची वार्ता सांगण्यासाठी मॅरेथॉनपासून अथेन्सला ४० किमी धावत गेलेला सैनिक.
४२१ : कॉन्स्टान्शियस तिसरा, रोमन सम्राट.
१३९७ : फ्रांसेस्को लांडिनी, इटालियन संगीतकार.
१५४० : दावित तिसरा, इथियोपियाचा सम्राट.
१८२० : ज्यांगकिंग, चिनी सम्राट.
१८६५ : विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
१८९६ : नॅट थॉमसन, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू.
१९२१ : अँथोनी फ्रांसिस लुकास, अमेरिकन उद्योगपती.
१९३७ : पिएर दि कूबर्तिन, अर्वाचीन ऑलिम्पिक खेळांचा जनक.
१९६४ : फ्रांसिस्को क्रॅव्हेरो लोपेस, पोर्तुगालचा १३वा राष्ट्राध्यक्ष.
१९६९ : हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
१९७३ : जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
१९७६ : वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक.
१९७८ : फ्रेड जी. मायर, अमेरिकन उद्योगपती.
१९९६ : पॅडी क्लिफ्ट, झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू.
२००९ : वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
२०११ : श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.

02/02/2017

२ फेब्रुवारी दिनविशेष

* जागतिक दिवस
ग्राउंडहॉग दिन : अमेरिका

* ठळक घटना, घडामोडी
१६५३ : अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
१९५७ : सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्‍याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.

* जन्म, वाढदिवस
१८८४ : श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.
१९७७ : शकिरा, प्रसिद्ध स्पॅनिश वंशाची कोलंबियन गायिका.

* मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
१९०७ : दिमित्री मेंडेलीव, मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे संशोधक.
१९१७ : महर्षी अण्णासाहेब पटवर्धन.
२००७ : विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.

01/02/2017

चालू घडामोडी

१. "नागालँड हेल्थ प्रोजेक्ट"साठी जागतिक बँकेने किती कर्ज रक्कमेला मंजुरी दिली आहे?
उत्तर - ४८ दशलक्ष डॉलर्स, भारत सरकारने नुकतेच नागालैंड हेल्थ प्रोजेक्टसाठी जागतिक बँकेसोबत ४८ दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली आहे? ह्या प्रकल्पा अंतर्गत नागालैंडमधील ६ लाख लोकांना फायदा होणार आहे. नागालैंडमधील लोकांचा स्वास्थ दर्जा उंचविणे हा ह्या प्रकल्पाच्या मुख्य हेतू आहे. हा प्रकल्प ३१ मार्च २०२३ रोजी पर्यंत चालू असेल.

२. इंटरनॅशनल मॉनेट्री फण्डच्या "वर्ल्ड इकॉनोमिक आउटलुक"अहवालानुसार भारताचा २०१७ मधील जीडीपी दर काय असेल?
उत्तर - ६.६%, आईएमफच्या वर्ल्ड इकॉनोमिक आउटलुक अहवालानुसार भारताचा २०१७ चा जीडीपी दर ६.६% असेल जो आधी ७.६% होता. मोदी सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे हा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे ह्या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये भारताचा जीडीपी ७.२% असेल तर २०१८-१९ मध्ये ७.७% असेल.

३. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे?
उत्तर - गुजरात, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरामधील अहमदाबादमधील मोटेरामध्ये बांधण्यात येणार असून ह्या स्टेडियमची बैठक क्षमता १.१ लाख लोकांची असेल. पॉपुलॉस कंपनीने ह्या स्टेडियमचे डिजाइन बनविले असून लार्सेन एंड टूब्रो हे स्टेडियम ७०० कोटी ख़र्च करुण बांधणार आहे. जुने मोटेरा स्टेडियम पाडून त्या ठिकाणी ६३ एकर जागेमधे बांधले जाणार आहे.

४. २०१७ च्या ग्लोबल टैलेंट कॉम्पेटेटिवनेस इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ९२ व्या, २०१७ च्या ग्लोबल टैलेंट कॉम्पिटेटिवनेस इंडेक्स मध्ये भारत ११८ देशांपैकी ९२ व्या स्थानी आहे. ह्या क्रमवारीमध्ये देशाची वाटचाल, आकर्षण शक्ति आणि टैलेंट जमा करण्याच्या क्षमतेचा विचार केला जातो. ह्या अहवालामध्ये स्विट्ज़रलैंड अव्वलस्थानी असून सिंगापुर, यूनाइटेड किंगडम, अमेरिका, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया त्या खालोखाल आहेत.

५. २०१७ ची भारतीय अंतरराष्ट्रीय गारमेंट महोत्सव कोणत्या शहरामध्ये पार पडला?
उत्त्तर - नवी दिल्ली, ५८ वी भारतीय अंतरराष्ट्रीय गारमेंट महोत्सव १८ ते २० जानेवारी दरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडला. हा कार्यक्रम अप्पेरल एक्सपोर्ट प्रमोशन कौंसिलने आयोजित केला होता. आईआईजीएफ ही आशियामधील सर्वात मोठा फ्लेटफॉर्म आहे जेथे परदेशी ग्राहक भारतीय कंपन्यांसोबत देवाण-घेवाणविषयी करार करतात. ह्या कार्यक्रमामध्ये १४ भारतीय राज्यांमधील ३१२ कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

६. स्वातंत्र्यसेवक मोहनसिंग जोसन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे होते?
उत्तर - राजस्थान, स्वातंत्र्यसेवक मोहनसिंग जोसन यांचे नुकतेच निधन झाले ते राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील होते. त्यांचा १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो (ऑगस्ट क्रांती) आंदोलनामध्ये सहभाग होता.

