02/12/2018
गरुडझेप प्रतिष्ठान च्या नावे जागतिक विक्रम !!
सर्व कार्यकर्त्यांचे ,”हार्दिक अभिनंदन “
गरुडझेप प्रतिष्ठान ला जागतिक विक्रमा बाबत प्रमाणपत्र वितरण सोहोळ्याचे आयोजन पोलीस मुख्यालयातील सभागृहात केले होते . सूत्र संचालन भावना कुलकर्णी ह्यांनी केले . व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ सिंगल सर , आमी मुकेश छेडा ( जागतिक विक्रम पुस्तकाच्या प्रतिनिधी ) , पोलीस सहायक आयुक्त ( वाहतूक ) अशोक नखाते , गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार व महेश देवीकर उपस्थित होते . डॉ भानोसे ह्यांनी डॉ सिंगल सरांचा व अमी छेडा ह्यांचा सत्कार तुळशीचे रोप , ग्रंथ व स्मृती चिन्ह देऊन केला . तसेच संजय टायर्स चे संचालक प्रकाश गोळेसर व रघुनाथ पाटील ह्यांच्या हस्ते हि सत्कार संपण झाला . कार्य्क्रमची सुरवात डॉ भानोसे , रेणू , धनश्री , पूर्व आणि ऋचा ह्यांनी माणूस धर्मा ची महती सांगणारी प्रार्थना सादर करून केली . प्रास्ताविक सहायक आयुक्त अशोक नखाते ह्यांनी केले . विशाल पाटील दिग्दर्शित वाहतूक सुरक्षेवरील उद्बोधन करणारी शोर्ट फिल्म ,” सिग्नल रेड “ चे पोस्टर व टीझर डॉ सिंगल ह्यांनी प्रदर्शित केले . सिने कलावंत व सहयोगी ह्यांना स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . अमी छेडा ह्यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले . त्या नंतर गरुडझेप प्रतिष्ठान ला जागतिक विक्रम नोंदविल्या बद्दल डॉ सिंगल ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्र , स्मृती चिन्ह ,बिल्ला व मेडल प्रदान करण्यात आले .तसेच वैयक्तिक कार्य केल्याबद्दल डॉ भानोसे , रवी जोशी , भावना कुलकर्णी , संकेत भानोसे , पल्लवी जोशी , भाऊसाहेब चव्हाणके , शुभम गोळेसर , धनंजय पाटील , रेणू भानोसे , धनश्री , पूर्वा , ऋचा भालेराव , बाबा कुलकर्णी , चंद्रकांत नाईक , रवींद्र कुलकर्णी , सागर बोडके व विशाल पाटील ह्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . डॉ संदीप भानोसे ह्यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि ,” वाहतूक सुरक्षा अभियान हि काळाची गरज आहे . युवा वर्गाला प्रबोधनातून सकारात्मक प्रेरणा मिळते व ते नियमांचे पालन करतात . भविष्यात ३०० दिवसांचे लक्ष्य असणार आहे.
आजच्या जागतिक रेकॉर्ड कार्यक्रमप्रसंगी मा. डॉ. संदीपजी भानोसे (विश्व ब्राम्हण महापरिषदेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य) यांचा शाल,श्रीफल व पुष्पगुच्छ देवून सत्कार विश्व ब्राम्हण महापरिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष(प्रशासन व कार्यवाहक) डॉ. हेमंत दीक्षित, महिला प्रदेश अध्यक्ष अड़ श्यामला दीक्षित, नाशिक जिल्हा प्रमुख अंबादास जोशी व नाशिक जिल्हा सचिव बाबा कुलकर्णी ह्यांनी केले . नाशिक मधील सक्षम फौंडेशन , आसरा , रेड ब्रिगेड , मुद्रय फौंडेशन , केरला महिला सेवा समिती , नाशिक सायकालीस्त व इतर अनेक सामाजिक संस्था ह्या कार्यक्रमात हजर होते . आभार प्रदर्शन रवींद्र जोशी ह्यांनी केले .
डॉ संदीप भानोसे
राम कृष्ण हरी