७. प्रसार भारतीच्या अंतरिम मुख्यकार्यकारी अधिकारी पदी कोणाची नेमणूक होणार आहे?
उत्तर - राजीव सिंग, प्रसार भारतीचे नवीन अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्याचे एस सी पंडा फेब्रुवारी २०१७ मध्ये निवृत्त होणार असून नोवेम्बर २०१६ पासून प्रसार भारतीचे ते अंतरिम कार्यकारी अधिकारी आहेत.

01/02/2017

चालू घडामोडी

१. कैशलेस व्यावहारांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने "डिजिटल डाकिया" योजना सुरु केली आहे?
उत्तर - मध्य प्रदेश, कैशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने इंदौर जिल्यामध्ये "डिजीटल डाकिया" योजनेचे अनावरण केले आहे. ह्या योजने अंतर्गत डिजीटल पोस्टमैन राज्यांतर्गत विविध ठिकांणाना भेटी देऊन कैशलेस व्यवहारांबाबत माहिती देतील. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना ओळखपत्र दिले जाईल.

२. २०१६-१७ रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला आहे?
उत्तर - गुजरात, गुजरात संघाने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतला पहिलाच रणजी करंडक यावर्षी जिंकला आहे. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये गुजरातने महाराष्ट्राचा ५ गडी राखून पराभव केला. २०१६-१७ रणजी मालिका ८३ वी रणजी मालिका होती.

३. इजराइल आणि पैलेस्टाइन दरम्यान होणाऱ्या अंतरराष्ट्रीय शांतता परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडेल?
उत्तर - पेरिस, इजराइल आणि पैलेस्टाइन देशादरम्यान होणारी अंतरराष्ट्रीय शांतता परिषद फ्रांसच्या पेरिस शहरामध्ये पार पडणार असून ह्या परिषदेला तब्बल ७० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व देश निष्कर्ष ऐकण्यासाठी येणार आहेत.

४. खेलो इंडिया ह्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले?
उत्तर - नवी दिल्ली, केंद्रीय खेलमंत्री विजय गोयल यानी १४ आणि १७ वर्ष वयोगटाखालील खेळाडूंसाठी नवी दिल्लीच्या डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल कॉम्प्लेक्समध्ये खेल इंडिया स्पर्धेचे उद्घाटन केले. राष्ट्रिय स्तरावर खेळाडूंमध्ये स्पर्धा निर्माण करण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेमध्ये २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा जानेवारी, फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडणार आहे. दिल्लीमध्ये ही स्पर्धा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ़ इंडियाने आयोजित केली असून पोहणे, सायकलिंग, कुस्ती हे खेळ असून नेल्लोरमध्ये कबड्डी, खो-खो तर गुवाहाटीमध्ये वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेबल टेनीस गांधीनगरमध्ये हैंडबॉल, हॉकी तर चेन्नईमध्ये कराटे, फुटबॉल, वॉलीबॉल तर हैद्राबादमध्ये बैडमिंटन, बास्केटबॉल होणार आहेत.

५. आईआईटीमध्ये मूलींसाठी राखीव जागा असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली आहे?
उत्तर - टिमोथी गोनसाल्वेस समिती, महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या संख्येमध्ये सतत होणाऱ्या घटीमुळे प्रो. टिमोथी गोनसाल्वेस यांच्या समितीने आईआईटीमध्ये मुलींसाठी राखीव जागा असाव्यात अशी शिफारस केली आहे.

६. सुरजीत सिंह बरनाला यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
उत्तर - पंजाब, पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीत सिंग बरनाला यांचे नुकतेच चंडीगड़ येथे निधन झाले ते ९१ वर्षाचे होते. २००० साली निर्मित झालेल्या उत्तराखंड राज्याचे ते पहिले राज्यपाल होते त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडु राज्यांचे राज्यपालपद ही त्यांनी भूषवले आहे.

७. २०१७ ची वोडाफोन प्रीमियर बॅडमिंटन लीग कोणत्या संघाने जिंकली आहे?
उत्तर - चेन्नई स्मैशर्स, नवी दिल्लीच्या सीरी फोर्ट कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या वोडाफोन बॅडमिंटन प्रीमियर लीग चेन्नई स्मैशर्स संघाने जिंकली, अंतिम लढतीमध्ये चेन्नईने मुंबई रॉकेटसचा ४-३ असा पराभव केला.

01/02/2017

१ फेब्रुवारी दिनविशेष

* ठळक घटना, घडामोडी
१६८९ : संगमेश्वरावर संभाजीराजेना कैद करण्यात आले
१८३१ : ललित कला प्रदर्शन कलकत्ता येथे संपन्न झाले.
१८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
१९५९ : ‘रोहिणी मासिकाने’ शुभमंगल मेळा घेण्यास सुरुवात केली.
१९७७ : भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.
२००२ : आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्‍या ‘गुड फ्रायडे’ कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपतीके.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.
२००३ : अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.

* जन्म, वाढदिवस
१८८४ : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
१९०४ : बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी
१९१० : जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७१ : अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

* मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
१९९५ : मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
२००३ : कल्पना चावला, महिला अंतराळवीर.

Want your school to be the top-listed School/college in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Navi Mumbai (New Mumbai)